Thursday, February 13, 2014

हवामान आधारीत जिल्‍हानिहाय व विभागनिहाय मुख्‍य पिक उत्‍पादनाचा अचुक अंदाज आला पाहीजे ..... कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

फसल योजनेची विभागीय आढावा बैठक संपन्‍न
फसलच्‍या विभागीय बैठकीच्‍या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, डॉ बी बी भोसले, डॉ बालसुब्रमण्‍यम, डॉ व्‍ही जी मनियार, डॉ बी व्‍ही आसेवार, प्रा प्रल्‍हाद जायभाये आदी 
कृषि हवामानशास्‍त्र विषयाच्‍या पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांच्‍या संशोधन प्रबंधाचे सारांश पुस्तिकेचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले
फसलच्‍या विभागीय बैठकीत सहभागी शास्‍त्रज्ञासोबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, डॉ बी बी भोसले, डॉ बालसुब्रमण्‍यम, डॉ व्‍ही जी मनियार, डॉ बी व्‍ही आसेवार, प्रा प्रल्‍हाद जायभाये आदी 
*************************
देशाची अर्थव्‍यवस्‍था शेतीवर किंबहुना मान्‍सुनवर आधारीत असुन हवामान अंदाज वर्तविण्‍यात अधिक अचुकता आली पाहीजे, नजीकच्‍या काळात जिल्‍हानिहाय व विभागनिहाय मुख्‍य पिकांचा अंदाज कृषि हवामानशास्‍त्रज्ञांना देता आला पाहीजे, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी व्‍यक्‍त केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि हवामानशास्‍त्र विभागातंर्गत कार्यरत असणा-या अवकाश कृषि हवामान व भुमी निरीक्षण आधारावर कृषि उत्‍पादनाचा अंदाज (फसल) प्रकल्‍पाच्‍या पश्चिम विभागाची विभागीय वार्षिक आढावा बैठकीच्‍या दि 12 फेब्रवारी रोजी समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते, याप्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, हवामानशास्‍त्र विभागाचे माजी प्रभारी अधिकारी प्रा डॉ व्‍ही जी मनियार, भारतीय हवामान विभागाचे शास्‍त्रज्ञ डॉ बालसुब्रमण्‍यम व कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ बी बी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाषणात पुढे ते म्‍हणाले की, मराठवाडयातील कापुस व रबी ज्‍वारी हे प्रमुख पिकांच्‍या उत्‍पादनाच्‍या दृष्‍टीने मान्‍सुन, तापमान व हवेतील आर्द्रता हया प्रमुख बाबी असुन हवामान – पीक मॉडेलचे विविध प्रकार व त्‍याआधारे पिक उत्‍पादनाचे अचुक अनुमान काढणे यासाठी शास्‍त्रज्ञांना प्रशिक्षीत करण्‍याची गरज आहे. जागतीक स्‍तरावरील हवामान बदल व शेतीवरील परिणाम पाहता कृषि पदवीधरांना या क्षेत्रात कार्य करण्‍याच्‍या मोठया व्‍यवसाय संधी आहेत, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.  
विस्‍तार शिक्षण संचालक यांनी आपल्‍या भाषणात हवामान व माती यांचा परिणामकारक वापर पीक उत्‍पादनात कसा होतो याबाबत मार्गदर्शन केले तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी हवामानाचा अचुक अंदाज शेतक-यांपर्यत त्‍वरीत पोहचविण्‍याची गरज व्‍यक्‍त केली. याप्रसंगी शास्‍त्रज्ञ डॉ बालसुब्रमण्‍यम व डॉ बी बी भोसले यांनीही कृषि हवामानावरील आपले मत व्‍यक्‍त केले.
या प्रसंगी हवामानशास्‍त्र विभागाचे निवृत्‍त प्रभारी अधिकारी प्रा डॉ व्‍ही जी मनियार यांचा विद्यापीठाच्‍या  हवामानशास्‍त्र विभागाच्‍या उभारणीतील योगदानाबाबत कुलगुरू मा डॉ व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमात कृषि हवामानशास्‍त्र विषयाच्‍या पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांच्‍या संशोधन प्रबंधाचे सारांश पुस्तिकेचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन हवामानशास्‍त्र विभागाचे प्रभारी अधिकारी डॉ बी व्‍ही आसेवार यांनी केले.
दिनांक 11 व 12 फेब्रवारी दरम्‍यान आयोजित या दोन दिवशीय बैठकीस गुजरात येथील आनंद, जुनागड, अहमदाबाद, नवसारी तसेच महा‍राष्‍ट्र राज्‍यातील पुणे, अकोला, दापोली व भारतीय हवामान विभागातील 18 शास्‍त्रज्ञांच्‍या चमुने सन 2013-14 वर्षातील आपआपल्‍या विभागातील जिल्‍हानिहाय संख्‍याशास्‍त्रीय समाश्रणीय आधारे तसेच संगणक प्रणाली समाश्रणीय पध्‍दतीने डीसॅट 4.5 मॉडेलव्‍दारे काढलेले पिकांचे अंदाज सादर केले. बैठकीचे आयोजन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली आयोजक हवामानशास्‍त्र विभागाचे प्रभारी अधिकारी डॉ बी व्‍ही आसेवार व प्रकल्‍प समन्‍वयक प्रा. प्रल्‍हाद जायभाये यांच्‍या पुढाकाराने यशस्‍वीपणे पार पाडले. बैठकीच्‍या यशस्‍वीतेसाठी प्रा मधुकर जाधव, प्रा अस्‍मान खोब्रागडे, श्री प्रमोद शिंदे, श्री गोटे, श्री बुचाले, डॉ महेश वाघमारे, श्री हनुमंत आहेर यांनी विशेष परिक्षम घेतले.  

