वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे विस्तार शिक्षण संचालक
डॉ. डी. बी. देवसरकर यांना भुवनेश्वर येथील ओरिसा कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठात "कापूस
पिकाच्या समस्या व उपाययोजना'' यावर दिनांक २२ ते २४ जानेवारी दरम्यान आयोजित राष्ट्रीय परिसंवादात कापूस
पिकातील उल्लेखनीय संशोधन कार्याबद्दल प्राफेशनल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानीत करण्यात
आले आहे. परिसंवादात ओरिसा कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. आर. के.
अग्रवाल व उद्यपुर येथील महाराणा
प्रताप कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. एन. एस. राठोड यांच्या
हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदरिल परिसंवादाचे आयोजन कापूस संशोधन व
विकास संघटना, हिस्सार आणि भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली यांच्यातर्फे करण्यात
आले होते.
विद्यापीठाचे कपाशीचे देशी वाण, अमेरिकन सरळ व संकरित वाण विकसीत करण्यात डॉ.
डी. बी. देवसरकर यांनी कापूस पैदासकार आणि कापूस विशेषज्ञ म्हणून मोलाचे योगदान
आहे. यात एनएचएच २०६, एनएचएच २५० व एनएचएच ७१५ हे अमेरिकन संकरित कपाशीचे वाण व एनएच ६१५ व एनएच ६३५
हे अमेरिकन कपाशीचे सरळ वाण मध्य भारतासाठी लागवडीकरिता प्रसारीत करण्यात आले.
पीएचए ४६, पीए १८३, पीए ०८, पीए ५२८ व पीए ७४० हे देशी कापूस
वाण प्रसारित करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. बी टी कापूस उत्पादन तंत्रज्ञान,
एकात्मीक कीड व रोगांच्या व्यवस्थापनावर संयुक्त संशोधन समिती मार्फत विविध शिफारशी
करण्यात मोलाचा सहभाग आहे. या शिफारशी पीक प्रात्यक्षीके, शेतकरी मेळावे, कृषि प्रदर्शने, कृषि दिंडी इत्यादी
माध्यमाद्वारे शेतक-यांपर्यत पोहचविण्याचे कार्यही त्यांनी केले आहे. त्यांनी आचार्य
व पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून काम केले असुन
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय नियतकालीकात मध्ये संशोधनपर व इतर माध्यमातुन मराठी
लेखांचे लिखान केले आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये सहभाग
नोंदवून संशोधन लेखांचे सादरीकरण केले.