Friday, September 26, 2014

देशी कापुस पिक प्रात्‍याक्षिकास कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांची भेट


औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रामार्फत औरंगाबाद जिल्‍हयातील देवगाव ता. पैठण येथील शेतक-यांच्‍या शेतावर घेण्‍यात आलेल्‍या विद्यापीठाच्‍या देशी कपाशीच्‍या वाणाच्‍या पिक प्रात्‍याक्षिकास विद्यापीठाचे कुलगुरू मा. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी दि २६ सप्‍टेबर रोजी भेट दिली, यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, औरंगाबाद येथील विभागीय कृषि सहसंचालक डॉ सुर्यकांत पवार, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री पी डी लोणारे, कापुस विशेषज्ञ डॉ के एस बेग, डॉ एस बी पवार विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, अधिकारी व शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
देवगांव येथील दिपक जोशी यांच्‍या शेतावरील कृषि विद्यापीठ विकसित पी ए २५५ (परभणी तुराब) व पी ए ५२८ या वाणांची पाहणी करण्‍यात आली. याप्रसंगी कुलगुरू मा. बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी देशी वाण प्रात्‍यक्षिकाबाबत समाधान व्‍यक्‍त केले व मार्गदरर्शन करतांना म्‍हणाले की, देशी कपाशीचे सरळ वाण रसशोषण करणा-या किडींना सहनशिल असल्‍याने त्‍यावर होणारा पिक संरक्षण खर्च कमी होतो तसेच मध्‍यम-हलक्‍या जमिनीत कोरडवाहु लागवडीत कपाशीच्‍या देशी वाणांचे उत्‍पादन बी टी कपाशीपेक्षा कमी उत्‍पादन खर्चात समतुल्‍य येत असल्‍यामुळे या बियाणाची उपलब्‍धता वाढविणे आवश्‍यक आहे. प्रात्‍याक्षिकातील उत्‍पन्‍न खर्चाची नोंद ठेऊन त्‍यांची बी टी कपाशी तुलना करण्‍यात यावी, अशी सुचना त्‍यांनी केली. सदरील प्रात्‍याक्षिकाचे नियोजन कृषि विज्ञान केंद्र औरंगाबाद येथील शास्‍त्रज्ञांच्‍या मार्गदर्शनाखाली केले आहे. देवगांव शिवारातील प्रात्‍यक्षिक भेटीचा कार्यक्रम श्री दिपक जोशी व त्‍यांच्‍या जयजवान जयकिसान गटाच्‍या शेतक-यांनी व औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्राच्‍या सहकार्य आयोजित करण्‍यात आला होता. 

नांदगांव येथे रब्‍बी शेतकरी मेळावा संपन्‍न


Wednesday, September 24, 2014

सोयाबीन पीकावर हुमणी अळीचा तर कपाशीवर रसशोषण करणा-या किंडींचा प्रादुर्भाव







राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्‍यांना सुजान नागरिक घडवि‍ण्याचे माध्यम .......मा. डॉ. अशोक ढवण

मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ अशोक ढवण 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा करण्‍यात आला. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ. अशोक ढवण होते तर ग्रामीण कथाकथनकार राजेंद्र गहाळ, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, विभाग प्रमुख डॉ. बी.एम.ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्‍या अध्यक्षीय भाषणात शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ.अशोक ढवण म्‍हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्‍यांना सुजान नागरिक घडवण्याचे माध्यम असुन समाजातील विविध प्रश्नाची जाण यामुळे आजच्‍या युवकात निर्माण होते, तरूण वर्गाने समाजातील विविध समस्याचे निराकरणाचे कार्य हाती द्यावे असे आवाहन त्‍यांनी राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या स्‍वयंसेवकांना केले.
ग्रामीण कथाकथनकार राजेंद्र गहाळ यांनी आईवडीलांचे उपकार आपण कधीही फेडु शकत नाही, त्‍यांची सेवा हीच ईश्‍वर सेवा आहे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. महात्मा गांधीचे कार्या पासुन प्रेरणा घेऊन स्वंयसेवकांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने आपला व्यक्तिमत्व विकास साधावा, असा सल्‍ला कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले यांनी दिला तर डॉ. बी.एम.ठोंबरे यांनी आपल्‍या भाषणात राष्ट्रीय सेवा योजना हि एक चळवळ असून ती आयुष्यभर सर्व स्वंयसेवकानी अंगीकृत करावी असे सांगितले.
प्रा.व्ही.बी.जाधव व स्वंयसेवक विशाल राठोड, मनीषा दहे, तुकाराम मंत्रे, जीवन धोत्रे, वृषाली खाकाळ, जान्हवी जोशी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेवर आपले विचार मांडले. याप्रसंगी प्रा. रवींद्र शिंदे यांना राज्यस्तरीय सन २०१३-१४ चा ‘उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी’ पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ.अशोक ढवण यांच्या हस्ते सत्कार कण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.ए.एम.कांबळे यांनी केले तर आभारप्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा.रवींद्र शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रियांका खर्चे व नितीन डोकर यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी स्वंयसेवक संजय चिंचणे, कुमार पानझडे, भारत खेल्भाडे, मारोती चातुरे, विनिता वर्मा, संजीवनी बारंगुले, संध्या थोरात, नेहा भोल, शारदा घोलप, अनुराधा बुचाले,सय्यद रिजवाना,पूजा शेटे, शिताराम बाद्से,मयुरी काळे, विश्वास कदम,अजय मुंढे, आणि राजेंद्र पवार यांनी परिश्रम घेतले.

