Thursday, April 11, 2013

मराठवाडा कृषि विद्यापीठात महात्‍मा ज्‍योतिबा फुले जयंती साजरी


महात्‍मा फुले कृषि शिक्षणाचे महत्‍व जाणनारे आद्य समाजसुधारक होते. त्‍यांनी त्‍याकाळात मांडलेले कृषि विषयक व जल संधारणाचे विचार आज हि उपयुक्‍त आहेत असे प्रतिपादन मा कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे यांनी केले. मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महावि़द्यालयाच्‍यावतीने महात्‍मा ज्‍योतिबा फुले जयंती साजरी करण्‍यात आली. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्रार्चाय डॉ एन डी पवार यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. ते पुढे म्‍हणाले कि, परदेशात जाउन शिक्षण घेण्‍याचा पुरस्‍कार त्‍याकाळात त्‍यांनी केला. शेतक-याचा आसूड यासारखी पुस्‍तके लिहुन शेतक-याच्‍या समस्‍या समाजापुढे मांडल्‍या. त्यांच्या विचारांची आजही समाजास गरज आहे. 
याप्रसंगी महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांच्‍या प्रतीमेचे मा कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे यांच्‍या हस्‍ते पुजन करण्‍यात आले. तसेच बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे अवचित्‍य साधुन महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यान मध्‍ये आंबडेकराची वाचन संस्‍कृती जोपासनासाठी १८  तास अभ्‍यासाच्‍या उपक्रमास प्रारंभ करण्‍यात आला. यामध्‍ये महाविद्यालयाच्‍या ५५०  विद्यार्थ्‍यानी सहभाग घेतला. कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ विलास पाटिल, डॉ वाघमारे, डॉ एच व्‍ही काळबांडे, डॉ जे पी जगताप, डॉ विशाल अवसरमल, डॉ ए बी बगाटे व विद्यापीठातील प्राध्‍यापकवर्ग, कर्मचारीवर्ग व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री आवडे यांनी तर आभार रत्‍नदिप लोखंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी राहुल मोरे, आशिष भराडे, हार्णेसह इतर सर्व विद्यार्थ्‍यानी परिश्रम घेतले.
.