परभणी येथील प्रसिध्द हजरत सयद शाह तुराबुल हक यांच्या
ऊरूसानिमित्त वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कर्मचा-यांच्या वतीने दि २ फेब्रुवारी रोजी संदल काढण्यात आला.
या संदलचा प्रारंभ कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांच्या हस्ते करण्यात
आला. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव
डॉ विलास पाटील, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डि एन गोखले, विभाग प्रमुख
डॉ बाबासाहेब ठोंबरे, दाऊद खान, मोईनभाई, याकुब अली, जाफर अली आदी उपस्थित
होते.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Friday, February 3, 2017
Friday, January 27, 2017
जिजाऊ व सावित्रीबाई यांच्या विचारांची आजही गरज.....प्रख्यात वक्त्या मा. अॅड. सौ. वैशालीताई डोळस
वनामकृविच्या कृषि महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन
राजमाता जिजाऊनी राजे शिवाजी घडविले, स्वराज्य स्थापन केले. आज जिजाऊचे स्वराज्याचे
स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. समाजात आजही अनेक
अंधश्रध्दा आहेत, आपण कृत्रिम गोष्टींवर भर देत आहोत, समाजात मुलभूत परिवर्तन करण्यासाठी
वास्तववादी झाले पाहिजे, असे प्रतिपादन प्रख्यात वक्त्या मा. अॅड. सौ.
वैशालीताई डोळस यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्या
वतीने राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन
दिनांक २७ जानेवारी रोजी करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण हे होते तर व्यासपीठावर
विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ
धर्मराज गोखले, प्राचार्य प्रा पी एन सत्वधर, प्राचार्य डॉ अशोक कडाळे, डॉ हेमा
सरंबेकर, विद्यार्थ्यी प्रतिनिधी कृष्णा होगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. अॅड. सौ. वैशालीताई डोळस पुढे म्हणाल्या की, देशाला व राज्याचा मोठा
इतिहास असुन समाज घडविण्यात अनेक समाजसुधारकांनी आपले योगदान दिले आहे, इतिहासाची
पाने युवकांनी चाळली पाहिजे. सुसंस्कत समाज घडविण्यासाठी जिजाऊ व सावित्रीबाई
यांच्या विचारांची आजही गरज आहे. अनेक स्त्रीयांनी त्यांच्या चरित्रपासुन
प्रेरणा घेऊन समाजहितांची कर्तव्य केले आहे. आज राजकारणात महिला पुढे येत आहेत, परंतु त्यांच्या
वतीने पुरूषच कारभार करित आहेत, आजही सावित्रीबाईना अपेक्षित स्त्री-पुरूष समानता
प्राप्त करू शकलो नाही. उच्च शिक्षणात स्त्रीचा सहभाग वाढवावा लागेल. आज
सावित्रीबाईनाच्या चिकित्सक शिक्षण पध्दतीची समाजास आवश्यकता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्हणाले की, जिजाऊ व सावित्रीबाई यांचे विचार काळाच्या पुढचे होते. आजही स्त्री शिक्षणात आपणास मोठा पल्ला गाठावयाचा आहे.
कार्यक्रमाचेे प्रास्तविक प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले. वक्त्यांचा
परिचय डॉ नंदकिमोर भुते यांनी करून दिला तर सुत्रसंचालन संदिप खरबळ यांनी केले व
आभार कृष्णा होगे यांनी मानले. कार्यक्रमात कृषि महाविद्यालयाच्या वतीने
आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती गवते हिचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात
आला. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यी
मोठया संख्येने उपस्थित होते. यानिमित्त रक्तदान शिबीराचे ही आयोजन करण्यात
आले होते, यात एकशेसात विद्यार्थी-विद्यार्थींनी रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी
महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यीनी परिश्रम घेतले.
वनामकृवित प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ६८ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या मुख्य
प्रागंणात कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात
आले. यावेळी
शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन
संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार
शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, विद्यापीठ
नियंत्रक श्री विनोद गायकवाड, विद्यापीठ अभियांता
श्री रूमणे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिकारी, कर्मचारी व
विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय
छात्रसैनिकांनी छात्राधिकारी ले प्रा आशिष बागडे यांच्या नेतृत्वाखाली माननीय कुलगुरूनां सलामी देण्यात आली. कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु
यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. माननीय
कुलगुरूच्या हस्ते परभणीतील आंतरराष्ट्रीय धावपटु ज्योती गवते हीचा विद्यापीठाच्या वतीने गौरव करण्यात
आले.
