Saturday, May 2, 2020

वनामकृविच्‍या मध्‍यवर्ती रोपवाटिकेत विविध फळपिकांची कलमे उपलब्‍ध


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी येथील मध्‍यवर्ती रोपवाटीकेत विविध फळपिकांची दर्जेदार कलमे व रोपे विक्री करिता उपलब्‍ध आहेत. यात आबांच्‍या केशरची बारा हजार कलमे, सिताफळाच्‍या बालानगर जातीची बारा हजार कलमे, करवंदाच्‍या कोकण गोल्‍डचे चार हजार कलमे, चिकुच्‍या कालीपत्‍ती, पेरूच्‍या सरदार व ललित, मोसंबीच्‍या न्‍युसेलर, तसेच लिंबाच्‍या साई शरबती, फुले शरबतीची व विक्रम, शोभीवंत झाड पाल्‍म रोपे उपलब्‍ध असुन पुढील जुन व जुलै महिन्‍यात पेरू, डाळिंब, जांभुळ, संत्रा, लिंबु, मोंसबी, अंजिर, चिंच आदी फळपिकांची रोपे व कलमे उपलब्‍ध होणार असल्‍याची माहिती मध्‍यवर्ती रोपवाटिकेचे प्रभारी अधिकारी डॉ संतोष बरकुले यांनी सांगितले आहे. रोपे व कलमे खरेदी व बुकिंग करिता शेतकरी बांधवानी डॉ संतोष बरकुले यांच्‍या 9834225799 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत मराठवाडा विभागात विविध फळांचे संशोधन केंद्र व कृषि विज्ञान केंद्राच्‍या प्रक्षेत्रावर स्‍वतंत्र्य रोपवाटिका आहेत. यात परभणी येथे मध्‍यवर्ती रोपवाटिका असुन औरंगाबाद येथे फळ संशोधन केंद्र व कृषि विज्ञान केंद्रची स्‍वतंत्र रोपवाटीका  तसेच बदनापुर येथील मोसंबी संशोधन केंद्र व अंबेजोगाई येथे सिताफळ संशोधन केंद्र येथे ही स्‍वतंत्र्य रोपवाटिका आहेत. शेतकरी बांधवाना आपआपल्‍या जिल्‍हयातील रोपवाटिकेतुन विद्यापीठ विकसित रोपे उपलब्‍ध झाली पाहिजे, अशी संकल्‍पना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी मांडली, त्‍यानुसार संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली विविध रोपवाटिकेत ही रोपे उपलब्‍ध करून देण्‍याचा विद्यापीठाचा प्रयत्‍न आहे.