Friday, May 22, 2020

वनामकृवित ऑनलाइन पद्धतीने साजरा केला जागतिक मधमाशी दिन



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभाग व मराठवाडयातील सर्व कृषि विज्ञान केंद्राचे पिक संरक्षण विषय विशेषज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत तिसरा जागतिक मधमाशी दिन दिनांक २० मे रोजी कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन करुन साजरा करण्यात आला.

र्चासत्राचे उद्घाटकुलगुरु मा डॉ. अशोक ढवण यांनी केले तर शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले व संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवराव देवसकर यांचा प्रमुख सहभाग होता. चर्चासत्रात विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, वनस्पती रोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कल्याण आपेट, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जगदीश जहागीरदार, प्रगतिशील मधमाशी संगोपक श्री. दिनकर पाटिल आदीचाही सहभाग होता.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, मधमाश्याचे पिकातील परागीभवनात मोठी भुमिका असुन मानवीस अन्‍न पुरवठा करण्‍यात त्‍यांचे योगदान आहे. मधमाश्यांची जीवनशैली, मधमाश्यांचे कुठलीही गाजावाजा न करता नेमुन दिलेले कार्य अविरतपणे करतात, ही जीवनशैली मानवाने आत्मसात करण्याची गरज आहे. मधमाशी पालन हा केवळ एक शेतीपुरक जोडधंदा न ठरता एक यशस्वी उद्योग होण्याची गरज व्यक्त केली. मराठवाड्यातील सर्व कृषि विज्ञान केंद्रानी मधमाशी पालनाचे प्रशिक्षणाचे वेळोवेळी आयोजन करुण उद्योजक निर्माण करावेत असे आवाहन त्‍यांनी केले.

यावेळी मनोगतात डॉ. देवराव देवसकर यांनी मधमाश्याचे परागीभवनातील महत्व या बाबतच्या संशोधनावर भर देण्याची गरज व्यक्त केली तर डॉ. धर्मराज गोखले यांनी मधाचे आयुर्वेदिक गुणधर्म व आहारातील महत्व याविषयी माहिती दिली.

मान्‍यवरांच्‍या हस्‍ते मधुमक्षिका पालन एक कृषिपुरक उद्योग या पुस्तिकेचे विमोचन करण्‍यात आले. तांत्रिक सत्रात किटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मधमाशाच्या विविध प्रजाती बददल माहिती दिली तर चाकुर येथील प्रगतिशील शेतकरी श्री. दिनकर पाटील यांनी चाकुर येथून चर्चासत्रा सहभाग नोंदवुन मधमाशी संगोपन, मध काढनी, विविध प्रजातचा मध आदींबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड यांनी मधमाशाचे महत्व सांगितले. सुत्रसंचालन खरपुडीचे विषय विशेषज्ञ डॉ. अजय मिटकरी यांनी केले तर आभार प्रदर्शन मांजरा केव्हीकेचे विषय विशेषज्ञ डॉ. संदीप देशमुख यांनी केले. चर्चासत्रात शंभर पेक्षा जास्‍त शेतक-यांना सहभाग नोंदविला. चर्चासत्रात कृषि कीटकशास्त्र विभागातील डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ. धीरज कदम, डॉ. सदाशिव गोसलवाड, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. अनंत बडगुजर, डॉ. फारिया खान व डॉ. श्रध्दा धुरगुडे आदीसह विभागातील विद्यार्थी, कर्मचारी सोशल डीस्टंसिंगच्या नियमाचे काटेकोरपने पालन करुण सहभागी झाले होते तुळजापुर येथून डॉ. श्रीकृष्ण झगडे सहभाग नोंदविला.