बेंगलोर येथील राष्ट्रीय युवा महोत्सवात मेंदी ललित कलाप्रकारात वनामकृविच्या सिध्दी देसाई हिने पटकाविले कांस्य पदक
भारतीय विश्वविद्यालय संघाच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या
३६ वा आंतर विद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव – जैन उत्सव २०२३ स्पर्धा बंगलोर
येथील जैन विद्यापीठात दिनांक २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान पार पडला. यात मेंदी कला
प्रकारात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या लातुर येथील कृषि
महाविद्यालयाची विद्यार्थींनी सिध्दी देसाई हिने कांस्य पदक पटकावले.
सदर युवा महोत्सवात देशातील आठ विभागांतर्गत असलेल्या १२५ विद्यापीठातील
२१७० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. यात नृत्य, संगीत, नाटक, ललित कला व साहित्य आदी कलाप्रकाराच्या स्पर्धा
घेण्यात आल्या. सिध्दी देसाई हिने मेंदी कला प्रकार स्पर्धेत पश्चित विभागात सुवर्ण
पदक विजेती ठरली होती. पारितोषिक वितरण सोहळयात सिध्दी देसाई हिला भारतीय विश्वविद्यालया
संघाचे संयुक्त सचिव डॉ बलजीत सिंह सिखोन व जैन विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ राज सिंह
यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सिध्दी देसाईच्या यशाबाबत विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र
मणि, शिक्षण
संचालक डॉ धर्मराज गोखले, लातुर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता
डॉ बाबासाहेब ठोंबरे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ सचिन मोरे, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. ज्योती देशमुख, डॉ विजय भामरे, डॉ दयानंद मोरे, डॉ आशा देशमुख, डॉ गोदावरी पवार आदीसह विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन
केले.