तुर, सोयाबीन, ज्वारी, मुग पिकांचे बियाणे उपलब्ध
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Tuesday, May 16, 2023
दिनांक १८ मे रोजी विद्यापीठ निर्मित सत्यतादर्शक बियाणे विक्रीस सुरूवात
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा
५१ वा वर्धापन दिन, मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी
वर्ष आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचे औचित्य साधुन विस्तार शिक्षण संचालनालय
आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप पिक परिसंवादाचे
आयोजन गुरूवार दिनांक १८ मे रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण
अधिकारी कार्यालयाजवळील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि हे राहणार असुन उदघाटक तथा मुख्य अतिथी
म्हणुन अमेरिकेतील कनेक्टीकट विद्यापीठाचे अधिष्ठाता तथा संचालक मा प्रा इंद्रजीत
चौबे हे उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमास अहमदाबाद (गुजरात) येथील बन्सी
गीर गोशाळेचे अध्यक्ष मा श्री गोपालभाई सुतारीया, शिक्षण
संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन
संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार
शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहेत.
दिनांक १८ मे रोजी विद्यापीठ निर्मित
विविध पिकांचे सत्यतादर्शक बियाणे विक्रीची सुरूवात करण्यात येणार असुन यात सोयाबीन
पिकातील एमएयुएस-१६२, एमएयुएस-१५८ आणि एमएयुएस-७१ जातीचे बियाणे
उपलब्ध असुन या बियाण्याची २६ किलो बॅगची किंमत ३९०० रूपये आहे. तसेच तुर पिकात बीडीएन-७१६
(लाल) व बीडीएन-७११
(पांढरी) या वाणाच्या
६ किलो बॅगची किंमत १०५० रूपये असुन बीडीएन-१३-४१ (गोदावरी) (पांढरी) या वाणाची
२ किलो बॅगची किंमत ३५० रूपये आहे. ज्वारी मध्ये परभणी शक्ती या जैवसंपृक्त वाण
४ किलो बॅगाची किंमत ४०० रूपये असुन मुगाची बीएम-२००३-२ या वाणाची ६ किलो बॅगची किंमत १०८० रूपये आहे.
ज्वारीचे परभणी शक्ती वाण : विद्यापीठ
विकसित परभणी शक्ती हे वाण देशातील पहिले जैवसंपृक्त वाण असुन खरीप हंगामाकरिता महाराष्ट्र
राज्यात लागवडीकरिता शिफारस केले आहे. याचा पिक कालावधी ११५-१२० दिवसाचा असुन उत्पादन
क्षमता हेक्टरी ३६ ते ३८ क्विंटल असुन कडब्याचे उत्पादन क्षमता हेक्टरी ११०-११५
क्विंटल आहे. यात लोह व जस्ताचे प्रमाण इतर सर्वसाधारण वाणापेक्षा जास्त असुन त्यामुळे
हे वाण आरोग्यवर्धक वाण आहे. यात प्रती किलो बियाण्यात लोह ४२ मिग्रॅ व जस्त २५
मिग्रॅ प्रमाण आहे.
तुर पिकांचे बीडीएन-७११ (बीडीएन २००४-३): वाणाच्या दाण्याचा रंग पांढरा असुन कमी कालावधीत म्हणजेचे
१५०-१६० दिवसात तयार होणारा आहे. याची कोरडवाहु लागवडी करिता शिफारस करण्यात आली असुन
मर व वांझ रोगास प्रतिकारक आहे, याची उत्पादन
क्षमता हेक्टरी १६ ते १८ क्विंटल आहे.
तुर पिकांचे बीडीएन-७१६ : या वाणाच्या
दाण्याचा रंग लाल असुन १६५ ते १७० दिवसात तयार होतो. या वाणाची महाराष्ट्रात खरीप
हंगामाकरिता लागवडीकरिता शिफारस करण्यात आली आहे. याची उत्पादन क्षमता हेक्टरी १८
ते २० क्विंटल असुन मर व वांझ रोगास प्रतिबंधक असुन उत्तम प्रतीची दाळ शिजण्याची
गुणवत्ता चांगली आहे.
