Monday, October 16, 2017

वनामकृविच्‍या कार्यालयात घुसून माननीय कुलगुरू यांच्‍या खुर्चीची अवमानना केल्‍याबाबत तीव्र निषेध

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या प्रशासकीय कार्यालयावर विद्यापीठातील आजी - माजी विद्यार्थ्‍यांनी दिनांक 10 ऑक्‍टोबर रोजी मोर्चा काढला होता, त्‍या दरम्‍यान काही मोर्चेकरी विद्यार्थ्‍यींनी माननीय कुलगुरू कार्यालयात घुसून माननीय कुलगुरू यांची खुर्ची कार्यालयाच्‍या बाहेर घेऊन अवमान केला. माननीय कुलगुरू कामानिमीत्‍य मुख्‍यालयाच्‍या बाहेर गेले असतांना याप्रकारचे भ्‍याड व लज्‍जास्‍पद कृत्‍य मोर्चेकरी विद्यार्थ्‍याकडुन झाले, ही बाब अतिशय गंभीर असुन गुरू - शिष्‍याच्‍या परंपरेला छेद देणारी आहे. याबाबत मराठवाडा कृषि विद्यापीठ कर्मचारी संघटना व मागासवर्गीय काष्‍ट्राईब कर्मचारी महासंघ शाखा वनामकृवि, परभणी यांच्‍या वतीने जाहिर तीव्र निषेध व्‍यक्‍त केला असुन संघटना माननीय कुलगुरूंच्‍या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, भविष्‍यात अशा घटना घडु नयेत म्‍हणुन विद्यापीठ प्रशासनाने योग्‍य ती खबरदारी घ्‍यावी, असे निवेदन माननीय कुलगुरू डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांना मराठवाडा कृषि विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्‍यक्ष प्रा दिलीप मोरे तसेच मागासवर्गीय काष्‍ट्राईब कर्मचारी महासंघ शाखा वनामकृवि, परभणीचे अध्‍यक्ष डॉ गिरीधारी वाघमारे यांनी दिले, यावेळी दोन्‍ही संघटनेचे सदस्‍य मोठया संख्‍येने उपस्थित होते.