Tuesday, February 10, 2015

गटशेतीच्‍या माध्‍यमातुन कमी खर्चात अधिक उत्‍पादन देणा-या तंत्रज्ञानाचा शेतक-यांनी अवलंब करावा......कुलसचिव डॉ डि एल जाधव

वनामकृविचा उमेद कार्यक्रमास माळसोन्‍ना येथे मोठा प्रतिसाद
मौजे माळसोन्‍ना येथील उमेद उपक्रमाच्‍या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना कुलसचिव डॉ डि एल जाधव, व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ डि एन गोखले, सरपंच मधुकरराव लाड, प्रल्‍हाद लाड, डॉ राकेश आहीरे, आर एन शिंदे आदी
मौजे मालसोन्‍ना येथील उमेद उपक्रमाच्‍या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ डि एन गोखले
परभणी : नैसर्गिक कारणासह शेतीतील वाढता खर्च व शेतमालाला कमी बाजारभाव यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असुन गटशेतीच्‍या माध्‍यमातुन कमी खर्चात अधिक उत्‍पादन देण्‍यारे तंत्रज्ञानाचा शेतक-यांनी अवलंब करावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ डि एल जाधव यांनी केले.
मराठवाडयात कमी पर्जन्‍यमानामुळे शेतकरीवर्ग अडचणीत आला असुन शेतक-यांनी नाऊमेद न होता प्राप्‍त परिस्थितीला धीराने सामोरे जाण्‍यासाठी कृषि विद्यापीठाच्‍या वतीने ‘उमेद’ उपक्रम कुलगुरु मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलू यांच्‍या संकल्‍पनेने विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात येत असुन या उपक्रमातंर्गत कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने दि १० फेब्रुवारी रोजी माळसोन्‍ना येथे कार्यक्रम घेण्‍यात आला, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले तर जल व्‍यवस्‍थापन संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ ए एस कडाळे, गांवचे सरपंच मधुकरराव लाड, विभाग प्रमुख डॉ राकेश आहिरे, मुख्‍याध्‍यापक आर एन शिंदे, प्रल्‍हाद लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलसचिव डॉ डि एल जाधव पुढे म्‍हणाले, की मानवाचे आयुष्‍य हे अमुल्‍य असुन शेतक-यांनी मित्राशी व कुटुबातील सदस्‍याशी संवाद साधल्‍यास मनातील दु:खाचे मळभ दुर होतील. अध्‍यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ डि एन गोखले म्‍हणाले, की शेतक-यांनी एकाच पीकाच्‍या मागे न लागता, या भागातील हवामान व जमिनीचा अभ्‍यास करून पीकांची निवड करावी. बाजारात भाव असेल तेव्‍हा बाजारात शेतमाला विक्रीसाठी आणण्‍याची एैपत जेव्‍हा शेतक-यांत येईल, तेव्‍हाच शेतक-यांची प्रगती होईल, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. जल व्‍यवस्‍थापन शास्‍त्रज्ञ डॉ ए एस कडाळे यांनी आपल्‍या भाषणात मुलस्‍थानी जलसंधारण, शेततळे, शेतीची बांधबंदिस्‍ती आदी विषयावर मार्गदर्शन केले.  

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ राकेश आहिरे यांनी केले तर सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे व आभार प्रदर्शन गोविंद लाड यांनी केले. मुख्‍याध्‍यापक श्री आर एन शिंदे यांच्‍या सहकार्याने शाळेच्‍या विद्यार्थ्‍याची गावात प्रभातफेरी काढुण जागर करण्‍यात आला. कार्यक्रमास गांवातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी तुकाराम दहे, चद्रशेखर नखाते, कृषि अधिकारी बी पी घोगाळे, ग्रामसेवक श्री चिलगर, कृषि सहायक श्री मानोलीकर, तलाठी श्री झिंगे, उपसरपंच बालासाहेब पुर्णे, केशवराव चव्‍हाण, माणिक चव्‍हाण, मुजांजी लाड, आनंद लाड, कृषि विस्‍तार विभागाचे विद्यार्थी यांनी सहाकार्य केले. 
गावातुन प्रभारफेरी काढण्‍यात आली त्‍याप्रसंगी