तुर पिकांचे बीडीएन – २०१३-४१ (गोदावरी) : हा वाणाच्या दाण्याचा रंग पांढरा असुन
अधिक उत्पादन देणारा म्हणजेचे हेक्टरी २० ते २५ क्विंटल आहे. हा १६० ते १६५ दिवसात
तयार होणारा वाण असुन मर व वांझ रोगास प्रतिबंधक असुन राज्याकरिता लागवडीकरिता शिफारस
केली आहे. यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असुन प्रति हजार ग्रॅम मध्ये २१.४५ ग्रॅम आहे.
फुलांचा रंग पांढरा असल्यामुळे इतर वाणांपेक्षा वेगळा आहे.
एमएयुएस-७१ (समृध्दी): हा वाण
९३ - ९६ दिवसात तयार होणारा असुन उत्पादन क्षमता हेक्टरी २८
ते ३० क्विंटल आहे. फुलांचा रंग जांभळा असुन दाणा टपोरा आहे. पक्वतेनंतर १० ते १२
दिवस शेंग न फुटता शेतात उभा राहु शकतो. अंतरपिक पध्दतीत लागवड करण्यास योग्य वाण
आहे.
एमएयुएस-१५८ : हा वाण ९५-९८ दिवसात पक्व होणारा
असुन उत्पादन क्षमता हेक्टरी २६-३१ क्विंटल आहे. फुलांचा रंग जांभळा असुन दाणा टपोरा
आहे, पक्ततेनंतर १०-१२ दिवस शेंगा फुटत नाहीत. खोडमाशी किडीस
सहनशील असुन अंतरपिक पध्दतीत लागवड करण्यास योग्य वाण आहे.
Sunday, May 14, 2023
वनामकृवित खरीप पिक परिसंवादाचे आयोजन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा ५१ वा वर्धापन दिन, मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचे औचित्य साधुन विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप पिक परिसंवादाचे आयोजन गुरूवार दिनांक १८ मे रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाजवळील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि हे राहणार असुन उदघाटक तथा मुख्य अतिथी म्हणुन अमेरिकेतील कनेक्टीकट विद्यापीठाचे अधिष्ठाता तथा संचालक मा प्रा इंद्रजीत चौबे हे उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमास अहमदाबाद (गुजरात) येथील बन्सी गीर गोशाळेचे अध्यक्ष मा श्री गोपालभाई सुतारीया, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
परिसंवादात विद्यापीठ शास्त्रज्ञ विविध खरीप पीक लागवड, सोयाबीन, कापुस, ज्वारी, बाजरी, कडधान्य लागवड, भरड धान्याचे महत्व, किड – रोग व्यवस्थापन आदी विषयावर मार्गदर्शन करणार असुन शेतकरी बांधवाच्या कृषी विषयक विविध शंकाचे निरासरण करणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ शास्त्रज्ञ लिखित विविध घडीपत्रिका, पुस्तिका, शेतीभाती मासिकांचे विमोचन करण्यात येणार आहे तसेच विद्यापीठ निर्मित बियाणे विक्रीस सुरूवात होणार आहे. सदर परिसंवादाचे थेट प्रक्षेपण https://www.youtube.com/@VNMKV विद्यापीठ युटयुब चॅनेलवर करण्यात येणार आहे. तरि परिसंवादाचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी घ्यावा, असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री विजय लोखंडे यांनी केले आहे.
