खेळामुळे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य
चांगले राहते, प्रत्येकांनी एकतरी खेळ किंवा छंद जोपासला पाहिजे. राज्यातील
चारही कृषि विद्यापीठे व महाबीज कर्मचारी क्रीडा स्पर्धेमुळे अधिकारी व कर्मचारी यांच्यातील
नाते दृढ होण्यास मदत होईल तसेच संस्थेतील कार्यालयीन वातावरण खेळीमेळीचे राहुन
कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विलास भाले यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात राज्यातील चारही कृषि
विद्यापीठे व महाबीज यांच्या कर्मचारी क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 22 ते 24 जानेवारी दरम्यान
करण्यात आले असुन सदरिल स्पर्धेच्या उदघाटनाप्रसंगी (दिनांक 22 जानेवारी) ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ
धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, अकोला
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ पी आर कडु, महाबीजचे श्री प्रभुल्ल लहाने, विद्यापीठ
नियंत्रक श्री एन एस राठोड, विद्यार्थ्यी कल्याण अधिकरी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले
की, राज्यातील कृषि विद्यापीठात मनुष्यबळाचा मोठा तुडवडा आहे, आज प्रत्येक जणावर
कामाचा ताण आहे. क्रीडास्पर्धेमुळे दैनंदिन तणावातुन काही प्रमाण कर्मचा-यांना
मुक्त वातावरणात वावरता येईल. खेळामुळे कर्मचा-यांमधील संघभावना वाढीस लागण्यास
मदत होईल, संघाभावनेमुळे अनेक कार्य सहज पुर्ण होतात, असे प्रतिपादन त्यांनी
केले.
मनोगतात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी
खेळामुळे जीवनात खेळाडुवृत्ती वाढ होते असे सांगितले तर प्रास्ताविकात विद्यार्थ्यी
कल्याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी क्रीडा स्पर्धे आयोजनाबाबतची भुमिका विशद
केली. यावेळी वनामकृवि ध्वजाचे ध्वजारोहन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते
तर क्रीडास्पर्धेच्या ध्वजाचे ध्वजारोहन कुलगुरू मा डॉ विलास भाले यांच्या
हस्ते करण्यात आले. क्रीडाज्योतीचे प्रज्वलन कुलसचिव श्री रणजित पाटील यांच्या
हस्ते करण्यात आले. तसेच सहभागी संघानी संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली. सुत्रसंचालन
डॉ पपित गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ सचिन मोरे यांनी मानले.
सदरिल स्पर्धेत तेरा क्रीडा प्रकारात अकोला येथील डॉ पंजाबराव
देशमुख कृषि विद्यापीठ, दापोली येथील
बाबासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, महात्मा फुले
कृषि विद्यापीठ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ व महाबीज येथील दोनशे पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. यात क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, बॉस्केटबॉल, टेबलटेनिस, रस्सीखेच, कबडडी, धावणे, रांगोळी, बुध्दीबळ आदी मैदानी खेळासह गीतगायन व मिमीक्री स्पर्धेाही आयोजित करण्यात आल्या आहेत.
सदरिल स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण दिनांक 24 जानेवारी रोजी परभणीचे आमदार
मा डॉ राहुल पाटील व परभणी जिल्हा बॅडमिंटन असोशियनचे सचिव श्री रविंद्र देशमुख
यांच्या प्रमुख उपस्थित पार पडणार आहे.