Monday, February 9, 2015

शेतीत यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही ......... कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

मौजे मानोली (ता. मानवत,जि. परभणी) येथील शेतकरी मेळावास मोठा प्रतिसाद
विद्यापीठाने विकसित केलेली ज्‍वारीचे परभणी मोती वाणांच्‍या पथदर्शी प्रात्‍यक्षिकाची पाहणी करतांना कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, प्रगतशील शेतकरी मदनमहाराज शिंदे, डॉ एच व्‍ही काळपांडे आदी
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु 
परभणी: शेतीतील वाढता निविष्‍ठा व मजुरीचा खर्च, त्‍या तुलनेत पीकांना मिळणारा कमी बाजारभाव यामुळे शेतकरी अडजणीत येत आहे. पीक काढणीच्‍या वेळी मजुरांची टंचाई यावर शेतीचे यांत्रिकीकरण करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ज्‍वार संशोधन केंद्र व हैद्राबाद येथील ज्‍वार संशोधन संचालनालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दि १ फेब्रुवारी रोजी मानवत तालुक्‍यातील मौजे मानोली (ता.मानवत, जि.परभणी) येथे शेतकरी मेळावाचे आयोजन करण्‍यात आले होते, मेळाव्‍याच्‍या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रगतशील शेतकरी मदन महाराज शिंदे होते तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, अवधुत शिंदे, कृषी अधिकारी श्री तोष्‍णीवाल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले, की देशापातळीवरील केलेल्‍या एका सर्व्‍हेक्षणात असे निर्देशानात आले की दुसरा पर्याय उपलब्‍ध झाल्‍यास ४० टक्‍के शेतकरी शेती व्‍यवसाय सोडण्‍यास तयार आहेत. दुष्‍काळस्थित शेती टिकवायची असेल तर शेती पुरक जोडधंद्याशिवाय गत्‍यंतर नाही. जोडधंद्यामध्‍ये पशुपालन हा मुख्‍य व्‍यवसाय असुन त्‍यासाठी चारापिके घ्‍यावी लागणार आहेत. परंतु दुष्‍काळस्थित चा-याचा प्रश्‍न गंभीर होत असुन मराठवाडयातील चा-याचे क्षेत्र कमी होत आहे. यासाठी ज्‍वारीचे महत्‍व वाढत असुन ज्‍वारी काढणीसाठी मजुरांचा मोठा खर्च होतो, त्‍याकरिता कृषि विद्यापीठाने हैद्राबाद येथील इक्रीसॅट व क्रीडा यांच्‍याकडुन ज्‍वारीच्‍या काढणी व मळणी यंत्राची मागणी केली असुन त्‍याचे शेतक-यांच्‍या शेतावर लवकरच प्रात्‍यक्षिके घेण्‍यात येतील. मानोली गावातील शेतकरी कृषी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांशी सतत संपर्कात राहुन प्रगत तंत्रज्ञानाच्‍या जोरावर पीक उत्‍पादनात वाढीचा आदर्श इतर शेतक-यांपुढे ठेवला आहे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर भाषणात म्‍हणाले, की हैद्राबाद येथील ज्‍वार संशोधन संचालनालयाच्‍या मार्फत वनामकृविने परभणी जिल्‍हयातील मौजे मानोली, रामेटाकळी व इंदेवाडी या गावांमध्‍ये रब्‍बी ज्‍वारीचे परभणी मोती व परभणी ज्‍योती वाणाची पथदर्शी पीक प्रात्‍यक्षिके ७५ एकरावर घेण्‍यात आली असुन त्‍यांची परिस्थिती समाधानकारक आहे. आज ज्‍वारीचे मुल्‍यवर्धनासाठी प्रक्रिया उद्योगाची गरज असुन शेतक-यांना शेतमालाच्‍या बाचारपेठेचे तंत्र शिकावे लागेल. कमी खर्चात उत्‍पादन वाढविण्‍याचे तंत्रज्ञान विद्यापीठाकडे असुन शेतक-यांनी त्‍याचा अवलंब करावा, असे मत प्रगतशील शेतकरी मदन महाराज शिंदे यांनी मनोगतात व्‍यक्‍त केले.
प्रास्‍ताविकात ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एच व्‍ही काळपांडे यांनी रब्‍बी ज्‍वार पथदर्शी प्रकल्‍पाबाबत माहिती दिली. मेळाव्‍यात ज्‍वार कृषीविद्यावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे, ज्‍वार कीटकशास्‍त्रज्ञ डॉ. मो. इलियास, ज्‍वार पैदासकर प्रा अंबिका मोरे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ आर एल औढेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ यु एन आळसे यांनी केले.
याप्रसंगी रबी ज्‍वार पथदर्शी पीक प्रात्‍यक्षिक प्रक्षेत्रास शेतक-यांनी व मान्‍यवरांनी भेट देऊन विद्यापीठाच्‍या विविध वाणाची पा‍हणी केली. मेळाव्‍यास मानोली, इंदेवाडी व रामे टाकळी येथील शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थिती होते.


