पत्रकार
परिषदेत प्रतिपादन
विद्यापीठ
युवक महोत्सव इंद्रधनुष्य
हे राज्यस्तरिय महत्वाचा
महोत्सव असुन महाविद्यालयीन
युवकांमधील कलागुणांना
सादरिकरणाचे मोठे व्यासपीठ
आहे,
असे
प्रतिपादन कुलगुरू मा.
डॉ.
बी.
व्यंकटेश्वरलु
यांनी केले.
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात
15
वी
महाराष्ट्र राज्य आंतर
विद्यापीठ युवक महोत्सव
इंद्रधनुष्य 2017
स्पर्धेचे
आयोजन दिनांक 5
ते
9
नोव्हेबर
दरम्यान करण्यात आले असुन
त्यानिमित्य दिनांक 3
नोव्हेबर
रोजी विद्यापीठाचे
माननीय कुलगुरू मा.
डॉ.
बी.
व्यंकटेश्वरलु
यांच्या अध्यक्षतेखाली
पत्रकार परिषद संपन्न झाली,
त्यावेळी
ते बोलत होते.
यावेळी
शिक्षण संचालक डॉ.
विलास
पाटील,
विस्तार
शिक्षण संचालक डॉ प्रदिप
इंगोले,
विद्यापीठ
अभियंता डॉ अशोक कडाळे,
विद्यार्थ्यी
कल्याण अधिकारी डॉ महेश
देशमुख, डॉ हिराकांत काळपांडे
आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू
मा.
डॉ.
बी.
व्यंकटेश्वरलु
पुढे म्हणाले की,
महोत्सवानिमित्त
युवकामध्ये सांस्कृतिक
जागृती होते,
प्रेरणा
मिळते.
तसेच
यानिमित्त परभणी शहरातील
नागरिकांना सांस्कृतिक
कार्यक्रमाच्या माध्यमातुन
मनोंरजनाची मोठी संधी असल्याचे
ते म्हणाले.
यावेळी
शिक्षण संचालक डॉ विलास पाटील
यांनी महोत्सव आयोजनाबाबत
सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन विद्यार्थ्यी
कल्याण अधिकारी डॉ महेश
देशमुख यांनी केले तर आभार
प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी
डॉ प्रविण कापसे यांनी केले.
पत्रकार
परिषदेस शहरातील विविध प्रसार
माध्यमांचे प्रतिनिधी मोठया
संख्येने उपस्थित होते.