Monday, July 18, 2016

वनामकृवित जमिनीचे गुणधर्म व पाणी तपासणी वरील आयोजीत प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग राज्य शासन यांच्या संयक्त विद्यमाने मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागात पाच दिवसांचे राज्यस्तरीय जमिनीचे गुणधर्म व पाणी तपासणी विषयावरील प्रशिक्षण दिनांक १२ ते १६ जुलै दरम्‍याण करण्‍यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप समारंभ दिनांक १६ जुलै रोजी झाला. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून हैद्राबाद येथील प्रो. जयशंकर तेलगंणा राज्‍य कृषि विद्यापीठाच्‍या प्राध्‍यापिका डॉ. जी. पद्मजा, विभाग प्रमुख डॉ. व्हि. डी. पाटील, डॉ. अे. पी. सुर्यवंशी, डॉ. सय्यद ईस्माईल आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी जमिनीतील अन्नद्रव्याची घटत असलेली पातळी शेतीसाठी चिंताजनक असल्‍याचे सांगुन शेतक-यांसाठी व कृषि विस्‍तारकांसाठी प्रशिक्षण आयोजीत करणे गरजेचे आहे, असे मत व्‍यक्‍त केले. माती परिक्षणावर आधारीत खतांच्या शिफारशीत मात्राचे शेतक-यांमध्‍ये वापर वाढण्‍यासाठी कृषी तंत्रज्ञांना सदरिल प्रकारचे प्रशिक्षणाची आवश्यकता असल्‍याचे मत प्राध्‍यापिका डॉ. पद्मजा यांनी आपल्‍या मार्गदर्शनात व्‍यक्‍त केले तर विभाग प्रमुख डॉ विलास पाटील यांनी जमीनीच्या गुणधर्मवार आधारीत प्रशिक्षण देणारी राज्‍यातील मुख्‍य विद्यापीठ असल्‍याचे मार्गदर्शनात विषद केले.
प्रशिक्षणासाठी मराठवाडयातील आठ जिल्हातील तंत्र अधिकारी, कृषि सहाय्यक आदींनी सहभाग नोंदविला आहे. प्रशिक्षनार्थी डॉ एच. एस. पवार, श्री पांचाळ, श्री खजुरीकर आदींनी प्रशिक्षणाबाबतचे मनोगत व्यक्त केले. कार्याक्रमात प्रशिक्षनार्थीना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

प्रशिक्षण कार्यक्रम विभाग प्रमुख तथा प्रशिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण समन्वयक म्‍हणुन डॉ पपीता गौरखेडे यांनी काम पाहीले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सय्यद ईस्माईल यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ. पपिता गौरखेडे व आभार प्रदर्शन डॉ. सुरेश वाईकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ अनिल धमक, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. महेश देशमुख, डॉ. सदाशिव अडकीणे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, प्राध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.