परभणी ऍस्ट्रॉनिकल सोसायटी व वनामकृविचा अभिनव उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि परभणी
एस्ट्रॉनिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ जानेवारी रोजी एक दिवसीय सक्रिय
जनगणित कार्यशाळेचे आयोजन आले होते. कार्यशाळेचे उदघाटन कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि
यांच्या हस्ते झाले. कार्यशाळेत गणित तज्ञ डॉ. विवेक माँटेरिओ आणि गीता महाशब्दे
यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठातवर शिक्षणाधिकारी योजना संजय ससाणे, डॉ.योगेंद्र रॉय, विद्यापीठ अभियंता श्री.दीपक
काशाळकर, संप्रियाताई राहुल पाटील, डॉ.रामेश्वर
नाईक, डॉ.पी आर पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले
की, गणित हा सर्व शास्त्रांचा पाया असुन गणितात पांरागत असणे आवश्यक आहे.
परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी गत अनेक वर्षांपासून
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आणि वैज्ञानिक संशोधनाच्या अनेक उपक्रमांचे आयोजन
करत असते, त्याचाच एक भाग म्हणून परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ९३ उपक्रमशील गणित
शिक्षकांनी कार्यशाळेत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा
परिचय उपक्रमशील शिक्षक नागेश वाईकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन कैलास सुरवसे
यांनी तर आभार सुधीर सोनुनकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी परभणी
एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक, सचिव
सुधीर सोनुनकर, डॉ. रणजीत लाड, श्रीमती
कमल चव्हाण, प्रसाद वाघमारे, श्री.दत्ता
बनसोडे, आकाश नरवाडे, श्री.आनंद बडगुजर, डॉ.बाहुबली निंबाळकर, अशोक लाड, दीपक शिंदे, प्रसन्न भावसार, ज्ञानराज
खटिंग आदींनी परिश्रम घेतले.