Saturday, February 7, 2015

नृसिंह पौखर्णी येथे वनामकृविच्‍या ‘उमेद’ उपक्रमातंर्गत कार्यक्रम संपन्‍न

नृसिंह पौखर्णी येथे उमेद उपक्रमातंर्गत शेतक-यांना मार्गदर्शन करतांना डॉ आनंद गोर, याप्रसंगी विभाग प्रमुख डॉ प्रभा अंतवाड, तालुका कृषि अधिकारी श्री गिरी, मुख्‍याध्‍यापक श्री होरगुळे आदी.
परभणी : मराठवाडयात कमी पर्जन्‍यमानामुळे शेतमालाचे अपेक्षित उत्‍पादन न मिळाल्‍याने शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. शेतक-यांनी नाऊमेद न होता प्राप्‍त परिस्थितीला सामोरे जाण्‍यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने उमेदउपक्रम कुलगुरु मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलू यांच्‍या संकल्‍पनेने विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात असुन याउपक्रमातंर्गत गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने दि ५ फेब्रुवारी रोजी नृसिंह पोखर्णी येथे कार्यक्रम घेण्‍यात आला. कार्यक्रमास कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ आनंद गोरे, विभाग प्रमुख डॉ प्रभा अंतवाल, मुख्‍याध्‍यापक श्री होरगुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ आनंद गोरे यांनी कृषि तंत्रज्ञान व समुहशेती यावर शेतक-यांना मार्गदर्शन करून शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या, त्‍यांची कारणे व उपाय याबाबींची चर्चा केली तर तालुका कृषि अधिकारी श्री गिरी यांनीही शेतक-यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमांतर्गत शाळेचे मुख्‍याध्‍यापक श्री होरगुळे व इतर शिक्षकांचे सहकार्याने शाळाच्‍या व गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍याची प्रभातफेरी काढण्‍यात आली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ प्रभा अंतवाल यांनी केले तर आभार प्रदर्शन चित्रा बेल्‍लुरकर यांनी केले. कार्यक्रमास शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थिती होते.
उमेद उपक्रमांतगर्त काढण्‍यात आलेली प्रभातफेरी