Wednesday, May 10, 2023
परभणी कृषि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा
परभणी कृषि महाविद्यालयचे माजी विद्यार्थी अॅड अनंत चोंदे यांनी नुतनीकरण केलेल्या खोलीचे लोकार्पण
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा, ग्रीष्म वसतीगहातील माजी विद्यार्थ्यानी नुतनीकरण केलेल्या खोलीचे लोकार्पण व महाविद्यालयाचे विविध पदावर कार्यरत असलेल्या अधिकारी यांचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे दिनांक ९ मे रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि हे होते तर माननीय आमदार तथा विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मा श्री सुरेशराव वरपुडकर याची उदघाटक म्हणुन उपस्थिती होते. व्यासपीठावर विशेष अतिथी व सत्कारमुर्ती महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा कृषी आयुक्त मा श्री सुनिल चव्हाण, श्रीमती चव्हाण, नाशिकचे पोलीस आयुक्त मा श्री अंकुश शिंदे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, श्री रामभाऊ घाटगे, डॉ सोंडगे, आयोजक प्राचार्य डॉ सय्यद ईस्माइल, कृषी विद्यापीठ पदवीधर संघाचे अध्यक्ष अॅड अनंत चोंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात कृषी आयुक्त मा श्री सुनिल चव्हाण, श्रीमती चव्हाण, नाशिकचे पोलीस आयुक्त मा श्री अंकुश शिंदे आदीसह महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी राज्यातील विविध पदावर कार्यरत अधिकारी, लोकप्रतिनिधी, व उद्योजक यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, स्मृतीचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. ग्रीष्म वसतीगृहातीत खोली क्र ४२ मध्ये वास्तव्यास असणारे सन १९९२ बॅचचे कृषि पदवीचे माजी विद्यार्थी तथा विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे माजी सदस्य अॅड. अनंत चोंदे यांनी स्वखर्चातुन खोलीचे नुतनीकरण केले या खोलीचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, परभणी कृषि विद्यापीठातुन अनेक कृषी पदवीधर देशात व राज्यात विविध पदावर कार्य करत आहेत. आज आपण घडलात याचे मोठे योगदान महाविद्यालयातील शिक्षकांचे मोठे योगदान आहे, त्यांचे ऋुण कधीही विसरू नयेत. या कृषी पदवीधराचे महावि़द्यालय, गुरूजनांशी असलेले नाते आजही अतुट आहे. महाविद्यालयीन वसतीगृहातील कार्यकाळ हा विद्यार्थी जीवनातील मोठा वळणबिंदु असतो. अॅड. अनंत चोंदे या माजी विद्यार्थीनी स्वखर्चातुन तो राहत असलेली खोली अत्यंत चांगल्या पध्दतीने नुतनीकरण केले, हे निश्चितच कौतुकास्पद आहे, याचा आदर्श घेऊन इतर माजी विद्यार्थी पुढे येत आहेत, ही चांगली बाब आहे. शेतकरी व विद्यार्थी हेच कृषि विद्यापीठाच्या कार्याचे हे केंद्रबिंदु त्याकरिता चांगली सेवा – सुविधा देण्याचा विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
उदघाटनपर भाषणात आमदार मा श्री सुरेश वरपुडकर म्हणाले की, परभणी कृषी विद्यापीठाची स्थापना मोठया संघर्षातुन झाली असुन विद्यापीठास मोठा इतिहास आहे. या विद्यापीठातील विद्यार्थी परिपक्व होऊन बाहेर पडतो, समाजाकरिता व शेतीकरिता विविध पदावर आपले भरीव योगदान कृषि पदवीधरांनी दिले आहे. कृषि शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढत असुन ही चांगली बाबी आहे.
मनोगतात कृषी आयुक्त मा श्री सुनिल चव्हाण म्हणाले की, परभणी कृषी महाविद्यालयातील कृषि पदवीधरांनी जिल्हा प्रशासन व कृषि विभागात आपला ठास उमटवला आहे. आजही माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शिक्षकांप्रती आदराची भावना आहे. महाविद्यालयीन मित्रामध्ये अतुट नाते टिकुन आहे, ही संस्कृती जपावी लागणार आहे. परभणी महाविद्यालयात बहुसंख्येने विद्यार्थी ग्रामीण भागाातुन येतात, महाविद्यालयीन वस्तीगृहातील वास्तवात अनेक समस्यांना तोंड देतांना विद्यार्थी घडत असतो, यामुळे नौकरी मध्ये कोणत्याही पदावर काम करतांना अडचण येत नाही. नाशिकचे पोलीस आयुक्त मा श्री अंकुश शिंदे म्हणाले की, महाविद्यालयीन संघर्षमय कार्यकाळातील अनुभवामुळे कृषि पदवीधराचे व्यक्तीमत