Monday, November 6, 2017

इंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सव - लघुनाटिका क्षणचित्रे

जल्‍लोष तरूणाईचा






वनामकृवित आयोजित इंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सवात पहिल्‍या दिवसी दिनांक 5 रोजी लघुनाटिका स्‍पर्धेस प्रक्षेकांनी मोठा प्रतिसाद दिला. एकुण सोळा विद्यापीठाच्‍या संघाने सहभाग नोंदविला. यात माणुसकी या लघुनाटिकेच्‍या माध्‍यमातुन माणसातल्‍या मनात असणारी माणुसकी कोठेतरी लोप पावत आहे, याचे चित्रण केले. मंकीबात या लघुनाटिकेच्‍या समाज माध्‍यमांचा अतिरेक वापर व त्‍या व्‍दारे परसविण्‍यात येणा-या अफवा यांची मांडणी केली. आजच्‍या धावपळीच्‍या व दगदगीच्‍या जगात सामान्‍य माणसामध्‍ये सुजाणत्‍व हे कुठेतरी हरवल्‍यासारखे झाले असल्‍याचे चित्रण कॉमन मॅन लघुनाटिकेतुन साकार केले. शेतक-यांच्‍या व्‍यथा व शेतकरी आत्‍महत्‍या यांचे विदारक चित्र ब्‍ल्यु व्‍हेल लघुनाटिकेतुन मांडले तर स्‍वच्‍छ भारत अभियान लघुनाटिकेत बाहुबली चित्रपटातील व्‍यक्‍तीरेखांच्‍या व्‍दारे स्‍वच्‍छतेचे महत्‍व पटवुन दिले. तसेच मावळा, धैर्य, हुप हुप हुप, हमे खेद है, घ्‍या सांभाळुन, बारस, हे असेच चालयेच आदी लघुनाटिकेच्‍या माध्‍यमातुन देशातील व राज्‍यातील ज्‍वलंत प्रश्‍नावर विद्यार्थ्‍यीं मांडले. यावेळी प्रक्षेकांनीही भरभरुन दाद दिली