हवामानातील
बदल
व
जागतिक
तापमान
वाढ
यामुळे
मागील
काही
वर्षापासुन
कृषी
क्षेत्रास
विविध
प्रकारच्या
आव्हानांना
सामोरे
जावे
लागत
असुन
मराठवाडयातील
कृषि
आधारित
ग्रामीण
अर्थव्यवस्थेवर
विपरित
परिणाम
होत
आहे.
यावर्षी
मराठवाडा
विभागात
सर्व
जिल्हयात
समाधानकारक
पावसाची
सुरूवात
झालेली
आहे. या
पार्श्वभुमीवर
कृषि
क्षेत्रासमोरील
असलेल्या
समस्या,
आव्हाने
व
संधी
तसेच
या
क्षेत्रातील
विविध
पैलुंवर
चर्चा
व
विचारमंथन
होऊन
कृषि
विकासाला
चालना
व
संजीवनी
मिळावी,
या
उद्देशाने
‘मराठवाडयातील
शेतीचे
भवितव्य’
या
विषयावर
एक
दिवसीय
कृषि
परिषदेचे
आयोजन
विभागीय
आयुक्तालयाच्या पुढाकाराने
व वसंतराव
नाईक
मराठवाडा
कृषि
विद्यापीठ,
परभणी,
मराठवाडा
विकास
मंडळ,
महाराष्ट्र
राज्याचे
कृषि
विभाग,
डॉ.
बाबासाहेब
आंबेडकर
मराठवाडा
विद्यापीठ,
औरंगाबाद,
दी
चेंबर
ऑफ
मराठवाडा
इंडस्ट्रीज
अॅण्ड
अॅग्रीकल्चर
व
दी
इन्स्टीटयुट
ऑफ
अग्रीकल्चरल
टेक्नॉलॉजीस्ट
यांच्या
संयुक्त
विद्यमाने
दिनांक
10
ऑगस्ट
रोजी
औरंगाबाद
येथे
डॉ.
बाबासाहेब
आंबेडकर
मराठवाडा
विद्यापीठाच्या
सभागृहात
करण्यात
आले
आहे.
सदरिल
परिषदचे
उद्घाटन
माननीय
राज्यपाल
मा. श्री.
चेन्नमनेनी विद्यासागर
राव
यांच्या
शुभहस्ते सकाळी
10
वाजता
होणार
असुन
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी
विधानसभेचे
माननीय
अध्यक्ष मा. श्री.
हरिभाऊ
बागडे
राहणार
आहेत.
सदरिल
परिषदेत
मराठवाडा
विभागातील
सन्माननीय
खासदार,
आमदार,
लोकप्रतिनिधी,
प्रगतशील
शेतकरी
आदी
सहभागी
होणार
आहेत.
सदरिल
कृषि
परिषदेत
हवामान
बदलास
अनुकूल
कृषी
तंत्रज्ञान,
शेती
व्यवसायातील
जोखीम
व्यवस्थापन,
जमिनीचे
आरोग्य
व
सेंद्रिय
शेती,
पाण्याचा
कार्यक्षम
वापर,
कोरडवाहु
फलोत्पादन
व
वनशेती,
बीजोत्पादन
व
संरक्षित
शेती,
पशुपालन,
दुग्धोत्पादन
व
कृषी
पुरक
व्यवसाय,
गटशेती,
कृषि
प्रक्रिया
व
निर्यात,
कृषि
विकासात
खासगी
क्षेत्राचा
सहभाग
आदी
विषयावर
विद्यापीठातील
व
विविध
संस्थेतील
शास्त्रज्ञ,
तज्ञ
व
अधिकारी
मार्गदर्शन
करणार
आहेत.
या
एक दिवशीय कृषि
परिषदेचे
आयोजन
विभागीय
आयुक्त
मा.
डॉ.
उमाकांत
दांगट
व
वसंतराव
नाईक
मराठवाडा
कृषी
विद्यापीठाचे
कुलगुरू
मा.
डॉ.
बी.
व्यंकटेश्वरलु
यांच्या
मार्गदर्शनाखाली
करण्यात
आले
असुन परिषदेतील चर्चा,
सुचनांचा
व मार्गदर्शनांचा उपयोग
मराठवाडयातील कृषि विकासाबाबत
धोरणात्मक निर्णयासाठी
होणार असल्याचे या एक दिवशीय
कृषी
परिषदेचे
समन्वयक
तथा
वनामकृविचे शिक्षण
संचालक
डॉ.
अशोक
ढवण
यांनी
कळविले
आहे.