वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान
माहीती केंद्र आणि कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कृषि
विकास योजना तंत्रज्ञान प्रसार प्रकल्पातंर्गत शेतकरी
प्रशिक्षणाचे औंढा तालुक्यातील मौजे रामेश्वर येथे दि. 8 मार्च रोजी
आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी सरपंचा सौ.
नंदाताई ठाकरे या होत्या तर पंचायत समिती सदस्या सौ. निर्मलाताई दळवे, पोलीस पाटील श्री. शिवाजीराव देशमुख, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर.
देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षणात विद्यापीठ
शास्त्रज्ञ डॉ. यु. एन. आळसे यांनी हळद लागवड व शाश्वत शेती, रेशीम उदयोगावर डॉ. सी. बी. लटपटे
यांनी तर डॉ. पी. आर देशमुख यांनी किफायतशीर शेतीवर मार्गदर्शन
केले. तालुका कृषि अधिकारी श्री. शिवाजी शेळके आणि तांत्रिक
अधिकारी श्री. नयन पाटील यांनी कृषि विभागातील विविध उपक्रमाबाबत माहिती दिली. प्रगतशील शेतकरी श्री. आनंत
ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन डॉ. एस. जी. पुरी यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. बी. जाधव
यांनी मानले. प्रशिक्षणात
मौजे रामेश्वर परिसरातील दिडशेपेक्षा जास्त शेतक-यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमात कृषि
विभागाचे श्री. डी. एल. माने, श्री. एल. डी. राठोड, श्री. ए. एस. निकम आणि ग्रामसेवक श्रीमती वाघमारे
यांनीही सहभाग नोंदविला. कार्यक्रम
यशस्वीतेसाठी डॉ. यु.एन. आळसे यांच्या
मार्गदर्शनाखाली डॉ. एस.जी. पुरी, प्रा. डी. डी. पटाईत, एस. बी. जाधव, के. डी. कौसडीकर, कटारे, शिंदे, डिकळे, बेद्रे, दिपक आदींनी परिश्रम घेतले.