26
Wednesday, January 25, 2017
Saturday, January 21, 2017
कृषिक्षेत्रात मुलभूत संशोधनात अधिक गुंतवणूक करणे गरजेचे........ कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
वनामकृवित शिक्षण व संशोधन
क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या कौशल्य विकासावर एकवीस दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन
कोणत्याही संस्थेचे भविष्य
हे उपलब्ध मनुष्यबळावर अवलंबुन असते, हे मनुष्यबळ प्रशिक्षीत करण्यासाठी कौशल्य
विकासावर भर द्यावा लागेल. कृषि संशोधनात उपयोजित
संशोधनावर आपण जास्त भर देतो, परंतु भविष्यात मुलभूत संशोधनाकरिता गुंतवणूक
वाढवावी लागेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्या वतीने मृदा, पिक, जल, अन्न, चारा संशोधन व अद्यावत परिक्षण तंत्रज्ञान कौशल्य विकास
या विषयावरील एकवीस दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन २० जानेवारी ते ९ फेब्रूवारी दरम्यान करण्यात आले असुन सदरिल
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एस. कदम हे
उपस्थित होते तर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. डॉ पी आर शिवपुजे,
शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण
संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ विलास पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू
मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु पुढे म्हणाले की, मुलभूत संशोधनात कार्य करण्यासाठी
कृषि शास्त्रज्ञांना मोठा वाव आहे. विविध विषयात ही आंतर शाखीय संशोधन झाले पाहिजे
तरच आपण नवनवीन शोध लावु शकु. संशोधन करतांना शास्त्रज्ञांनी विशिष्ट चौकटीबाहेर
पडुन संशोधन केल्यास निश्चितच समाजाचा फायदा होईल. विदेशात प्राध्यापक वर्गास
समाजात मोठा मान असतो, आपल्याही देशात प्रत्येक प्राध्यापकांनी समाजासाठी
संशोधनातुन कार्य केलयास निश्चितच ते स्थान प्राप्त होऊ शकते.
माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एस.
कदम आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, आज शेतीत अतिरिक्त रासायनिक
खते व पाण्याचा वापरामुळे मोठे नुकसान होत आहे. कृषि विकासासाठी काटेकोर शेती तंत्रज्ञानावर
अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. शेतक-यांची कृषिक्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी विविध
विषयात आंतर शाखीय संशोधन करावे लागेल. संशोधनास गती देण्यासाठी विद्यापीठातील संशोधन
व प्राध्यापकांच्या कौशल्य विकासावर भर द्यावा लागेल, यासाठी सदरिल प्रशिक्षणासारखे
कार्यक्रय उपयूक्त ठरतात, असे प्रतिपादन त्यांनी केले.
जल व मृदाच्या गुणधर्मात
वरचेवर –हास होत असुन समाजाच्या कल्याणासाठी जल व मृदाचे गुणधर्मात सुधारणा करणे
गरजेचे असल्याचे मत कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. डॉ पी आर शिवपुजे यांनी व्यक्त
केले तर केंद्र शासनाने हाती घेतलेला मृदा आरोग्य पत्रिका वाटप व त्याचा वापर
यशस्वीतेसाठी कृषि शास्त्रज्ञांना प्रयत्न करावा लागेल, असे मत शिक्षण संचालक
डॉ अशोक ढवण यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात
प्रशिक्षण आयोजक कुलसचिव तथा विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांनी प्रशिक्षणाबाबत माहिती
दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ सय्यद ईस्माईल यांनी केले आभार प्रदर्शन डॉ
सुरेश वाईकर यांनी केले. याप्रसंगी विद्यापीठातील मृदाशास्त्रज्ञ लिखित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. सदरिल प्रशिक्षणात बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या पर्यावरण विषयक तसेच अन्नधान्य, मृदा, जल, पिके, प्राणी आदीवर होणाऱ्या परिणामाबाबत मान्यवरांचे व्याख्यानेे होणार आहेत. कौशल्य विकासासोबत
व्यक्तीमत्व विकास या विषयावार मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी भारतातील
नामांकित संस्थामधील शास्त्रज्ञ डॉ.
