मराठवाडयात सोयाबीन पिकाची पेरणी होऊन पिक सर्वसाधरणपणे ३
ते ४ आठवडयाचे झालेले आहे. सध्याच्या ढगाळ वातावरणात विविध शेतक-यांच्या
प्रक्षेत्रावर सोयाबीन पिकाची पाहणी केली असता सततच्या ढगाळ वातावरणामुळे सध्या
सोयाबीनवर हिरव्या उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. ही अळी एकदम बारीक असुन
अळी पानाच्या खालच्या बाजुस राहुन पाने कुरतडत आहे. सध्या पिकाची रोप अवस्था असल्यामुळे झाडास पानांची संख्या
कमी आहे त्यामुळे अळीच्या प्रादुर्भावमुळे पिकास धोका होऊ शकतो म्हणुन अळीचे व्यवस्थापन
वेळीच करणे गरजेचे आहे. वेळीच लक्ष दिले
नाही व फवारणी केली नाही तर अळयांची संख्या मोठया प्रमाणात वाढण्याची शक्यता
आहे, त्यामुळे नुकसान होऊ शकते. करिता सर्व सोयाबीन शेतक-यांनी अळयांच्या व्यवस्थापनासाठी
क्लोरोपायरीफॉस २० टक्के २० मिली किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के २० मिली. किंवा
इंडाक्झाकार्ब १५.८ टक्के ७ मिली. किंवा लँबडा सायहलोथ्रीन ४.९ टक्के ६ मिली.
किंवा क्लोरॅनट्रानीप्रोल १८.५ टक्के ३ मिली. यापैकी कुठल्याही एका
किटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. पावरपंपासाठी
किटकनाशकाचे प्रमाण अडीच ते तीनपट करावे, असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, विस्तार
कृषि विदयावेत्ता डॉ.यू.एन. आळसे व किटकशास्त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत यांनी केले आहे.