वसंतराव नार्इक
मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या वतीने भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त
अठरा तास अभ्यासमालिकेचे आयोजन दिनांक १२ एप्रिल रोजी करण्यात आले
होते. या अभ्यासमालिकेचे उदघाटन कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांच्या
हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, सहयोगी अधिष्ठाता डॉ.
धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ.
बाबासाहेब ठोंबरे, डॉ
राकेश आहिरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अठरा तास अभ्यासवर्गाच्या उपक्रमात कृषि महाविद्यालयाचे तीनशे
विद्यार्थी व विद्यार्थींनीनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यापीठ ग्रंथपाल डॉ. जी. पी. जगताप, डॉ. व्ही. एस. खंदारे, डॉ. जे. व्ही. एकाळे, डॉ. मिलिंद सोनकांबळे, प्रा. आर व्ही चव्हाण, डॉ. पी. के. वाघमारे, प्रा अनिस कांबळे, ममता पतंगे आदिसह विद्यार्थ्यांनी
परिश्रम घेतले.