वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ
अंतर्गत लिंबुवर्गीय फळांवर मराठवाडयाकरीता तंत्रज्ञान अभियानास ९ जुन रोजी सात वर्ष
यशस्वीपणे पुर्ण झाली. या
अभियानाअंतर्गत लिंबुवर्गीय बागायतदारांना रोगविरहीत कलमे उपलब्ध करुन देणे,
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागातील कर्मचा-यांचे प्रशिक्षण, बागायतदारांना त्यांच्याच
गावांमध्ये जाऊन नविन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे आणि नविन तंत्रज्ञानाची
प्रात्यक्षिके शेतक-यांच्या शेतात आयोजीत करणे इत्यादी महत्वपुर्ण कामे करण्यात
आली आहेत. अभियानाच्या माध्यमातुन मराठवाडयातील
मोसंबी, लिंबु व संत्रा या फळबाग लागवड विभागात विस्तार कार्य करण्यात आला. अभियानाच्या माध्यमातुन गेल्या सात वर्षामध्ये १,८३,७७१ लिंबुवर्गीय
फळांची रोगविरहित रोपे तयार करुन शेतक-यांना देण्यात आले. कृषि विभागातील ९२५ कृषि विभागातील कर्मचारी व तसेच कृषि विज्ञान
केंद्रातील विशेष विशेषज्ञांना या दर महिन्याला चार दिवसाचे प्रशिक्षण देण्यात
आले जेणेकरुन जास्तीत जास्त नविन तंत्रज्ञान शेतक-यांपर्यत या अभियाना माध्यमातुन
पोहचता यावे हे या मागचे मुख्य उददेश आहे. मराठवाडयातील १३,३३० लिंबुवर्गीय बागायतदार शेतक-यांना त्यांच्या बागायत
प्रक्षेत्रावर विशेष तंज्ञाद्वारे एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येते, या
प्रशिक्षणात बहुसंख्येने शेतकरी सहभाग नोंदवितात. त्यामुळे शेतक-यांमध्ये मोठी जागृती होऊन त्यांच्या बागेमध्ये नविन
तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यास मदत होते. अभियानामुळे
शेतकरी आता ठिंबक सिंचनाचा वापर, बांगडी पध्दतीने खत देणे, बोर्डो पेस्ट लावणे,
रोग व किड व्यवस्थापनाचे तसेच माती आणि पाणी परिक्षण करुन खत व्यवस्थापन इत्यादीकडे
विशेष लक्ष देण्यात येत आहे. लिंबुवर्गीय
बागांमध्ये बागायतदारांच्या शेतावर मराठवाडयात एकुण ४७ प्रात्यक्षिके घेण्यात
आलेली आहेत. प्रात्यक्षिके निवडतांना अगदी खराब झालेल्या
बागा निवडुन त्यांचे पुर्नजीवन करण्यासाठी विकसीत तंत्रज्ञानाचा वापर विषय
तंज्ञाकडुन केला जात आहे, यामध्ये मर होणा-या झाडांची निगा याबाबतीत व्यवस्थापन
करणे जसे की, कीड व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन
ई. बाबींचा शिफारशीप्रमाणे अवलंब करुन मर
होणारी झाडे पुर्नजीत करणे, या अभियानाचा उददेश आहे. दुस-या प्रकारचे प्रात्यक्षिके जसे की, कमी वय असलेल्या बागांमध्ये
सर्व तंत्रज्ञानाचा वापर करुन फळबाग विकसीत करणे. मराठवाडयातील टंचाईग्रस्त भागातील फळबागा वाचविण्यासाठी वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विदयापीठ अंतर्गत लिंबुवर्गीय फळपिकांवर मराठवाडयाकरिता तंत्रज्ञान
अभियानाच्या वतीने टंचाईग्रस्त परिस्थितीत मोसंबी, संत्रा व लिंबु च्या फळबागा
वाचविण्यासाठी हे अभियान २०१२ पासुन राबविण्यात येत आहे. २०१५-२०१६ मध्ये या अभियानाअंतर्गत मराठवाडयातील २४ गवांना भेटी देऊन ४७१ फळबागायतदारांना
मार्गदर्शन करण्यात आले व जवळपास ५० अति गरजु टंचाईग्रस्त शेतक-यांना प्रत्येकी
१४ किलो केओलिन हे बाष्पीरोधक देण्यात आले व कमी पाण्यावर फळ बागा कश्याप्रकारे
वाचविता येतील यांचे तंत्रज्ञान शेतक-यांना सांगण्यात आले.
लिंबुवर्गीय फळबागांच्या विषयी येणा-या
समस्येची सोडवणुक करण्यासाठी या अभियानातुन बागायातदारांत मोठया प्रमाणात आत्मविश्वास
निर्माण होऊन गेल्या सात वर्षात मराठवाडयातील लिंबुवर्गीय फळबांगाच्या क्षेत्रात
झपाटयाने वाढ होऊन उत्पादन क्षमता ही वाढली. हे अभियान नागपुर येथील राष्ट्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्राचे संचालक
डॉ. एम. एस. लदानिया आणि कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांच्या मार्गदर्शनाखाली
आणि राष्ट्रीय फलोत्पादन अभियान यांच्या अर्थसहायाने यशस्वीरित्या मराठवाडयात
राबविल्या जात आहे. अभियान
प्रमुख तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी या लिंबुवर्गीय
मराठवाडयाकरीता फळबाग अभियानाची व्याप्ती संपुर्ण मराठवाडा विभागात यशस्वीरित्या
करण्यात आली. अभियानाचे प्रभारी अधिकारी प्रा. आर. एस. बोराडे आणि बदनापुर येथील मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. बी. पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अभियान यशस्वीतेसाठी डॉ. व्ही. एन. सिडाम, डॉ.एस.पी.चव्हाण, डॉ. पी. एम. सांगळे, डॉ. एस. ई. शिंदे, प्रा. वाय.के. भोगील, श्री एस आर बोराडे आदी तज्ञांनी परिश्रम घेत आहेत.