लातूर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील लातुर येथील कृषि
महाविद्यालयात दिनांक ११ नोव्हेंबर रोजी विविध कलाक्षेत्रात विशेष नाविन्य संपादन
केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी कुलगुरू मा. डॉ. बी.व्यंकटेश्वरलु, शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, लातूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अच्युत
हांगे, ग्रामीण पोलीस स्थानक लातूरचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवांडे, विद्यार्थी
कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख, विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. हेमंत पाटील, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता
डॉ. बी. बी. भोसले, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. ए. पी. सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती
होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांनी विविध क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यी व प्राध्यापकांचे
अभिनंदन करून भविष्यातही विद्यार्थ्यांनी कठोर परिक्षम घेऊन यश प्राप्त
करावे असे सांगुन महाविद्यालयाचे
नाव मोठे करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये विविध क्षेत्रामध्ये
विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या ६० विद्यार्थी-विद्यार्थीनिचा
मान्यवरांच्या हस्ते सत्कार प्रमाणपत्र देऊन
करण्यात आला. कौतुक सोहळयाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सोबतच विविध
राष्ट्रीय परिसंवाद, कार्यशाळा येथे विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या
प्राध्यापकांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव
२०१७ मध्ये औरंगाबाद येथे हरयानवी लोकनुत्य प्रकारात व्दितीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थीनीने तसेच लावणी या प्रकारात उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांने आपल्या कलेचे सादरीकरण केले.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले यांनी महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यापीठात विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करीत असल्याचे
सांगितले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन डॉ. ज्योती देशमुख व डॉ. विजय भांबरे यांनी केले व आभार डॉ. ए. पी. सूर्यवंशी यांनी मानले.