वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय कृषि अनुसंधान परिषद व जागतिक बॅक पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प नाहेप वतीने दिनांक 9 ते 13 जुन दरम्यान एक आठवडयाचे ऑनलाईन राष्ट्रीय प्रशिक्षण वर्गाचेू आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप दिनांक 13 जुन झाला, या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते, तर जयपुर येथील राष्ट्रीय कृषि विपणन संस्थेचे संचालक उॉ चंद्रशेखर, मुंबई येथील मनोचिकीत्सक डॉ राजेंद्र बर्वे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले आदींचा प्रमुख सहभाग होता.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, सद्याच्या कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीत डिजीटल व्यासपीठाच्या माध्यमातुन विद्यापीठ शेतकरी, विद्यार्थ्यी, संशोधक आदीपर्यत पोहचत आहे. शेतक-यांपर्यंत उपयुक्त कृषि तंत्रज्ञान योग्य वेळी व प्रभावीपणे पोहचविण्यासाठी याचा करावा, असे प्रतिपादन त्यांनी केले.
मार्गदर्शनात डॉ चंद्रशेखर यांनी कोरोना विषाणु रोगाच्या काळात शेतक-यांनी करिता गटशेतीच्या माध्यमातुन डिजीटल अॅपचा वापर करून थेट ग्राहकांशी संपर्क साधुन शेतमाल विक्री करावा, असा सल्ला दिला.
प्रशिक्षण वर्गाच्या उदघाटनप्रसंगी भारतीय वैद्यकिय संशोधन परिषदेचे उपसंचालक पदश्री मा डॉ रमण गंगाखेडकर , एमजीएम आरोग्य विज्ञान संस्थेचे कुलगुरू मा डॉ शशांक दळवी, आयआयटी पवईचे विभागप्रमुख डॉ सतीश अग्निहोत्री, प्रसिध्द वैद्यकिय तज्ञ डॉ रामेश्वर नाईक, डॉ किरण सगर, डॉ आनंद देशपांडे, डॉ आशा आर्या, डॉ लिना बडगुजर, डॉ सुजा कोशी, डॉ राजेंद्र बर्वे आदींनी मार्गदर्शन केले.
समारोपीय कार्यक्रमात निवड प्रशिक्षणार्थी शैलेंद्र कटके, डॉ प्रेरण धुमाळ, डॉ स्मिता देशमुख, अशु कर्ण आदींनी आपले मनोगत व्यक्त करून प्रशिक्षणातील मार्गदर्शनाचा निश्चितच लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रशिक्षण वर्गात नेपाळ, पाकिस्तान, जपान आदीसह देशातुनही देशातील 25 राज्यातुन 450 कृषिचे विद्यार्थ्यी, प्राध्यापक व शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला होता. प्रशिक्षण वर्गाचे आयोजन सचिव डॉ वीणा भालेराव, प्रा संजय पवार, डॉ मेघा जगताप आदींनी केले तर तांत्रिक सहाय्य डॉ अविनाश काकडे, डॉ रश्मी बंगाले, शैलेश शिंदे आदी केले.