वनामकृवित संशोधनात्मक लिखाणावर ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमास सुरूवात
कृषि विद्यापीठाचे मानांकन उच्चाविण्यासाठी जागतिकस्तरावर संशोधनात्मक लेख प्रसिध्द होणे आवश्यक आहे. जागतिकस्तरावर कृषि विद्यापीठाचे संशोधन पोहचवण्याकरिता संशोधन लेखणाचा दर्जा वाढविण्याची गरज आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातुन संशोधन लेखणातील वाड्ःमयचौर्य रोखण्यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र धोरण निश्चित केले आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यापीठ ग्रंथालय व विस्तार शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20 मे ते 24 मे दरम्यान संशोधनात्मक लिखाणावर ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या प्रशिक्षणाच्या उदघाटन प्रसंगी (दिनांक 20 मे रोजी) ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील ग्रंथालय व माहितीशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ राजेंद्र कुंभार, तसेच विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ राजेश कदम, विद्यापीठ ग्रंथपाल डॉ संतोष कदम आदीनी ऑनलाईन सहभाग घेतला.
याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी सहभागी प्रशिक्षणार्थीना संबोधीत केले तसेच डॉ राजेंद्र कुंभार यांनी संशोधन लेखनातील वाड्ःमयचौर्य एक आव्हान यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठ ग्रंथपाल डॉ संतोष कदम यांनी केले. सुत्रसंचालन डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ राजेश कदम यांनी मानले.
सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमात कर्नाटक, उत्तर प्रदेश व राज्यातुन विविध विद्यापीठातील चारशेपेक्षा जास्त संशोधक, पदव्युत्तर विद्यार्थ्यी व प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला आहे. या प्रशिक्षणात दर्जेदार प्रकाशनात नैतिक पैलू यावर औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ डि के वीर, वाड्ःमयचौर्य एक समस्या यावर वनामकृविचे माजी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, उरकुंट अंन्टी प्लाजेरीझम सॉफ्टवेअर बाबत पुणे येथील प्रशिक्षक प्रिती राठी, संशोधन मेट्रिक्स वर गुलबर्गा विद्यापीठातील डॉ सुरेश जंगे, लिखाणाचे अवतरण यावर गोवा विद्यापीठाचे डॉ गोपा कुमार यांचे मार्गदर्शन होणार आहे.
प्रशिक्षण आयोजन समितीत विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, विद्यापीठ ग्रंथपाल डॉ संतोष कदम, जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे, डॉ रणजित चव्हाण, प्रा रवि शिंदे, श्री संतोष ढगे, डॉ वंदना जाधव, भगवान कांबळे, श्री मोहन झोरे आदींचा समावेश आहे.