घडते, पुढे नौकरीत अनेक समस्यां खंबीरपणे हा कृषि पदवीधर तोंड देता, याचा अनुभव मला आहे. विद्यापीठ ग्रंथालय अत्यंत चांगले असुन विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवुन कठोर परिश्रम व सातत्य ठेवल्यास कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यकमात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी परभणी कृषि महाविद्यालयाच्या शिक्षण योगदानाबाबत माहिती दिली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ सय्यद ईस्माइल यांनी केले. सुत्रसंचालन अॅड अनंत चोंदे, डॉ पुरूषोत्तम झंवर, डॉ रणजित चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, अधिकारी, प्राध्यापक, व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
Tuesday, May 9, 2023
येणा-या खरीप हंगामात होऊ शकतो किड – रोगांचा प्रादुर्भाव, उपाययोजनेबाबत मोठया प्रमाणात जनजागृतीची गरज .... कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि
मराठवाडातील कृषि विभागातील अधिकारी व वनामकृवि शास्त्रज्ञ यांच्या संयुक्त बैठकीत येणा-या हंगामात संभाव्य किड – रोग प्रादुर्भाव व व्यवस्थापनावर मार्गदर्शन व चर्चा
येणा-या
खरीप हंगामात मराठवाडयात शंखी गोगलगाय,
सोयाबीनवरील खोडमाशी व पिवळा मोझॅक,
कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व बोंडसड,
हुमणी किड आदी मुख्य किड व रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाय
करणे गरजेचे आहे. याकरिता प्रतिबंधात्मक उपायाबाबत शेतकरी बांधवापर्यंत माहिती पोहचविण्याकरिता
कृषि विद्यापीठ, जिल्हा प्रशासन, व कृषि विभाग यांनी संयुक्त मोहिम राबवावी. गेल्या
वर्षी शंखी गोगलगाय मुळे झालेल्या प्रादुर्भावामुळे मोठया प्रमाणात शासनाला नुकसान
भरपाई दयावी लागली, यासारखे होणारे
नुकसान टाळण्याकरिता सर्वांनी एकत्रितरित्या मोहिम राबवु, त्याकरिता कृषि विभाग व कृषि विद्यापीठ मिळुन काटेकोर नियोजन करू, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी केले.
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, जिल्हा प्रशासन
व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ मे रोजी खरीप हंगामातील संभाव्य
कीड – रोग व्यवस्थापनाकरिता पुर्व तयारी व विशेष मोहिम बैठकीचे आयोजन करण्यात आले
होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून
ते बोलत होते. व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री विजय लोखंडे, श्री प्रकाश देशमुख, श्री दत्तात्रेय गवसाने, श्री रविशंकर चलवदे, श्री महेश तीर्थकर, श्री आर टी जाधव, प्राचार्य डॉ संजीव बंटेवाड, विभाग प्रमुख डॉ पुरूषोत्तम नेहरकर आदींची प्रमुख
उपस्थिती होती. बैठकीस ऑनलाईन पध्दतीने आठही जिल्हयातील जिल्हाधिकारी, त्यांचे प्रतिनिधी व
कृषि अधिकारी उपस्थित होते.
कुलगुरू
मा डॉ इन्द्र मणि पुढे म्हणाले की, शंखी गोगलगाय हा एक घातक शुत्र आहे,
कारण ही एक उभलींगी, निशाचार, कवच असलेली कीड असुन कोणत्याही पिकांचा फडसा पाडु
शकते. याचा प्रादुर्भाव शेतकरी केवळ वैयक्तिकरित्या उपाय योजना करून टाळु शकणार नसुन सामुदायिकरित्या
वेळेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. यावर्षी ही या घातक कीडींचा प्रादुर्भाव
होण्याची शक्यता लक्षात घेता, सर्वांनी कंबर
कसण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठ शास्त्रज्ञांनी
सदर किड - रोग व्यवस्थापनाबाबत प्रमाणित कार्य पध्दती निश्चित केली असुन ही माहिती
शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्याकरिता गावपातळीवर प्रशिक्षणे व कार्यशाळेचे आयोजन
करण्यात येऊन विविध प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे, युटयुब, घडीपत्रिका, भिंतीपत्रक आदीच्या माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे.
डॉ देवराव देवसरकर आपल्या मनोगतात म्हणाले की, कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांच्या
समन्वयाने संपुर्ण मराठवाडयात शेतकरी बांधवा मध्ये संभाव्य किड व रोगाबाबत जनजागृती
करण्यात येईल.
