मा. डॉ. विलास भाले यांची डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणुन निवडीबाबत भारतीय कृषिविद्या संस्थेच्या परभणी शाखेच्या वतीने सपत्नीक सत्कार
कोणत्याही
क्षेत्रात यश प्राप्त
करण्यासाठी काम करण्याची
इच्छा,
निष्ठा
व कामा प्रती पुर्ण समर्पण
पाहिजे,
कृषि
विद्यापीठातील विद्यार्थ्यांना
सक्षम करण्यासाठी प्रात्यक्षिकांवर
जास्त भर देणे आवश्यक आहे,
असे
प्रतिपादन अकोला येथील डॉ
पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे
नवनियुक्त कुलगुरू मा.
डॉ
विलास भाले यांनी केले.
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील
भारतीय कृषिविद्या संस्थेच्या
परभणी शाखेच्या वतीने कृषि
महाविद्यालयात दिनांक 20
रोजी
शाश्वत शेतीकरिता संसाधन व्यवस्थापन याविषयावर
कुलगुरू मा.
डॉ
विलास भाले यांच्या व्याख्यानाचे
आयोजन करण्यात आले होते,
त्याप्रंसगी
ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कुलगुरू
मा.
डॉ
बी व्यंकटेश्वरलु हे होते
तर प्रमुख पाहुणे म्हणुल
माजी शिक्षण संचालक डॉ एम
व्ही ढोंबळे हे उपस्थित होते.
शिक्षण
संचालक डॉ विलास पाटील,
संशोधन
संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर,
विस्तार
शिक्षण संचालक डॉ प्रदिप
इंगोले,
विद्यापीठ
अभियंता डॉ ए एस कडाळे,
प्राचार्य
डॉ डि एन गोखले आदींची प्रमुख
उपस्थिती होती.
कुलगुरू
मा.
डॉ.
विलास
भाले आपल्या व्याख्यानात
पुढे म्हणाले की,
कृषिच्या
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष
फवारणी,
नांगरणी,
ट्रॅक्टर
चालविणे,
खुरपणी
आदी आले पाहिजे,
तरच
ते सक्षम बनतील.
राज्यातील
80
टक्के
शेती ही कोरडवाहु असुन शेतीसाठी
एक ते दोन संरक्षित पाण्याची
सोय झाली तर शेतक-यांचे
उत्पादन दुप्पट होऊ शकते
हे प्रयोगांती सिध्द झाले
आहे.
राज्यातील
विद्यापीठे सक्षम करण्यासाठी
विद्यापीठ मॉडेल अॅक्ट
राबविण्याची गरज असुन देश
पातळीवर विद्यापीठाचे मुल्यांकन
सुधारण्यासाठी सर्वांना
गांभीर्यानी प्रयत्न करावी
लागतील.
अकोला
कृषि विद्यापीठाचा कुलगुरू
म्हणुन काम करतांना परभणीच्या
कृषि विद्यापीठात कार्यरत
असतांना केलेल्या कामाच्या
अनुभवाचा निश्चितच फायदा
होईल,
असे
प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षीय
समारोप कुलगुरू मा.
डॉ.
बी.
व्यंकटेश्वरलु
यांनी केला तर माजी शिक्षण
संचालक डॉ एम व्ही ढोंबळे
आपल्या मनोगतात म्हणाले
की,
मा.
कुलगुरू
डॉ विलास भाले यांचे परभणी
कृषि महाविद्यालयाच्या
जडणघडणीत मोठे योगदान आहे.
कार्यक्रमात
शिक्षण संचालक डॉ विलास पाटील,
संशोधन
संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर,
विस्तार
शिक्षण संचालक डॉ प्रदिप
इंगोले आदींनी आपले मनोगत
व्यक्त केले.
कार्यक्रमात
अकोला येथील डॉ पंजाबराव
देशमुख कृषि विद्यापीठाचे
कुलगुरू म्हणुन नियुक्तीबाबत
मा.
डॉ
विलास भाले यांचा सन्मानपत्र
देऊन मान्यवरांच्या हस्ते
सपत्नीक सत्कार करण्यात
आला.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक प्राचार्य डॉ
डि एन गोखले यांनी केले.
सुत्रसंचालन
डॉ ए एस कार्ले यांनी केले तर
आभार डॉ डब्लु एन नारखेडे
यांनी मानले.
कार्यक्रमास
विद्यापीठातील अधिकारी,
कर्मचारी,
शास्त्रज्ञ
व विद्यार्थ्यी मोठया संख्येने
उपस्थित होते.