Friday, February 6, 2015

वनामकृविच्‍या सेवानिवृत्‍तधारकांचे सेवानिवृत्‍तीचे लाभ मिळण्‍यासाठी शासनाकडुन रू २२.५९ कोटी मंजुर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या सेवेतुन सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात सेवानिवृत्‍त झालेल्‍या कर्मचा-यांना अनुदान अभावी सेवानिवृत्‍तीनंतरचे लाभ अदा करण्‍यात आले नव्‍हते. त्‍यामुळे नियंत्रक कार्यालयाने शासनाकडे सतत पाठपुरावा केल्‍यामुळे शासनाने दि १९ जानेवारी रोजीच्‍या शासन निर्णय क्र मकृवि-१२१४/प्रक्र१०९/८-अे अन्‍वये सन २०१३-१४ व सन २०१४-१५ या वर्षात सेवानिवृत्‍त झालेल्‍या कर्मचा-यांचे संपुर्ण लाभ अदा व्‍हावे यासाठी पुरक मागणीव्‍दारे रू २२.५९ कोटी मंजुर करून विद्यापीठास वितरीत केले आहेत. ज्‍या सेवानिवृत्‍तीधारकांना सेवानिवृत्‍तीचे लाभ मिळालेले नाही अशा कर्मचा-यांनी नियंत्रक कार्यालयाच्‍या निर्देशाप्रमाणे आवश्‍यक कागदपत्रे सादर करण्‍यासाठी संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठाकडुन करण्‍यात आले आहे. 

वनामकृवित मुख्‍य पीकाकरीता पीक संरक्षण याविषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्‍न

प्रशक्षिण कार्यक्रमाचे उदघाटन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, याप्रसंगी डॉ के टि आपेट, डॉ पी आर झंवर, प्रा पी एस चव्‍हाण आदी

परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने मानव संसाधन विकास प्रकल्‍पातंर्गत मुख्‍य पीकाकरीता पीक संरक्षण याविषयावर दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन दि ५ व ६ फेब्रवारी रोजी करण्‍यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांचे हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ के टी आपेट व डॉ पी आर झंवर यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनपर भाषणात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले म्‍हणाले, की विद्यापीठातील तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत योग्‍य वेळी पोहचविण्‍यासाठी कृषि विज्ञान केंद्रातील विषय तज्ञांची महत्‍वाची भुमिका असुन पीक संरक्षणाबाबत अद्यावत ज्ञान तज्ञांना असणे आवश्‍यक आहे. योग्‍य वेळी प्राप्‍त तंत्रज्ञानाचा उपयोग शेतक-यांनी केल्‍यास पीकांवरील रोग व किडीचे व्‍यवस्‍थापन प्रभावीपणे करता येईल. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमात २५ मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषतज्ञ व कार्यक्रम समन्‍वयक यांनी सहभाग नोंदवीला. प्रशिक्षणात वनस्पती विकृ‍ती शास्‍त्रज्ञ व किटकशास्‍त्रज्ञ डॉ डि जी मोरे, डॉ जी पी जगताप, डॉ ए एल बडगुजर, डॉ डि डि पटाईत, डॉ बी व्‍ही भेदे, डॉ डि आर कदम, डॉ पी के ढोके, डॉ आनंद गोरे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ पी आर देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ पी एस चव्‍हाण, डॉ चिक्षे, श्री ठाकणे, अशोक पंडीत, श्री जीवने आदींनी परिश्रम घेतले.

प्रशक्षिण कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, व्‍यासपीठावर डॉ पी आर देशमुख, डॉ के टि आपेट, डॉ पी आर झंवर, प्रा पी एस चव्‍हाण आदी

Wednesday, February 4, 2015

उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या विद्यार्थीनी –हदयस्‍पर्शी एकांकीका सादर करून जागवली शेतक-यांत उमेद

