Saturday, July 2, 2016

वनामकृवित हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी


महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री  हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक यांच्‍या जयंती निमित्‍य वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ‘कृषिदिन’ म्‍हणुन साजरा करण्‍यात आला. यानिमित्त कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते कै. वसंतराव नाईक यांच्‍या पुतळयाचे पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, गोळेगांव कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्‍ही डी पाटील, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या प्रा. विशाला पटणम, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एस. कदमकृषि‍ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि बी देवसरकर आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख व संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी, विद्यापीठातील अधिकारीप्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उ‍पस्थित होते. याप्रसंगी विद्यापीठ परिसरात विविध महाविद्यालये, विभाग, वसतीगृहे, संशोधन केंद्रे आदी ठिकाणी वृक्षारोपणाची मोहिम राबविण्‍यात आली. या मोहिमेत मान्‍यवरांसह विद्यापीठातील अधिकारीप्राध्‍यापक, कर्मचारी व राष्‍ट्रीय सेवा योजना व राष्‍ट्रीय छात्रसेनेच्‍या स्‍वयंसेवकांंनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला. 
वनामकृविच्‍या कृषी महाविद्यालयाच्‍या पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्र विभागात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते वृक्षरोपण करतांना
वनामकृविच्‍या गृहविज्ञान महाविद्यालयात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते वृक्षरोपण करतांना
वनामकृविच्‍या कृषी महाविद्यालयाच्‍या पशुसंवर्धन व दुग्‍धशास्‍त्र विभागात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते वृक्षरोपण करतांना
वनामकृविच्‍या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या देवगिरी वसतीगृह परिसरात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते वृक्षरोपण करतांना
वनामकृविच्‍या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या परिसरात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते वृक्षरोपण करतांना
वनामकृविच्‍या विद्यार्थ्‍यी कल्‍याण कार्यालयाच्‍या परिसरात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते वृक्षरोपण करतांना
वनामकृविच्‍या कृषी महाविद्यालयाच्‍या मृदविज्ञान व कृषी रसायनशास्‍त्र विभागात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते वृक्षरोपण करतांना