वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्या मृदविज्ञान
व कृषि रसायनशास्त्र विभागा तर्फे जमिनीचे आरोग्या जागृती अभियान राबविण्यात येत असुन गेल्या ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात परभणी तालुक्यातील पोरवड व माळसोन्ना येथे फिरती माती परिक्षण प्रयोगशाळेचे एक दिवसीय माती परिक्षण शिबीर आयोजीत करण्यात आले होते. यात दोन्ही गावातील साधारणत: शंभर शेतकरी प्रतीनिधीचे माती परिक्षा करून माती परिक्षण अहवाल देण्यात आला, त्याचा
रबी पिक लागवडीसाठी लाभ शेतक-यांना होणार आहे. हा उपक्रम विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असुन मृदशास्त्रज्ञ डॉ अनिल धमक व श्री सय्यद जावेद यांनी माती परिक्षणासाठी मातीचा नमुना घेण्याची पध्दत व माती परिक्षणाचे फायदे यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मृदविज्ञान
व कृषि रसायनशास्त्र विभागातील कर्मचारी यांच्यासह प्रगतशील शेतकरी तुकाराम दहे,
माधव चव्हाण, माजी सरपंच सखारामजी तिडके व शेख मुनिर शे हमिद व समस्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.