वनामकृवी आणि रिलायन्स फाऊंडेशन चा उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि रिलायन्स
फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक
दिनांक 25 जुलै रोजी ऑडिओ
कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले होते. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक विस्तार शिक्षण संचालक डॉ डी बी देवसरकर,
विस्तार कृषी विध्यावेत्ता डॉ यु एन आळसे,
डॉ मिर्झा बेग, डॉ दिगांबर पटाईत आदींनी मार्गदर्शन केले .
शेतकरी बांधवाना उस बेने निवड, उस आंतर पिक,
ऊस बेने प्रक्रिया ,एकात्मिक खत व्यवस्थापन , सेंद्रीय
खते, रासायनिक खते, ठिबक सिंचनातून
नत्रयुक्त खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, आंतर
मश्यागत, पाणी व्यवस्थापन
आदीवर मार्गदर्शन
करण्यात आले. तसेच शेतकरी बांधवानी आपले विविध विषयांवर प्रश्न विचारले, त्यास विद्यापीठ शास्त्रज्ञांनी उत्तरे दिली.
मराठवाडा विभागात उस पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जाते, त्यामुळेच
पाण्याची उपलब्धता असलेल्या तालुक्यामध्ये उस पिक लागवड केली जाते त्या करिता उस
उत्पादक शेतकरी बांधवाना मार्गदर्शन मिळावे याच उद्देश्याने
कॉन्फरन्स मध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी सहभाग
नोंदवला. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फोउन्डेशन परभणी जिल्हा
व्यवस्थापक विलास सवाणे व कार्यक्रम सहाय्यक रामाजी राऊत यांनी केले.