Wednesday, February 12, 2014

राष्ट्रिय सुर्यफूल जर्मप्लाझम प्रक्षेत्र दिन साजरा

राष्‍ट्रीय सुर्यफुल जर्मप्‍लाझम प्रक्षेत्र दिना निमित्‍त आयोजित दोन दिवशीय परिसंवादाच्‍या उदघाटन प्रसंगी अध्‍यक्षीय भाषण करतांना विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर मा डॉ योंगेद्र नेरकरडॉ दत्‍तप्रसाद वासकरडॉ के एस वरप्रसाद, डॉ आर के त्‍यागी,  श्री के एन देशमुख आदी. 
ला‍तूर येथील गळीत धान्‍य संशोधन केंद्रात सूर्यफुलाच्‍या संग्रहीत केलेल्‍या 2000 जातीची पाहणी करतांना विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व मा डॉ योंगेद्र नेरकर डॉ दत्‍तप्रसाद वासकरडॉ के एस वरप्रसाद,  डॉ आर के त्‍यागी,  श्री के एन देशमुख आदी. 
**************************************************************

लातुर - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर येथील गळीतधान्‍य संशोधन केंद्रहैद्राबाद येथील तेलबिया संशोधन संचालनालय व नवी दिल्‍ली येथील राष्‍ट्रीय पादप आनुवंशिक संसाधन ब्‍यूरो यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने  राष्‍ट्रीय सुर्यफुल जर्मप्‍लाझम प्रक्षेत्र दिना निमित्‍त लातूर येथील गळीत धान्‍य संशोधन केंद्रात दोन दिवशीय परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले होते.  दि 6 फेब्रवारी कार्यक्रमाचे उदघाटन महत्‍मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे माजी कुलगुरू तथा वनामकृवि, परभणीचे कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. योगेंद्र नेरकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु होते तसेच हैद्राबाद येथील तेलबीया संशोधन संचालनालयाचे प्रकल्‍प संचालक डॉ. के. एस. वरप्रसाद, नवी दिल्‍ली  येथील राष्‍ट्रीय पादप आनुवंशिक संसाधन ब्‍यूरोचे डॉ आर के त्‍यागी, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विभागीय कृषि सहसंचालक श्री के एन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, सुर्यफुल या पिकाखालील लागवडीचे क्षेत्र बरेच कमी झाले असुन सुर्यफुलाचे मुल्‍यवर्धीत पदार्थावर संशोधन होणे गरजेचे आहे. संशोधनाच्‍या आधारे निर्माण केलेल्‍या विद्यापीठाच्‍या अनेक पिकांच्‍या जाती उत्‍तम असुन त्‍याचा शेतकरांच्‍या शेतावरील परिणाम विश्‍लेषणाची आवश्‍यकता आहे.
मा. डॉ. योगेंद्र नेरकर यांनी आपल्‍या भाषणात विविध पिकांच्‍या नवीन वाण निर्मिती संशोधनाबाबत तर डॉ. के. एस. वरप्रसाद व डॉ आर के त्‍यागी यांनी सुर्यफुल संशोधनाची भविष्‍यातील दिशा, यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक संशोधन संचालक डॉ दत्त्‍तप्रसाद वासकर यांनी तर आभार प्रदर्शन गळीत धान्‍य संशोधन केंद्राचे तेलबिया विशेषज्ञ डॉ महा‍रूद्र घोडके यांनी केले.
यानिमित्‍त ला‍तूर येथील गळीत धान्‍य संशोधन केंद्रात सूर्यफुलाच्‍या संग्रहीत केलेल्‍या 2000 जातीची पाहणी उपस्थितांनी केले. देशपातळीवर सुर्यफुलाच्‍या उत्‍पादकता वाढीसाठी या जातींच्‍या विविध गुणधर्माचा जसे की केवडा रोग प्रतिबंधक, अधिक उत्‍पादकता, तेलाचे अधिक प्रमाण व इतर गुणधर्म शास्‍त्रीय अभ्‍यास सध्‍या सुरू असुन चांगले वाणाची निवड करून त्‍यांची देशातील परिस्थितीतील स्थिरता व सुर्यफुलाचे मुल्‍यवर्धीत पदार्थ निर्मिती यावरील संशोधनावर भविष्‍यात भर देण्‍याचे या परिसंवादात निश्चित करण्‍यात आले.
परिसंवादात देशातील सुमारे 60 शास्‍त्रज्ञांनी सहभाग नोंदविला. गळीत धान्‍य संशोधन केंद्रातील सुर्यफुलावरील केवडा रोगाच्‍या नर्सरीतील सुक्ष्‍मसिंचन यंत्रणेचे उदघाटन तसेच विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित तंत्र सुधारित सुर्यफुल लागवडीचे या पुस्‍तकाचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व डॉ महारूद्र घोडके यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ नरेशकुमार जायेवार, डॉ अमोल मिसाळ, डॉ एस पी शिरसीकर, श्री एस एन गिरी, श्री आर टी चव्‍हाण, श्री व्‍ही बी जगाले आणि श्री सुधीर सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