पी. चंद्रशेखर राव (हैद्राबाद), डॉ. भुपालराज (हैद्राबाद), डॉ. अंजली पारसनिस (मुंबई), डॉ. अे. एल. फरांदे (राहुरी), डॉ. व्हि. के. खर्चे (अकोला), डॉ. अे. डी. कडलग (राहुरी), तसेच विद्यापीठातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
प्रशिक्षणाचा सहभागी प्रशिक्षणार्थीना शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात कौशल्य विकासासाठी फायदा होणार आहे. प्रशिक्षणात शिक्षण व संशोधन क्षेत्रातील
३० शास्त्रज्ञ सहभागी झाले
आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॅा. अनिल धमक, डॉ. महेश देशमुख, प्रा. प्रभाकर
अडसुळ, प्रा. सनिल गलांडे, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. एस.पी. झाडे, डॉ. सदाशिव
अडकीणे, श्री अनिल मोरे व इतर कर्मचारी परिश्रम घेतले.
शहर स्वच्छता मोहिमेत वनामकृविच्या विद्यार्थ्यांचा मोलाचा सहभाग.....कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
वनामकृविच्या वतीने परभणी शहर स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेसाठी जनजागृती रॅलीचे
आयोजन
शहर व परिसर स्वच्छतेसाठी प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी उजलली पाहिजे. स्वच्छता मोहिम केवळ कार्यक्रमापुरतीच सीमीत न राहता, स्वच्छता ही सवयीचा भाग झाला पाहीजे. परभणी शहर स्वच्छता मोहिमेत वनामकृविच्या विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चितच मोलाचा ठरेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व परभणी शहर महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहिमेचे कृषि महाविद्यालयात आयोजन दिनांक २१ जानेवारी रोजी करण्यात आले होते, याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हाधिकारी मा. श्री. राहुल रंजन महिवाल, माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एस. कदम, महापौर मा. संगिताताई वडकर, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. डॉ. प्रल्हाद शिवपुजे, हे उपस्थित होते तर शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव डॉ. विलास पाटील, प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. पी एन सत्वधर, प्राचार्य डॉ अशोक कडाळे, प्राचार्य डॉ अरूण कदम, प्रा. हेमा सरंबेकर, मनपा अतिरिक्त आयुक्त श्री. अजिज कारचे, केंद्र शासनाचे स्वच्छता सर्वेक्षण समिती सदस्य श्री सिंतेंद्र त्रिवेदी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु पुढे म्हणाले की, विद्यापीठाचे विद्यार्थी गेल्या दोन वर्षापासुन सातत्याने स्वच्छता मोहिम राबवुन स्वच्छतेप्रती जनजागृतीत सहभाग नोंदवीत आहेत, याची दखल राज्याचे माननीय राज्यपाल महोद्यांनी देखिल वेळोवेळी घेतली आहे. कृषिचे विद्यार्थ्यीचे हे कार्य निश्चितच कौतुकास पात्र आहे.
जिल्हाधिकारी मा. श्री. राहुल रंजन महिवाल आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, वनामकृविच्या विद्यार्थ्यांनी शहर स्वच्छता मोहिमेत गेली दोन वर्षापासुन भरीव योगदान दिले असुन स्वच्छता मोहिमेत प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्वाचा आहे. सांडपाणी व्यवस्थापन, कच-यांचे योग्य विल्हेवाट आदी तांत्रिक गोष्टीत सुधारणा करण्यास मोठा वाव आहे. परभणी स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या सहकार्याने शहराच्या क्रमांकात निश्चितच सुधारणा होत आहे.
माजी कुलगुरू मा. डॉ. एस. एस. कदम व शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यी गेल्या दोन वर्षापासुन सातत्याने स्वच्छता मोहिमे योगदान देत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती सुषमा कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.
यावेळी स्वच्छता जनजागृती प्रभात फेरीची सुरवात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन करण्यात आली. प्रभात फेरीची सांगता स्टेडियमवर स्वच्छतेवर आधारित पथनाटयाच्या सादरीकरणाने झाली. कार्यक्रमास कृषि महाविद्यालय, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, गृहविज्ञान महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या स्वयंसेवकासह विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)