तांत्रिक सत्रात शंखी गोगलगायचे एकात्मिक व्यवस्थापनावर मार्गदर्शना डॉ पुरूषोत्तम झंवर म्हणाले की, ज्या भागात शंखी गोगलगायचे प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, तेथे सामुदायिकरित्या उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे सांगुन त्यांनी गोगलगायी व्यवस्थापनाबाबत प्रमाणित कार्य पध्दती बाबत माहिती दिली. सोयाबीनवरील खोडमाशी व पिवळा मोझॅक यावरील डॉ राजेंद्र जाधव यांनी मार्गदर्शनात उन्हाळी सोयाबीनमुळे पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली, कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व बोंडसड यावर मार्गदर्शन करतांना डॉ बस्वराज भेदे म्हणाले की, गेल्या हंगामातील कापसाचा फरदड उशीरा पर्यंत होता, त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा उद्रेक होऊ शकतो. मराठवाडयातील कापुस उत्पादकता वाढीबाबत डॉ अरविंद पंडागळे मार्गदर्शन केले तर हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापनावर डॉ अनंत लाड आदींनी मार्गदर्शन केले. चर्चासत्रात कृषि अधिकारी यांच्या शंकाचे निरासरन विद्यापीठ शास्त्रज्ञांनी केले. सुत्रसंचालन डॉ अनंत लाड यांनी केले तर आभार डॉ पुरूषोत्तम नेहरकर यांनी मानले. बैठकीस मराठवाडा विभागातील जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कृषि विभागाचे अधिकारी व विद्यापीठातील शास्त्रज्ञ मोठया संख्येने उपस्थित होते.
Saturday, May 6, 2023
वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमेळाव्याचे आयोजन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा, ग्रीष्म वसतीगहातील माजी विद्यार्थ्यानी नुतनीकरण केलेल्या खोलीचे लोकार्पण व महाविद्यालयाचे विविध पदावर कार्यरत असलेल्या अधिकारी यांचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ९ मे रोजी सकाळी १०.०० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि हे राहणार असुन माननीय आमदार तथा विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मा श्री सुरेशराव वरपुडकर याची उदघाटक म्हणुन उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा कृषी आयुक्त मा श्री सुनिल चव्हाण आणि नाशिकचे पोलीस आयुक्त मा श्री अंकुश शिंदे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले याच्यासह महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी राज्यात उच्च पदावर कार्यरत असलेले अधिकारी यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक प्राचार्य डॉ सय्यद ईस्माइल, कृषी विद्यापीठ पदवीधर संघाचे अध्यक्ष अॅड अनंत चोंदे, मुख्य वसतीगृह अधिक्षक डॉ राजेश कदम, डॉ पुरूषोत्तम झंवर आदींनी दिली आहे.
Friday, May 5, 2023
जमिनीचे आरोग्य सुधारणे गरजेचे ..... डॉ गजानन गडदे
मौजे दुर्डी येथे माती परीक्षण मोहिम संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, इफको आणि रिलायंस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३ मे रोजी परभणी जिल्ह्यातील मौजे दुर्डी येथे माती परीक्षण मोहिम राबविण्यात आली. सदरील मोहिमे अंतर्गत ५० शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीतील मातीचे नमुने इफकोच्या मोबाईल व्हॅनमध्ये मोफत तपासणी करून त्याची आरोग्यपत्रीका शेतकऱ्यांना सायंकाळी गावातच देण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी माती परीक्षण अहवालावर आधारीत पिकांचे खत व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले, ते म्हणाले की, पिक उत्पादन वाढीकरिता जमिनीचे आरोग्य सुधारणे गरजेचे असुन जमिनीचे सेंद्रीय कर्ब वाढी करिता सेंद्रीय खतांचा वापर करावा तसेच रासायनिक खतांना संतुलित वापर करण्याचा सल्ला दिला. त्यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. तसेच इफकोचे श्री.जगदीश देवतकर यांनी शास्त्रोक्त पद्धतीने मातीचे नमुने घेण्याविषयी मार्गदर्शन केले. तर आत्माच्या श्रीमती स्वाती घोडके यांनी सोयाबीन उगवण शक्ती तपासणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता रिलायंस फाऊंडेशचे श्री रामजी राऊत, विद्यापीठाचे श्री नितीन मोहिते आणि इफकोचे श्री तिवारी यांनी परीश्रम घेतले.