Sunday, February 9, 2014

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र येथुन ‘कृषि वसंत - 2014’ चे थेट प्रसारण

       नागपुर येथे देशातील सर्वात मोठे राष्‍ट्रीय कृषि प्रदर्शन कृषी वसंत – 2014 चे आयोजन दिनांक 9 ते 13 फेब्रुवारी दरम्‍यान करण्‍यात आले असुन यात देशभरातील कृषी संशोधन संस्‍था, कृषि विद्यापीठे, कृषी क्षेत्रातील खाजगी संस्‍था, स्‍वयंसेवी संस्‍था आदींचा सहभाग असणार आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन देशाचे राष्‍ट्रपती मा प्रणव मुखर्जी यांच्‍या हस्‍ते दि 9 फेब्रुवारी रोजी होत आहे. शेतकरी बांधवांसाठी हे प्रदर्शन अतिशय महत्‍वाचे ठरणार असुन यात साधारणता 3 ते 5 लाख शेतकरी, शास्‍त्रज्ञ, अधिकारी, उद्योजक भेट शक्‍यता आहे.    
     या प्रदर्शनास ज्‍या शेतक-यांना प्रत्‍यक्ष उपस्थितीत राहता येणार नाही त्‍यांच्‍या करीता प्रदर्शनाचे वेबकास्टिंगव्‍दारे जिल्‍हा व तालुकास्‍तरावर राज्‍यभर प्रसारण करण्‍यात येणार आहे. त्‍यादृष्‍टीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे ही कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली वेबकास्टिंगव्‍दारे कृषि वसंत प्रदर्शनाचे थेट प्रसारणाचे नियोजन करण्‍यात आले असुन दि 9 ते 13 फेब्रुवारी दरम्‍यान सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत विद्यापीठाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रात शेतकरी बांधवांनी याचा लाभ द्यावा असे आवाहन व्‍यवस्‍थापक डॉ आनंद गोरे व श्री दयानंद दिक्षीत यांनी केले आहे. अधिक माहीती साठी 02452-229000 या दुरध्‍वनी क्रमांकावर संर्पक साधावा.      
       तसेच प्रत्‍येक जिल्‍हाच्‍या व तालुक्‍याच्‍या ठिकाणी आत्‍माचे प्रकल्‍प संचालक व कृषि उपसंचालक यांच्‍या माध्‍यमातुन विविध ठिकाणी प्रदर्शानाचे थेट प्रसारण करण्‍याचे नियोजन असुन वेबकास्‍टींगाचा कार्यक्रम http://agriwebcast.gov.in यासंकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. 