उपस्थितांचे डोळेही पाणावले, वनामकृविच्‍या उमेद उपक्रमातंर्गत कार्यक्रम
कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले
परभणी : मराठवाडात कमी पर्जन्‍यमानामुळे शेतमालाचे अपेक्षित उत्‍पादन न मिळाल्‍याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. शेतक-यांनी नाऊमेद न होता प्राप्‍त परिस्थितीला सामोरे जाण्‍यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने उमेदउपक्रम कुलगुरु मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलू यांच्‍या संकल्‍पनेने विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले व शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात येत आहे. उमेद उपक्रमांतर्गत परभणी येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या वतीने पुर्णा तालुक्‍यातील मौजे बलसा (बु) येथे दि. ३१ जानेवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्‍हणुन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले हे होते तर अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ. अरुण कदम तर डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. आनंद गोरे, डॉ. जी. पी. जगताप, प्रा. लोहकरे, मुख्‍याध्‍यापक श्री झंवर, कृषि सहाय्यक श्री मस्‍के आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या स्‍वयंसेवकांनी डॉ. व्‍ही. व्‍ही. भगत यांच्‍या मार्गदर्शनाखाली शेतक-यांच्‍या जीवनावरील आत्‍महत्‍याविषयीची –हदयस्‍पर्शी एकांकीका सादर केली, ही एकांकीका पाहुन उपस्थितीतांचे डोळेही पाणावले. या एकांकीकेव्‍दारे सद्यस्थितीत शेतक-यांनी नाऊमेद न होता प्राप्‍त परिस्थितीला धीराने सामोरे जाण्‍याचा संदेश देण्‍यात आला. तसेच राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या व गावातील शालेय विद्यार्थ्‍यामार्फत कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.पी. सोळंके यांच्‍या मार्गदर्शनाखाली गावामध्‍ये प्रभातफेरीचे काढण्‍यात आली, याचे उद्घाटन सरपंच सुरेशराव डुबे यांनी केले.
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी शेतक-यांना शाश्‍वत शेतीबाबत मार्गदर्शन करतांना म्‍हणाले, की पिकांवरील विविध किड व रोग व्‍यवस्‍थानासाठी एकात्मिक पध्‍दतीने व्‍यवस्‍थापन करावे यामुळे फवारणीचा खर्च कमी करता येईल, किड व रोगाचे नियंत्रन योग्‍यरित्‍या होईल. याप्रसंगी शेतक-यांच्‍या विविध शेतीविषयक शंकाचे त्‍यांनी उत्‍तरे देवुन शेतक-यांचे समाधान केले. प्राचार्य डॉ अरूण कदम यांनी शेतीमध्‍ये कोरडवाहू फळ झाडाची लागवड व कमी खर्चात जास्‍त उत्‍पादनासाठीच्‍या उपायाविषयी मार्गदर्शन केले. प्रा. एम. आर. मोरे यांनी जलसंधारणाविषयी कविता सादर करुन मुळस्‍थानी पाण्‍याचे पुनर्भरण व नियोजनाविषयी माहिती दिली. शेतकरी भागवत भुसारे, ज्ञानेश्‍वर शिंदे, ज्ञानेश्‍वर डुबे यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी सोपानराव डुबे, बालासाहेब डुबे, शंकर जेडगे, मुंजा डुबे, शिवाजी डुबे, संतोष शिंदे, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रेणुका पवार व शाम कुंवर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. बी. एम. कलालबंडी यांनी केले. कार्यक्रमास गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकांकीका सादर करतांना राष्‍ट्रीय सेवा योजनेचे स्‍वयंसेवक

Monday, February 2, 2015

वनामकृविचा ऊरूसानिमित्‍त संदल

परभणी येथील प्रसिध्‍द हजरत सयद शाह तुराबुल हक यांच्‍या ऊरूसानिमित्‍त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कर्मचा-यांच्‍या वतीने दि २ फेब्रुवारी रोजी संदल काढण्‍यात आला. या संदलचा प्रारंभ शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्‍ही डी पाटील, प्रा दिलीप मोरे, श्री दिवाकर काकडे, डॉ सुरेश वाईकर, डॉ अनिल धमक, रामसिंग पवार, सुनिल खलाळ, श्रीराम घागरमाळे, कृष्‍णा जावळे, दाऊद खान, मोईनभाई, जाफर अली, श्री भालेराव, कौशाबाई मगर आदी उ‍पस्थित होते.