Monday, September 22, 2014

फळपीकावरील कीड-रोगांच्‍या प्रादुर्भावाचा पुर्वानुमान बांधता आला पाहीजे.........कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

हॉर्टसॅप प्रकल्‍पाच्‍या दोन दिवसीय प्रशिक्षणाचे उदघाटन
हॉर्टसॅप प्रकल्‍पाच्‍या दाेन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर डॉ बी बी भोसले, डॉ अशोक ढवण, डॉ दत्‍तप्रसाद वासकर, श्री विजयकुमार राऊत, डॉ डी एल जाधव आदी
हॉर्टसॅप प्रकल्‍पाच्‍या दाेन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी घडीपत्रीकेचे विमोचन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, डॉ बी बी भोसले, डॉ अशोक ढवण, डॉ दत्‍तप्रसाद वासकर, श्री विजयकुमार राऊत, डॉ डी एल जाधव आदी
फळपीकांतील कीड व रोगामुळे होणारे शेतक-यांचे नुकसान भरून न येणारे असते, त्‍यामुळे फळपीकासाठी हॉर्टसॅप प्रकल्‍प अत्‍यंत महत्‍वाचा आहे. या प्रकल्‍पांर्गत संकलीत करण्‍यात येणा-या आकडेवारीचा उपयोग करून कृषि हवामान अंदाजाप्रमाणे दिर्घकालीन फळपीकांतील कीड व रोगांच्‍या प्रादुर्भावाचा पुर्वानुमान बांधता आला पाहिजे, असे मत कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी व्‍यक्‍त केले. 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कीटकशास्‍त्र विभाग व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने फलोत्‍पादन पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्‍ला व व्‍यवस्‍थापन प्रकल्‍प (हॉर्टसॅप) प्रकल्‍पांतर्गत दि २२ व २३ सप्‍टेबर रोजी कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी व कीड सर्वेक्षक, कीड नियंत्रक, संगणक प्रचालक यांच्‍या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला असुन या कार्यक्रमाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डी एल जाधव व उपसंचालक (फलोत्‍पादनश्री विजयकुमार राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, या प्रकल्‍पात कृषि हवामानशास्‍त्राची भुमिका महत्‍वाची असुन कोणत्‍या हवामान परिस्थिती, कोणत्‍या कीड-रोगांचा प्रार्दभाव होण्‍याची शक्‍यता आहे याचा अंदाज बांधता आल्‍यास फलोत्‍पादक शेतक-यांना याचा मोठा फायदा होईल. कृषि विभागाच्‍या सहकार्याने क्रॉपसॅप प्रकल्‍पाप्रमाणेच फलोत्‍पादक शेतक-यांपर्यंत कृषि सल्‍ला त्‍वरीत पोहोचविण्‍यात यावा, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.  
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, आंबा, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी व चिकु या सहा फळपीकांचा प्रकल्‍पात समावेश असुन मराठवाडयाकरिता मोंसबी हे महत्‍वाचे फळपीक आहे. याप्रकल्‍पांतर्गत फळपीकावरील कीड-रोगाबाबतचे निरीक्षण योग्‍यरित्‍या झाल्‍यास योग्‍य व अचुक सल्‍ला शेतक-यांना देणे शक्‍य होईल. यामुळे शेतक-यांना प्रतिबंधात्‍मक उपाय करता येऊन फळपीकांचे मोठे नुकसान टाळता येईल.
संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, हॉर्टसॅप प्रकल्‍पात फळपीकांच्‍या लागवडीपासुन रोग-कीडींच्‍या बदोबस्‍ताबाबत मार्गदर्शन व्‍हावे तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, राज्‍यातील क्रॉपसॅप प्रकल्‍प जगाला प्रेरणा देणारा ठरला असुन त्‍याच धर्तीवर हा हॉर्टसॅप प्रकल्‍पामुळे फलोत्‍पादक शेतक-यांचा कीड-रोग व्‍यवस्‍थापनावरील होणारा मोठा खर्च आटोक्‍या आणण्‍यासाठी उपयोग होईल. लोकप्रतिनिधीच्‍या मागणीनुसार शासनाने हॉर्टसॅप प्रकल्‍पास सुरूवात केल्‍याची माहिती कुलसचिव डॉ डी एल जाधव यांनी दिली. यावेळी श्री विजयकुमार राऊत यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
प्रास्‍ताविकात किटकशास्‍त्र विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर यांनी हॉर्टसॅप प्रकल्‍पाची माहिती दिली. याप्रसंगी मोसंबीवरील किंडीची ओळख व व्‍यवस्‍थापन याविषयावरील घडीपत्रीकेचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ डी जी मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा बी व्‍ही भेदे यांनी केले. याप्रसंगी विद्यापीठातील व कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ बी बी भोसले, डॉ एम बी पाटील, डॉ एच के कौसडीकर, डॉ ए जी सुर्यवंशी, डॉ जी पी जगताप, डॉ उदय खोडके, डॉ ए जी बडगुजर, प्रा एस टी शिंदे व निलेश पटेल आदी शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 
मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले
मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ अशाेक ढवण 
मार्गदर्शन करतांना संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर
मार्गदर्शन करतांना कुलसचिव डॉ डी एल जाधव