Tuesday, June 9, 2015

वनामकृविच्‍या कृषि विद्या विभागातील पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांना निरोप


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि विद्या विभागातील पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांना दिनांक ६ जुन रोजी विभागाच्‍या वतीने निरोप देण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी संचालक शिक्षण तथा अधिष्‍ठाता डॉ. अशोक ढवण हे होते तर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. धर्मराज गोखले प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपस्थित होते तर प्राध्‍यापक डॉ. आनंद कारले व विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन म्‍हणाले की, विद्यार्थ्‍यांनी आपली आवड व क्षमता ओळखुन करियरची निवड करावी व स्‍वत:चे भवितव्‍य घडवावे. कृषि उच्‍च शिक्षणाच्‍या व स्‍पर्धा परीक्षेच्‍या माध्‍यमातुन आज अनेक संधी कृषि पदवीधरांना उपलब्‍ध असुन विद्यार्थ्‍यांनी सकारत्‍मक दृष्‍टीकोन ठेवुन परिश्रम घ्‍यावे, यश तुम्‍हचेचे आहे.
प्रमुख पाहुणे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. धर्मराज गोखले म्‍हणाले की, कृषि विद्या विभागाच्‍या विद्यार्थ्‍यांना भविष्‍यात खुप मोठ्या संधी असुन केंद्रीय व राज्‍य सेवा परिक्षा, बॅकींग, कृषि क्षेत्रातील इतर स्‍पर्धात्‍मक परिक्षेचा जोमाने अभ्‍यास करा. त्‍यासाठी लागणारी आवश्‍यक ती सर्व मदत देण्‍यात येईल.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात डॉ. आनंद कारले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश ठाकरे यांनी व आभार प्रदर्शन श्रीकृष्‍णा वारकड यांनी केले. या कार्यक्रमास विभागाचे डॉ. व्हि. बी. अवसरमल, डॉ. मिर्झा आय.ए.बी., डॉ. डी.सी.लोखंडे, प्रा. डि. एफ. राठोड सह विद्यार्थ्‍यी विजय मुगीलवार, संदिप बिबे, ज्ञानेश्‍वर गवळी, माधव टाले, रवी गित्‍ते, अनिल जाधव, मोरश्‍वर राठोड, शिला शिंदे, ललिता वर्मा, खानी देबरमा व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विभागातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्‍यांनी पुढाकार घेतला.