Monday, May 1, 2023
वनामकृवित महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन साजरा
शेती व शेतकरी कल्याणाकरिता समर्पित भावनेने कार्य करू ....... कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या मुख्य क्रिडा प्रांगणात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी शुभेच्छा दिल्या.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा मोठा असुन राज्याने देशाच्या स्वातंत्र्यात आणि देशाच्या प्रत्येक विधायक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. महाराष्ट्राचा धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी असुन महाराष्ट्र ही संत, महंत, ऋषींची तसेच वीरांची भूमी आहे. या भूमीला शौर्य, त्याग आणि देशभक्तीची परंपरा लाभली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याची आपणास संधी मिळाली आहे, हे आपले भाग्य आहे. मराठवाडा विभागाच्या कृषी विकासात विद्यापीठ योगदान देत आहे. आजपर्यंत, परभणी कृषि विद्यापीठाने संशोधनावर आधारित १४८ विविध पीकांच्या जाती विकसित केल्या असुन १००४ कृषी-तंत्रज्ञानाच्या शिफारशी दिल्या तसेच ५३ कृषी अवजारांची निर्मिती केली आहे, याचा लाभ शेतकरी बांधवाना होत आहे. सोयाबीन, तुर, ज्वारी पिकांतील विद्यापीठ विकसित अनेक उत्कृष्ट वाण शेतकरी बांधवामध्ये प्रचलित असुन यामुळे त्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होत आहे. शेतकऱ्यांकडून विद्यापीठ बियाण्यांना मोठी मागणी असुन बीजोत्पादन वाढीकरिता विद्यापीठ प्रयत्न करित आहे. यंदा संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करत असून यामध्ये आपल्या विद्यापीठाचे योगदान महत्त्वाचे असेल. कारण भरड धान्यामधील ज्वारी व बाजरी ही दोन पिक मुख्य पिके असुन परभणी विद्यापीठाने ज्वारीमध्ये परभणी शक्ती ही देशातील पहिली जैवसंपृक्त वाणाची निर्मिती केली असुन बाजरीमध्ये एएचबी-१२०० एफई आणि एएचबी-१२६९ या दोन जैवसंपृक्त वाण विकसित केले, यात लोह आणि जस्तचे प्रमाण जास्त आहे. या वाणाखालील लागवडीचे क्षेत्र वाढीकरिता प्रयत्न करावा लागेल. विद्यापीठाने माझ्या बळीराजासाठी माझी एक दिवसीय मोहीम मराठवाड्यातील ३०० पेक्षा जास्त गावांमध्ये राबविली, या मोहिमेमुळे शेतकरी आणि विद्यापीठ यांचे नाते घट्ट होण्यास मदत झाली आहे. विद्यापीठाने देश-विदेशातील अनेक शासकीय संस्था व खासगी कंपन्या यांसोबत सामंजस्य करार केले आहेत, यामध्ये जगातील अग्रगण्य अशा अमेरिकेतील कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटी, वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा, लिंकन नेब्रास्का युनिव्हर्सिटी विद्यापीठांचा समावेश आहे. याव्दारे कृषी संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात एकत्र काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठवाड्यात कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यात येत असुन लवकरच कृषी विज्ञान केंद्रामार्फत कृषी यांत्रिकीकरणावर मोठया प्रमाणावर प्रशिक्षणे आयोजित करण्यात येणार आहेत. मराठवाडयातील शेतकरी बांधवाकरिता औषधी वनस्पती लागवड हे चांगला पर्याय ठरू शकेल, याकरिता विद्यापीठ संशोधनास चालना देणार आहे. विद्यापीठाच्या आठ संशोधन प्रकल्पांसाठी नुकतेच शासनाकडुन पंचवीस कोटी रुपये प्राप्त झाले आहेत, यामुळे विद्यापीठ संशोधनास मदत होणार आहे. नाहेप प्रकल्पाच्या माध्यमातून डिजिटल कृषी तंत्रज्ञान विकासावर भर देण्यात येत असून कृषी क्षेत्रात कृषी रोबोट्स आणि ड्रोन तंत्रज्ञान वापराबाबत प्रचार केला जाणार आहे. डिजिटल शेती तंत्रज्ञानात आपले विद्यापीठ देशात अग्रेसर असेल. विद्यापीठाचे २६ विद्यार्थ्यांनी थायलंड आणि स्पेनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिजिटल तंत्रज्ञानावरील प्रशिक्षण पूर्ण केले असुन तीन प्राध्यापकांनी अमेरिकेत व थायलंडमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले आहे, ही विद्यापीठाच्या दृष्टीने एैतिहासिक बाब आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधेकरिता विद्यापीठ प्रयत्नशील आहे. शेती व शेतकरी कल्याणाकरिता सर्वांनी एकत्रित समर्पितपणे काम करण्याचा संकल्प करू, असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्री के एम कोल्हे, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ राजेश क्षीरसागर, प्राचार्या डॉ जया बंगाळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सचिन मोरे आदींसह विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक श्री उदय वाईकर यांनी केले.




.jpeg)
.jpeg)

.jpeg)



.jpeg)




.jpeg)
.jpeg)
