महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माननीय ना श्री दादाजी भुसे करणार शेतकरी बांधवाना संबोधीत
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय व महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २ जुन रोजी सकाळी ११.०० वाजता झुम मिटिंग सॉफ्टवेअरच्या माध्यमातुन ऑनलाईन सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असुन प्रमुख अतिथी म्हणुन राज्याचे कृषिमंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे सहभागी होऊन संबोधीत करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे राहणार असुन विशेष अतिथी म्हणुन अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विलास भाले, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ के पी विश्वनाथा, राज्याचे कृषि आयुक्त मा डॉ सुहास दिवसे हे सहभागी होणार आहेत. तसेच इंदौर येथील अखिल भारतीय सोयाबीन संस्थेचे संचालक डॉ व्ही एस भाटीया, पोकराचे प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे कृषि विद्यावेत्ता श्री विजय कोळेकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, औरंगाबाद विभागाचे कृषि सहसंचालक डॉ डी एल जाधव, लातुर विभागाचे कृषि सहसंचालक डॉ टी एन जगताप आदींचा प्रमुख सहभाग राहणार आहे.
कार्यशाळेत सोयाबीन पिकांचे विविध वाण व बिजोत्पादन तंत्रज्ञान यावर डॉ एस पी म्हेत्रे, सोयाबीन लागवडीवर डॉ यु एन आळसे, बीबीएफ तंत्राने सोयाबीन लागवडीवर डॉ स्मिता सोळंकी, सोयाबीन बीजप्रक्रियावर डॉ ए एल धमक, सोयाबीन बियाणे उगवणक्षमता तपासणीवर डॉ किशोर झाडे, सोयाबीन पिकांतील एकात्मिक कीड व्यवस्थापन डॉ पी आर झंवर, सोयाबीनवरील रोग व्यवस्थापन डॉ के टी आपेट, सोयाबीन पिकाचे काढणी पश्चात तंत्रज्ञान व मुल्यवर्धन यावर डॉ स्मिता खोडके आदी मार्गदर्शन करणार आहेत.
झुम मिटिंग सॉफ्टवेअर च्या माध्यमातुन सहभागी होण्यासाठी आयडी 382 912 7898 व पासवर्ड 431401 यांचा वापर करावा किंवा कार्यशाळेचे विद्यापीठ युटयुब चॅनेल www.youtube.com/user/vnmkv वर थेट प्रक्षेपण पाहता येईल. तरी सदरिल कार्यशाळेत जास्तीत जास्त शेतकरी बांधव व कृषि विस्तार कार्यकर्त्यानी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य विस्तार शिक्षणाधिकारी डॉ प्रशांत देशमुख, नाहेप मुख्य अन्वेषक डॉ गोपाळ शिंदे, परभणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ संतोष आळसे, अखिल भारतीय सोयाबीन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ एस पी म्हेत्रे आदींने केले आहे.