Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Wednesday, July 17, 2013
मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्ला पञिका
Tuesday, July 16, 2013
कृषिकन्यांनी दाखवली बीजप्रक्रिया प्रात्यक्षिके
दि.१० जुलै 2013 रोजी वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषि महाविद्यालय, परभणी येथील अंतिम वर्षातील
कृषिकन्यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव उपक्रमांतर्गत मुरुंबा ता. जि. परभणी येथे सोयाबीन
बियाण्याला जिवाणु संवर्धनाची बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात
आला होता. या कार्यक्रमास कापूस संशोधन केंद्राचे डॉ. ए. एस. कारले, प्रा. मंत्री,
डॉ. जयेश देशमुख उपस्थित होते.
सोयबीन बियाण्याला
बुरशीनाशक व जिवाणू संवर्धीत प्रक्रियाचे तसेच माती परिक्षणासाठी मातीचा नमुना घेण्याचे प्रात्यक्षिक सर्व उपस्थित शेतक-यांना
करून दाखविले व त्याचे महत्व पटवुन दिले.
ग्रामीण कृषि कार्यानुभवाचे विविध
कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार यांच्या सूचनेनुसार आणि विस्तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख तथा समन्वयक डॉ. बि. एम. ठोंबरे
व ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम प्रभारी डॉ. राजेश कदम
यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात येत आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सरपंच श्री
गोपीनाथ झाडे, भिषणराव चोपडे, शालीकराम झाडे व शेतकरीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संगीता थिटे, सविता झाटे, देवकन्या स्वामी,
शितल उफाडे, शुभांगी यादव, कादरी आमरीन, अपर्णा काळदाते, कविता भोजे, आरती
कुलकर्णी, रश्मी कुमारी, लक्ष्मीबाई, अश्विनी राऊत, सिंधु सुरनर, आस्मा शेख,
भाग्यश्री फड यांनी परिश्रम घेतले.
Monday, July 15, 2013
Sunday, July 14, 2013
अन्नतंत्र महाविद्यालयातील अनुभवाधारीत शिक्षण कार्यक्रमांतर्गत विक्री केंद्राचे राज्यमंत्री मा. ना. प्रा. श्रीमती फौजिया खान यांच्या हस्ते उद् घाटन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अन्नतंत्र महाविद्यालयातील सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्प निश्चितच प्रसंशनीय असुन असा प्रकल्प राबविणारे राज्यातील पहीलेच विद्यापीठ आहे, राज्यातील तसेच देशातील विद्यापीठापुढे हा प्रकल्प अनुकरणी ठरेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, महिला व बाल विकास राज्यमंत्री मा. ना. प्रा. श्रीमती फौजिया खान यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत
असलेल्या अन्नतंत्र महाविद्यालयात अनुभवाधारीत शिक्षण कार्यक्रमांतर्गत उत्पादीत
होणारे प्रक्रिया पदार्थ विक्रीसाठी विद्यापीठात विक्री केंद्र सुरू करण्यात आले,
त्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रसंगी
विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. किशनराव गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्या पुढे म्हणाल्या की, विद्यापीठाचा या प्रकल्पामध्ये निर्यातक्षम मुल्यवर्धीत पदार्थाच्या निर्मीतीपासुन बाजारपेठेपर्यंतच्या
प्रत्येक टप्पावर विद्यार्थ्याच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेच्या
गुणांचा निश्चितच विकास होणार आहे. भविष्यात या प्रकल्पामुळे या भागात उद्योजकता
विकासास देखिल हातभार लागणार आहे. त्यामुळे करार शेतीच्या माध्यमातुन कच्चा माला
निर्मीतीची संधी शेतक-यांना प्राप्त होईल. या भागातील बचत गटातील महिलांनी यापासुन
प्रेरणा घ्यावी, असा सल्ला ही त्यांनी दिला.
या प्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ.
