वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय कृषि उच्च
शिक्षण प्रकल्प (नाहेप)
च्या वतीने दिनांक 4 ते 8 जुन
दरम्यान सुदुर संवेदन व
भौगोलीक माहिती प्रणाली (रिमोट सेन्सींग व जीआयएस) तंत्रज्ञानाचा आधुनिक
(अंकात्मक) शेतीमध्ये वापर या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात
आले होते, सदरिल प्रशिक्षण वर्गाचा समारोप दि. 08 जुन रोजी झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर तर
प्रमुख पाहुणे म्हणून अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा
डॉ. विलास भाले, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी
कुलगुरू मा डॉ. तपस भट्टाचार्य, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, वनामकृविचे माजी शिक्षण
संचालक डॉ. विलास पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ.
अशोक ढवण यांनी भविष्यात कृषि विद्यापीठांतील शास्त्रज्ञ, पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या
विद्यार्थ्यांनी सुदुर संवेदन (रिमोट सेन्सींग) तंत्रज्ञानाचा वापर करुन कृषी
संशोधनाची दिशा ठरवावी असे मत व्यक्त केले. कुलगुरू मा. डॉ. विलास भाले यांनी
विद्याशाखेत रिमोट सेन्सींग तंत्रज्ञानावर संशोधन करणे गरजेचे असल्याचे नमुद
केले तर माजी कुलगुरू मा डॉ. तपस भट्टाचार्य यांनी सुदुर संवेदन तंत्रज्ञानाचा मृद
विज्ञानात क्रांतीकारक बदल घडवत असे मत व्यक्त केले. माजी शिक्षण संचालक डॉ.
विलास पाटील व शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. निवडक प्रशिक्षणार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त
केले.
सदरील प्रशिक्षणात राष्ट्रीय
सुदुर संवेदन केंद्र, हैद्राबाद चे शास्त्रज्ञ डॉ. सी.एस. मुर्ती, राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि
भुमी उपयोग नियोजन संस्था, नागपुर येथील प्रधान शास्त्रज्ञ डॉ. ओ. बी. रेड्डी, वसुंधरा
जल व्यवस्थापन प्रकल्पाचे डॉ. प्रीतम वंजारी, डॉ. आर.एन. साहु, डॉ. श्रीनिवासन, डॉ. श्रीनिवास राव, डॉ. प्रशांत राजनकर, डॉ. विलास पाटील, डॉ मदन पेंडके आदींनी
सुदुर संवेदन व भौगोलीक माहिती प्रणाली या तंत्रज्ञानाचा आधुनिक शेतीमध्ये वापर
यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजक प्रा डॉ.
प्रविण वैद्य यांनी प्रशिक्षण वर्गाचा आढावा सादर केला तर प्रास्तावीक कृषि
अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी केले. नाहेप प्रकल्पाचे
प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाबाबत माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ.
पी. एच. गौरखेडे तर आभार डॉ. मदन पेंडके यांनी मानले. संपुर्ण देशातुन व विदेशातुन 450 प्रशिक्षणार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.
सचिन कराड, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. स्वाती मंुडे, अपुर्वा देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले तर डॉ.
आर.पी कदम, डॉ. एस.एस. फुलारी, डॉ. कैलाश डोखोरे, डॉ. पी.एच. गौरखेडे, डॉ. एस.पी. झाडे, डॉ. एस.एल. वाईकर आदींनी मदत केली.