जगातील सर्वात तरूण शास्त्रज्ञ प्रा. सोबोर्नो आइजैक बारी यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकूल अणि कुलगुरू मा डॉ प्रा इन्द्र मणि यांची दिनांक १ जानेवारी रोजी भेट घेतली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि परभणी ॲस्ट्रोनोमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणा-या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल करिता मार्गदर्शक म्हणुन कार्य करण्याचे त्यांनी मान्य केले. यावेळी भविष्यातील विज्ञान प्रगतीबाबत मा डॉ प्रा इन्द्र मणि यांनी तरूण शास्त्रज्ञ श्री सोबोर्नो आइजैक बारी यांच्याशी चर्चा केली.
प्रा सोबोर्नो आइजैक बारी यांची परभणी कृषी विद्यापीठात
उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकूलास भेट दिली, यावेळी त्यांच्या हस्ते कम्युनिटी
मॅथ लॅब च्या शेजारी वटवृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. प्रा सुबोर्नो इसाक बारी याचे नाव या वटवृक्षास
देण्यात आले. त्यासमयी ते म्हणाले की "As this tree grows, Bari
grows, International science park grows & Parbhani also grows..." संकुलामध्ये होत असलेल्या प्लॅनेटोरियम त्याचबरोबर जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित
या विषयाच्या प्रयोगशाळा तसेच ७ डी थेटर या सर्व गोष्टींना भेट देऊन पाहणी केले, अतिशय दर्जेदार पद्धतीचा हे विज्ञान संकल्पनेमध्ये होत असल्याचे सांगुन याचा
फायदा शालेय विद्यार्थ्यांना आणि परभणीसाठी निश्चित होईल असं मत व्यक्त त्यांनी केले.
परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीने विज्ञान संकुलाची प्रतिमा व सन्मानचिन्ह देऊन प्रा बारी आणि त्यांचे वडील प्राध्यापक रसीद बारी
यांचा सत्कार करण्यात आला.
प्राध्यापक सोबोर्नो आइजैक बारी हे जगातील सर्वात तरुण
शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक आहेत केवळ अकरा वर्ष वय असणारे प्राध्यापक सोबोर्नो आइजैक
बारी हे आइजैक या नावाने अमेरिकेत संबोधले जातात. त्याच्याकडे अमेरिकन नागरिकत्व आहे.
२०१४ साली त्यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते लेटर ऑफ रेकग्निशन
प्रदान करण्यात आले. नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या हस्ते सोबोर्नो
यांना 'ग्लोबल चाइल्ड प्रोडिजी अवॉर्ड' मिळाला आहे. प्रोफेसर
सोबोर्नो इसाक बारी यांना विज्ञान आणि गणित विषयात अद्भुत असे ज्ञान असुन त्यांच्या
कडे अलौकिक बुद्धिमत्ता आहे. त्यानी 'द लव्ह' नावाचे पुस्तक वयाच्या चार वर्षाचा असताना लिहिले
आहे. भविष्यातील पुढील त्यांचे दुसरे पुस्तक मनिष नावाचे लवकरच प्रसिद्ध होणार आहे. .
यावेळेस परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक, उपाध्यक्ष डॉ. पी आर पाटील, सचिव सुधीर सोनुनकर, डॉ आनंद बडगुजर, प्रा. नितीन लोहट, डॉ रणजीत लाड, डॉ. विजयकिरण नरवाडे, दीपक शिंदे, प्रसाद वाघमारे, अशोक लाड, ज्ञानराज खटिंग, दत्ता बनसोडे, राम कराळे, प्रसन्न भावसार आणि जिजाऊची सर्व टीम उपस्थित होती.