किशनराव गोरे म्हणाले की, अनुभवाधारीत शिक्षण प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना
प्रक्रिया पदार्थ तयार करण्यासाठी कच्चा मालाच्या खरेदीपासून प्रतवारी,
प्रक्रिया, पॅकिंग करून बनविलेल्या उत्पादनाच्या मार्केटिंगपर्यंतचे व्यवस्थापन
कौशल्य प्राप्त होणार आहे. भविष्यात या प्रकल्पामुळे विद्यार्थ्याबरोबरच
शेतकरी व उद्योजक यांना देखिल फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे शेतीमाल
प्रक्रिया उद्योजकता वाढीस चालना लागणार आहे, त्यामुळे या भागातील शेतक-यांना
निश्चितच फायदा होईल.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत
असलेल्या परभणी येथील अन्नतंत्र महाविद्यालयांत चार वर्षाचा बी. टेक. (अन्नतंत्र) पदवी अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्रात अनुभवारित शिक्षण कार्यक्रम (एकसपिरीएन्शल लर्निग प्रोग्रॅम) चा अंर्तभाव आहे. विद्यार्थ्यांमध्ये
उद्योजकतेच्या कौशल्यगुणांचा विकास व्हावा हा यामागील हेतू आहे. या सत्रात चार
महिने विद्यार्थ्याना प्रक्रिया ते मार्केटिंगपर्यतंचे कौशल्य शिकविले जाते. विद्यापीठांने
नुकतेच या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी व उद्योजक श्री. मोहम्मद गौस यांच्या
झैन नॅचरल अग्रो इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीशी सार्वजनिक-खाजगी भागीदारी
प्रकल्प (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप – पीपीपी) प्रायोगिक तत्वावर यशस्वीपणे राबवून क्रांतिकारक पाउल उचलले आहे. या
प्रकल्पांतर्गत उत्पादीत होणारे प्रक्रिया पदार्थ विक्रीसाठी विद्यापीठात विक्री
केंद्राचे उद्घाटन करून सुरू करण्यात आले. सदरील विक्री केंद्रावर या प्रक्रीया युनिट मध्ये
उत्पादीत होणारे टोमॅटो सॉस, मिक्सड फ्रुड जॅम, आंबा, लिंबु, मिरचीचे लोणचे आदी पदार्थ सवलतीच्या दराने ग्राहकांना उपलब्ध
होणार आहेत. गेल्या दिड महिण्यापासुन या प्रक्रीया युनिट मध्ये अन्नतंत्र
महाविद्यालयांचे 53 विद्यार्थी प्रशिक्षण घेत असुन, त्यांच्या सहभागाने उत्पादीत
होण्या-या मालावरील नफापैकी 50 टक्के वाटा विद्यार्थीना देण्यात येणार आहे.
याप्रसंगी राज्यमंत्री मा. ना. प्रा. श्रीमती फौजिया खान यांच्या हस्ते या
युनिट मध्ये तयार करण्यात आलेला 22 टन मिक्स फ्रुट जॅमच्या मालवाहु वाहनास
हिरवा झेंडा दाखवुन हा जॅम दुबाईस रवाना करण्यात आला.
यावेळी या प्रकल्पाचे प्रभारी डॉ. वसंत पवार, उद्योजक मोहम्मद गौस, डॉ. संजय
टाकळकर, प्रा. सय्यद हश्मी, श्री. पुरषोत्तम खिस्ते, डॉ. के. एस. गाडे, प्रा.
आर. बी. क्षीरसागर, प्रा. बी. एस. आगरकर, प्रा. जी. एम. माजेवाड, प्रा. प्रविण
घाटगे तसेच प्रशिक्षण घेत असणारे विद्यार्थी उपस्थीत होते.
Friday, July 12, 2013
मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्ला पञिका
भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून
प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्ये या आठवडयात
आकाश पुर्णतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाउस पडण्याची
शक्यता आहे. कमाल तापमान २४.० ते ३१.० अंश सेल्सीअस राहील तर किमान तापमान २०.०
ते २३.० अंश सेल्सीअस राहील. वारे ताशी ११.० ते १७.० कि.मी. प्रति तास वेगाने नैऋत्य-पश्चिम
दिशेने वाहतील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६.० ते ९०.० टक्के तर दुपारची सापेक्ष
आर्द्रता ५१.० ते ७३.० टक्के राहील.
विशेष सुचना : या
आठवडयात आकाश पुर्णतः ढगाळ राहून काही ठिकाणी हलक्या ते
मध्यम स्वरूपाचा पाउस पडण्याची शक्यता आहे.
कृषी सल्ला
|
|
|
|
सोयाबीन
|
सोयाबीनचे पीक
वाढीच्या अवस्थेत आहे. वापसा येताच पिकात हलकी कोळपणी करावी. ज्या ठिकाणी
तणांची वाढ अधिक दिसून येत असल्यास परशुट या तणनाशकाची ३० मीली प्रति १५ लिटर
पाण्यात मिसळुन वारा शांत असताना फवारणी करावी.
|
|
बाजरी
|
बाजरीचे पीक वाढीचे
अवस्थेत आहे. वापसा येताच हलकी कोळपणी करून पीक तण विरहीत ठेवावे.
|
|
मुग/उडीद
|
मुग/उडीदाचे पीक
वाढीचे अवस्थेत आहे. वापसा येताच हलकी कोळपणी करावी.
|
|
चिकु
|
नविन लागवड केलेल्या
चिकु बागेत आळयात पाणी साचून रहाणार नाही. याची काळजी घ्यावी. खुंटावर येणारी
फुट काढून टाकावी. कलमाना काढीचा आधार द्यावा.
|
|
आंबा
|
नविन लागवड केलेल्या
कलमांचे आळयात पाणी साठून रहाणार नाही याची काळजी घ्यावी.
|
|
पेरू
|
नविन लागवड केली
नसल्यास पेरूची लागवड करावी. यासाठी लखनौ ४३ (सरदार) या वाणाची निवड करावी.