Wednesday, February 5, 2014

गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या माजी विद्यार्थ्‍यांचे स्‍नेहमिलन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयातर्फे दि 15 फेब्रवारी 2014 रोजी माजी विद्यार्थ्‍यांचा स्‍नेहमिलनाचे आयोजन करण्‍यात आले असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी वनामकृविचे कुलगूरू मा डॉ. बी. वेंकटेश्‍वरलु राहणार असुन शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ. विश्‍वास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 1975 साली गृहविज्ञान महाविद्यालयाची स्‍थापन झाली असुन त्‍यापासुन आजपर्यंनच्‍या सर्व माजी विद्यार्थ्‍यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्‍यात आले आहे. विद्यार्थ्‍याना त्‍यांच्‍या महावि़द्यालयीन जीवनास पुर्नउजाळा देण्‍यासाठी तसेच परस्‍परांमध्‍ये व महाविद्यालयाशी त्‍यांचे घनिष्‍ठ स्‍नेहबंध कायम राहण्‍याच्‍या प्रमुख उददेशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. कार्यक्रमाची सुरवात महाविद्यालयाच्‍या सभागृहात सकाळी ठीक 9.00 होणार असुन महाविद्यालयाच्‍या सर्व माजी विद्यार्थ्‍यांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन गृ‍हविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या प्रा विशाला पटनम यांनी केले आहे. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी वेंकटेश्‍वरलु यांचा विद्यापीठ कर्मचारी संघातर्फे सत्‍कार

मा डॉ बी वेंकटेश्‍वरलु यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कुलगुरू पदाचा पदभार स्‍वीकारल्‍यानंतर त्‍यांचा विद्यापीठ कर्मचारी संघातर्फे सत्‍कार करण्‍यात आला, त्‍याप्रसंगी अध्‍यक्ष प्रा दिलीप मोरे, उपाध्‍यक्ष श्री प्रदिप कदम, श्री गिरीशंकर शिंदे, सरचिटणीस श्री ज्ञानोबा पवार, श्री कृष्‍णा जावळे आदी 

Monday, February 3, 2014

गळीत धान्‍य संशोधन केंद्र, लातुर येथे राष्‍ट्रीय सुर्यफुल जर्मप्‍लाझम दिनाचे आयोजन

लातुर - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर येथील गळीतधान्‍य संशोधन केंद्रहैद्राबाद येथील तेलबिया संशोधन संचालनालय व नवी दिल्‍ली येथील राष्‍ट्रीय पादप आनुवंशिक संसाधन ब्‍यूरो यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने राष्‍ट्रीय सुर्यफुल जर्मप्‍लाझम दिनानिमित्‍त लातूर येथील गळीत धान्‍य संशोधन केंद्रात दि.05 व 06 फेब्रुवारी, 2014 रोजी दोन दिवशीय परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले असुन परिसंवादाचे उदघाटन महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे माजी कुलगुरू तथा वनामकृवि, परभणीचे कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ. योगेंद्र नेरकर यांच्‍या हस्‍ते होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी वेंकटेश्‍वरलु राहणार असुन हैद्राबाद येथील तेलबीया संशोधन संचालनालयाचे प्रकल्‍प संचालक डॉ. के. एस. वराप्रसाद व नवी दिल्‍ली येथील राष्‍ट्रीय पादप आनुवंशिक संसाधन ब्‍यूरोचे प्रमुख डॉ आर के त्‍यागी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ला‍तूर येथील गळीत धान्‍य संशोधन केंद्रात सूर्यफुलाच्‍या 2000 जातीचा संग्रह केलेला असून त्‍यावर दोन दिवसांच्‍या चर्चासत्रात सूर्यफुलावरील संशोधन बाबीविषयी सखोल चर्चा केली जाणार आहे. सदरील कार्यक्रमात अखिल भारतीय स्‍तरावरील सुर्यफुल पैदासकार तसेच भारतीय अनुसंधान परिषद, नवी दिल्‍ली येथील उच्‍च पदस्‍थ अधिकारी व विविध शास्‍त्रज्ञ सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली विविध समित्‍यांचे गठण करण्‍यात आल्‍याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक व गळीतधान्‍य विशेषतज्ञ डॉ. म. का. घोडके यांनी दिली आहे.  

Sunday, February 2, 2014

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने काढण्‍यात आलेल्‍या संदलचा प्रारंभ कुलगूरू मा डॉ बी वेंकटेश्‍वरलू यांच्‍या हस्‍ते

संदल – परभणी येथील प्रसिध्‍द हजरत सयद शाह तुराबुल हक यांच्‍या ऊरूसाला प्रारंभ झाला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने कुलगूरू मा डॉ बी वेंकटेश्‍वरलू यांच्‍या हस्‍ते संदल काढण्‍यात आला. याप्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ विश्‍वास शिंदे, कुलसचिव श्री का वि पा‍गिरे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ बी बी भोसले आदी.
                                                                                                                                                        छायाचित्र - श्री अमोल सोनकांबळे