वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील बीज
तंत्रज्ञान संशोधन व पैदासकार बियाणे विभाग येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या
राष्ट्रीय बीज संशोधन योजनेंतर्गत असलेल्या आदिवासी उपयोजनाच्या वतीने दि १ ऑक्टोबर
रोजी आदिवासी शेतक-यांना विविध शेती निविष्ठांचे वाटप कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विभाग
प्रमुख डॉ डि बी देवसरकर, सह्योगी संचालक (बियाणे) डॉ व्ही डी सोंळुके
यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञानाची ज्ञानगंगा आदिवासी
शेतक-यांपर्यत पोहजविणे व त्यांच्या कृषि विकासास हातभार लावणे, हा मुख्य उद्देश
ठेऊन आदिवासी उपयोजने मार्फत नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील मौजे
कुसळवाडी, चौरंबा (खु,) व चौरंबा (बु.) येथील पंच्चाहत्तर निवडक
आदिवासी शेतक-यांना रब्बी हंगामासाठी लागणारे विविध शेती निविष्ठा जसे विद्यापीठ
विकसित बियाणे, जैविक व रासयानिक खते व किटकनाशके आदींचे वाटप करण्यात येणार असुन
यातील काही शेतक-यांना प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. सदरिल कार्यक्रमास
विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ जी एस पवार हीने केले. कार्यक्रम
यशस्वीतेसाठी प्रा आर एम कोकाटे, श्री बी एम शिंदे, श्री बी बी देशमुख यांनी
परिश्रम घेतले.