लागवड ६x६ मिटर अंतरावर करावी.
|
|
भाजीपाला़
|
पालेभाज्यांची
(पालख, शेपू, चुका, माठ,) यांची काढणी करावी.
|
|
पशुधन
व्यवस्थापन
|
सध्या जनावरांनमध्ये गोचीडांचा प्रादूर्भाव दिसून येत
आहे. गोचीड नियंत्रणासाठी मेटारायझिम बुरशीचा वापर गोठयात गोचिडांच्या नाश करण्यासाठी
करावा. मेटारायझिमचे द्रावण जनावरांच्या शरीरावर फवारण्यासाठी वापरू नये, केवळ गोठयात फवारण्यासाठी याचा
वापर करावा. ५ ग्रॅम मेटारायझिम पावडर अधिक ५ मि.लि. दूध प्रति लिटर पाण्यात
मिसळून द्रावण तयार करावे. हे तयार केलेले द्रावण गोठयात फवारण्यापूर्वी जनावरे
गोठयाबाहेर काढावीत, तसेच चारा व इतर गोष्टीही गोठयाबाहेर काढाव्यात.
गोचीडनाशकाची फवारणी दावणीखाली व गोठयाच्या भिंतीच्या कडा-कपारीमध्ये जेथे
जेथे गोचिडांची अंडी आहेत अशाच ठिकाणी करावी. रात्रीच्या वेळेस फवारणी करणे
अधिक फायदेशीर ठरते.
|
|
कृषि
अभियांत्रिकी
|
मुलस्थानी मृद व जलसंधारणाची काम पावसाने उघडीप दिल्याबरोबर
त्वरीत करून घ्यावीत तसेच बांधबंधिस्ती करावी. प्रामुख्याने विद्यापीठाच्या शिफारशी वापराव्यात.
शेततळे, पाझरतलाव आणि इतर जलसंधारणाची कामे करावीत. ज्यायोगे
भुजल पातळीत वाढ होईल तसेच जुलै अखेर ऑगस्टमध्ये पावसात खंड पडल्यास कापूस, तूर व इतर पिंकास संरक्षित पाणी
देता येईल.
केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषिहवामान सल्ला सेवा योजना
पञक क्रमांकः २६
दिनांकः १२/०७/२०१३
|
Wednesday, July 10, 2013
मुरुंबा येथे कृषिकन्यांनी दाखवली जिवाणू संवर्धन व माती परिक्षनाचे प्रात्यक्षिके
मराठवाडा कृषि विद्यापीठातर्गत असलेल्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील कृषिकन्यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत मुरुंबा येथे सोयबीन बियाण्याला बुरशीनाशक व जिवाणू संवर्धीत प्रक्रियाचे तसेच माती परिक्षणासाठी मातीचा नमुना घेण्याचे प्रात्यक्षिकाचे आयोचन करण्यात आले होते. या कार्यक्रमास एकात्मिक पीक पध्दती संशोधन केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ.
नारखेडे व कार्यक्रम अधिकारी डॉ. जयश्री एकाळे उपस्थित होत्या. डॉ. नारखेडे ह्यांनी बीजप्रक्रिया व माती परिक्षणाचे महत्व विषद केले मार्गदर्शन केले.
बियाणे जिवाणू संवंर्धन प्रक्रिया व माती
परिक्षण तसेच ग्रामीण कृषि कार्यानुभवाचे विविध कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार यांच्या सूचनेनुसार आणि विस्तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख तथा समन्वयक डॉ. बि. एम. ठोंबरे व ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम प्रभारी डॉ.
राजेश कदम यांच्या
मार्गदर्शनाने घेण्यात येत आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सरपंच श्री
गोपीनाथ झाडे, उपसरपंच, ग्रामसेवक, कृषि
सहाय्यक व शेतकरीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कु.
कोमल शिंदे, धनश्री हुडेकर, मंदा किरवले, मीना नाईकवाडे, स्नेहा गुंडला, प्रिया
पवार, अश्विनी पंचांगे, कांचन क्षिरसागर, शितल लोनसने, पल्लवी पाटील, निशु
खंदारे, सुवर्णा खंदारे, उजमा बेगम, ज्योती बोर्डे, प्रियंका खटींग, योगेश्वरी
सोनटक्के व येळणे एस. एम. यांनी परिश्रम घेतले.
