एक हजार जणांनी नोंदविला सहभाग
कार्यक्रमात प्रभारी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण मार्गदर्शन करतांना |
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालयाच्या प्रागंणात
आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यापीठाचे आरोग्य अधिकारी डॉ सुब्बाराव व योग शिक्षक प्रा दिनकर जोशी
यांच्यासह आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार विविध आसन, प्राणायाम आदीचे सामुदायिकरित्या
साधारणत: एक हजार जणांनी प्रात्यक्षिके केली. याप्रसंगी प्रभारी कुलगुरू मा डॉ
अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य
डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य प्रा विशाला पटणम, प्राचार्य
डॉ पी एन सत्वधर आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मागदर्शन करतांना
प्रभारी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातुन
भारतीय संस्कृती सर्व देशात पोहजली असुन योग हे भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी
आहे. योगाव्दारे जगात शांतता व समृध्दी नांदेल. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग मर्यादीत न राहता योग हा सर्वाच्या जीवनपध्दतीचा
अविभाज्य भाग व्हावा, असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन डॉ आशाताई देशमुख
यांनी तर आभार प्रदर्शन जी बी उबाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडाधिकारी
प्रा जी ए गुळभिळे, प्रा डि एफ राठोड, प्रा शाहु चव्हाण यांच्यासह विविध
महाविद्यालयाचे रासेयोचे कार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवक, ग्रामीण कृषी कार्यानुभव
कार्यक्रमाचे कार्यक्रमाधिकारी, कृषिदुत व कृषिकन्या यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध
महाविद्यालयाचे विद्यार्थ्यी-विद्यार्थ्यींनी, अधिकारी, कर्मचारी आदी मोठया संख्येने
उपस्थित होते.