वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय, रेशीम संशोधन
योजना व पुर्णा तालुका कृषि अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कृषि
कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पुर्णा तालुक्यातील मौजे वझुर येथे दिनांक ७ ऑक्टोबर
रोजी रबी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास प्रमुख
पाहुणे म्हणुन दादाहरी ग्रामीण विकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री. अजितदादा
वरपुडकर उपस्थित होते तर सरपंच श्री. लक्ष्मणराव पवार अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य सुरेश पवार, विभाग प्रमुख डॉ. बी. एम. ठोंबरे, रावे
समन्वयक डॉ. राकेश अहिरे, माजी सरपंच राजाभाऊ पवार, तालुका कृषी अधिकारी श्री आर
पी देशपांडे, रेशीम संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे, पशुवैद्यकीय
अधिकारी डॉ. शाहीद देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मेळाव्यात श्री. अजितदादा वरपुडकर यांनी आपल्या
भाषणात गावातील जलसंधारणासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तर शाश्वत
शेतीसाठी पशुधनाचे योग्य व्यवस्थापनाबाबत डॉ बी एम ठोंबरे यांनी मार्गदर्शन
केले. ग्रामीण कृषि कार्यानुभवाबाबत डॉ. राकेश अहिरे, रबी ज्वारी हंगामाबाबत डॉ.
पी. के. वाघमारे, गहु व हरभरा लागवडीबाबत डॉ नारखेडे, करडई लागवडीबाबत डॉ. एस. व्ही. पवार, रेशीम उद्योगाबाबत डॉ.
सी. बी. लटपटे यांनी तर जनावरांच्या गोठा व्यवस्थानाबाबत डॉ. शाहीद देशमुख
यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्यात शेतकरी भारत पवार, गरुड, सुदाम शिंदे यांनीही रेशीम
उद्योगाबाबत स्वत:चे अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषिदुत तुकाराम
मंत्री यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. एच. घंटे
यांच्यासह ग्रामीण कृषि कार्यानुभवाचे कृषिदुत अरुण कठाळे, आशिष भराडे, सुदर्शन
काळे, शेख वसीस, प्रशांत गिते, नारायण घुगे, पंकज दुधाटे, बालाजी बोयेवार, तानाजी
मुळे, कैलास भाकड, प्रदिप बरमे, अंगद नवघरे, सुशील पवार, यशवंत देवरे, विनोद
पितळे, सुनिल नांदे, ओंकार झाडे, सचिन घाडगे, प्रविण पुंडगे, मोहम्तद आसिफ आदींनी
परिश्रम घेतले. मेळाव्यास शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.