Saturday, July 6, 2013
मराठवाडयाकरिता कृषि हवामान सल्ला पञिका
भारतीय हवामान विभाग, मुबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्ये या आठवडयात आकाश ढगाळ राहून तुरळक
ठिकाणी हलका पाउस पडण्याची शक्यता
आहे. कमाल तापमान ३०.० ते ३३.० अंश सेल्सीअस राहील तर किमान तापमान २२.० ते २८.०
अंश सेल्सीअस राहील. वारे ताशी ११.० ते १५.० कि.मी. प्रति तास वेगाने नैऋत्य
दिशेने वाहतील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२.० ते ८५.० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४५.० ते
५६.० टक्के राहील.
विशेष सुचना : या आठवडयात आकाश
ढगाळ राहून काही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाउस पडण्याची शक्यता
आहे.
कृषि सल्ला
सोयाबीन
|
सोयाबीनची पेरणी या
आठवडयातच पूर्ण करावी. पेरणीसाठी एमएयुएस-७१, जेएस-३३५, एमएयुएस-१५८ या पैकी एका वाणाची निवड करावी.
बियाण्यास रायझोबीयम व पीएसबी जैविक खताची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी.
|
बाजरी
|
बाजरीची पेरणी या
आठवडयातच पुर्ण करावी. हेक्टरी ३ किलो बियाणे वापरावे. पेरणी
करताना बियाण्यात दाणेदार खत मिसळुन पेरल्यास बियाणे योग्य अंतरावर पडून
रोपांची संख्या प्रति हेक्टरी योग्य राहील. पेरणीसाठी जीएचबी-५५८, श्रध्दा, सबुरी व एएचबी-१६६६
या पैकी एका वाणाची निवड करावी.
|
मुग/उडीद
|
मुग/उडीदाची विरळणी
करून तणमुक्त ठेवावे मुलस्थानी जलसधारण करावे.
|
डाळिंब
|
डाळिंबाची लागवड
करावयाची असल्यास उत्तम निचरा होणा-या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमीनीची निवड
करावी. डाळिंबाची लागवड ६० x ६० x ६० सें.मी. आकाराच्या
खडयात ५ x ५ मिटर अंतरावर करावी. लागवडी सोबत २१ किलो शेणखत
व १ किलो सुपर फॉस्फॅटचा वापर करावा. लागवडी सोबत प्रति खडा ५० ग्रॅम लींडेन
पावडरचा अथवा इतर बुरशीनाशकाचा वापर करावा.
|
चिकु
|
चिकु फळपिकाच्या
नविन कलमांची लागवड पाण्याची सध्याची उपलब्धी आणि उन्हाळयात उपलब्ध होउ
शकणा-या
पाण्याची उपलब्धी याचा विचार करून १०x१०
मी. अंतरावर करावी. यासाठी कालीपत्ती, पीलीपत्ती, किक्रेटबॉल, छत्री इत्यादी पैकीएका वाणाची निवड करावी.
लागवडीसोबत १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति झाड वापर करावा. तसेच फुटलेल्या
कलमावरील कोवळया पाणावरील रषशोषक किडींचा इतर किंडीचा बंदोबस्त करावा.
|
आंबा
|
रोपवाटीकेत आंबा
कलमीकरण करावे. कलमी करणासठी परभणी हापूस, केशर, सिंधु या वाणांच्या कलम काडयांचा वापर करावा.
नवीन फळबाग लागवड करताना सध्या आणि भविष्यात उपलब्ध होउ शकणा-या पाण्याचा
विचार करूनच लागवड करावी.
|
बोर
|
या आठवडयात बोरीचे कलमीकरण करून घ्यावे. कलमीकरणासाठी उमराण, गोला, कडाका, सनुर-६, छुवारा, इलायची, मुक्ता या पैकी वाणाची निवड करावी.
|
भाजीपाला़
|
मीरचीच्या रोपांची
या आठवडयात पूर्नलागवड करावी. मीरचीची रोपे लागवडी पूर्वी किटकनाशक व
बुर्शीनाशकाचे द्रावणात बुडवुन घ्यावेत.
केंद्र प्रमुख
एकात्मिक कृषि हवामान सल्ला सेवा योजना
कृषि हवामानशास्त्र विभाग, म.कृ.वि., परभणी
पञक क्रमांकः २५ दिनांकः ०५/०७/२०१३
|
Subscribe to:
Posts (Atom)


