वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या अंबाजोगाई येथील सिताफळ संशोधन केंद्राने वतीने कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिताफळाच्या विविध वाणाचे दर्जेदार कलम व रोपे तयार करण्यात आली असुन शेतक-यांकरिता विक्री करिता उपलब्ध आहे, अशी माहिती सिताफळ संशोधन केंद्र प्रमुख डॉ. गोविंद मुंडे यांनी दिली.
संशोधन केंद्रात सिताफळाच्या सुधारीत वाण धारुर-६ ची वीस हजार कलमे तसेच बालानगरी वाणाची तीस हजार कलमे, तसेच टिपी-७ ची दोन हजार कलमे, आर्का साहनची दिड हजार कलमे रामफळाची एक हजार कलमे, हनुमान फळाची एक हजार कलमे विक्रिसाठी उपलब्ध असुन कलमाचा दर प्रती कलम रु. ४० प्रमाणे आहे, तसेच साधी बालानगरीचे सत्तर हजार रोपे दर रु. २५/- प्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे.
सदरिल संशोधन केंद्राने निर्मीत केलेल्या विविध वाणांची लागवड खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागात मोठया प्रमाणात झाली असुन तामिळनाडु व मध्यप्रदेशातील शेतक-यांमध्येही मोठया प्रमाणात रोपांची मागणी होते. सिताफळातील विविध वाणातील धारुर-६ या वाणास मोठी मागणी असुन याचे वैशिष्टय म्हणजे फळाचा आकार मोठा असुन वजन ४०० ग्राम पेक्षा जास्त आहे तर साखरेचे प्रमाणे १८ टक्के व घनदृव्याचे प्रमाण २४ टक्के असल्यामूळे प्रक्रीया उद्योगामध्ये याची मागणी मोठी आहे. तसेच प्रक्रिया उद्योगात बालानगर या फळांचीही मागणी असते. सिताफळाच्या गराचा मिल्कशेक, रबडी, आईक्रीममध्ये मोठया प्रमाणात वापर होत असुन गराची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. गोविंद मुंडे यांनी दिली असून सिताफळ लागवडीसाठी शेतक-यांनी महाराष्ट्र शासनाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. रोपांसाठी डॉ गोविंद मुंडे यांच्याशी संपर्क करावा, मोबाईल क्रमांक ८२७५०७२७९२.