वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने
मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागात जमिनीचे गुणधर्म व पाणी तपासणी विषयावर
पाच दिवसीय राज्यस्तरिय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १२ ते १६ जुलै दरम्यान करण्यात
आले असुन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक १२
जुलै
रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सय्यद ईस्माइल
हे होते तर प्रमुख पाहूणे जिल्हा मृद सर्व्हेक्षण अधिकारी श्री. एच. एस. पवार, डॉ अनिल धमक, डॉ. महेश देशमुख, डॉ. पपिता गौरखेडे आदींची
व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉ सय्यद ईस्माइल यांनी जमिनीच्या गुणधर्मांचा आणि इतर
अन्नद्रव्यांचा असलेला परस्पर संबंध आणि त्यांचे माती परीक्षणातील महत्व यावर मार्गदर्शन
केले. प्रास्ताविकात डॉ. महेश देशमुख यांनी प्रशिक्षणाच्या आयोजनाचे महत्व
विषद केले. कृषि विभागातील माती परिक्षण प्रयोगशाळेतील विविध
तंत्र अधिकारी यांना प्रयोगशाळेत जमिनीच्या गुणधर्म व पाणी तपासणीतील येणा-या
तांत्रिक अडचणी सोडवीता याव्यात व जमिनीच्या आरोग्याबाबत शेतकरी वर्गात जागरुकता
निर्माण करण्यासाठी सदरिल प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन विभाग प्रमुख डॉ विलास
पाटील यांच्या मागदर्शनाखाली सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले आहे. प्रशिक्षनार्थींना जमिनीच्या
विवीध गुणधर्मांचे प्रात्यक्षीकाव्दारे माहिती देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी लातूर
कृषि विभागातील कृषि अधिका-यांनी सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
डॉ. सुरेश वाईकर, डॉ. पपिता
गौरखेडे, डॉ. महेश देशमुख, प्रा. सुनिल
गलांडे, श्री अजय चरकपल्ली, शेख सलीम, विजय महाजन, तानाजी जोंधळे आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास
महाविद्यालयातील विभाग प्रमुख, अधिकारी, प्राध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित
होते.