परभणी: वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने मानव संसाधन
विकास प्रकल्पातंर्गत मुख्य पीकाकरीता पीक संरक्षण याविषयावर दोन दिवसीय
प्रशिक्षणाचे आयोजन दि ५ व ६ फेब्रवारी रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे
उद्घाटन विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ के टी आपेट व डॉ पी आर झंवर यांची प्रमुख उपस्थिती
होती. उद्घाटनपर भाषणात विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले म्हणाले, की विद्यापीठातील तंत्रज्ञान
शेतक-यांपर्यंत योग्य वेळी पोहचविण्यासाठी कृषि विज्ञान केंद्रातील विषय
तज्ञांची महत्वाची भुमिका असुन पीक संरक्षणाबाबत अद्यावत ज्ञान तज्ञांना असणे
आवश्यक आहे. योग्य वेळी प्राप्त तंत्रज्ञानाचा उपयोग शेतक-यांनी केल्यास
पीकांवरील रोग व किडीचे व्यवस्थापन प्रभावीपणे करता येईल. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमात २५ मराठवाडयातील कृषि
विज्ञान केंद्राचे विषय विशेषतज्ञ व कार्यक्रम समन्वयक यांनी सहभाग नोंदवीला.
प्रशिक्षणात वनस्पती विकृती शास्त्रज्ञ व किटकशास्त्रज्ञ डॉ डि जी मोरे, डॉ जी पी जगताप, डॉ ए एल बडगुजर, डॉ डि डि
पटाईत, डॉ बी व्ही भेदे, डॉ डि आर कदम, डॉ पी के ढोके, डॉ आनंद गोरे
आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ पी आर
देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ पी एस चव्हाण, डॉ चिक्षे, श्री ठाकणे, अशोक पंडीत, श्री जीवने आदींनी परिश्रम घेतले.
|
प्रशक्षिण कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, व्यासपीठावर डॉ पी आर देशमुख, डॉ के टि आपेट, डॉ पी आर झंवर, प्रा पी एस चव्हाण आदी
|