Tuesday, October 1, 2013

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाबाबतचा सकाळ अॅग्रोवन मध्ये दि 28 सप्टेंबर 2013 रोजी प्रसिध्द झालेला संपादकीय लेख


सेलू येथील लोक माहिती अभियानात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्याच प्रदर्शनी दालनास शेतकरी बांधवाचा मोठा प्रतिसाद

विद्यापीठाच्‍या वतीने मांडण्‍यात आलेल्‍या दालनास परभणी जिल्‍हयाचे खासदार मा ना अॅड गणेशरावजी दुधगांवकर भेटी दिली त्‍याप्रसंगी माहिती सांगतांना श्री वैजनाथ सातपुते, श्री संजय मोरे, श्री गणेश कटारे आदी.
तांत्रिक सत्रात कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. आनंद गोरे यांनी विद्यापीठाच्‍या विस्‍तार योजनेबाबत माहिती देतांना.

सेलू येथे दिनांक 26 ते 28 सप्‍टेंबर 2013 दरम्‍यान केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालयाच्‍या पत्र सूचना कार्यालयाच्‍या वतीने तसेच राज्‍यशासनाच्‍या विविध विभागाच्‍या मदतीने लोक माहिती अभियान संपन्‍न झाले. या लोक माहिती अभियानात आयोजीत प्रदर्शनीमध्‍ये विद्यापीठ विकसीत विविध तंत्रज्ञान व पिकांचे वाणांची माहिती असलेले सुसज्‍ज असे दालन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने मांडण्‍यात आले होते या दालनास  परभणी जिल्‍हयाचे खासदार मा ना अॅड गणेशरावजी दुधगांवकर यांच्‍यासह अनेक मान्‍यवरांनी तसेच शेतक-यानी मोठ्या संख्‍येंनी भेटी दिल्‍या. श्री वैजनाथ सातपुते, श्री संजय मोरे, श्री गणेश कटारे व श्री बालाजी भुसारे यांनी भेटी देणा-या शेतक-यांना माहिती दिली.

अभियानाच्‍या दुस-या दिवशी तांत्रीक सत्रामध्‍ये कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. आनंद गोरे यांनी विद्यापीठाच्‍या विस्‍तार योजनेबाबत माहिती दिली. अभियानाच्‍या समारोपीय कार्यक्रमात विद्यापीठाच्‍यावतीने कृषि अभियांत्रीकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी विद्यापीठाच्‍या कार्याबाबत आपल्‍या भाषणात माहिती दिली. 

Friday, September 27, 2013

जिल्‍हाधिकारी मा. श्री एस. पी. सिंग यांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास सदिच्‍छा भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मध्‍यवर्ती ग्रंथालयास भेट दिली त्‍याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करतांना जिल्‍हाधिकारी मा. श्री एस. पी. सिंग, सोबत कुलगूरू डॉ किशनराव गोरे, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर,  प्रभारी ग्रंथपाल डॉ जे बी जगताप आदी
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रास जिल्‍हाधिकारी मा. श्री एस. पी. सिंग यांनी भेट दिली त्‍याप्रसंगी विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याबाबत मा‍हिती देतांना कुलगूरू डॉ किशनराव गोरे व व्‍यवस्‍थापक डॉ. आनंद गोरे आदी
परभणी जिल्‍ह्याचे जिल्‍हाधिकारी मा. श्री एस. पी. सिंग  यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास दिनांक 27 सप्‍टेंबर 2013 रोजी सदिच्‍छा भेट दिली. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. किशनरावजी गोरे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री का. वि. पागीरे, ग्रंथपाल डॉ. जे. बि. जगताप, डॉ. मेहत्रे आदि उपस्थित होते.
विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मध्‍यवर्ती ग्रंथालय, बिजोत्‍पादन प्रक्षेत्र, शेततळे, उद्यानविद्या विभाग व कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र या उपक्रमास भेट देवुन समाधान व्‍यक्‍त केले. विद्यापीठाच्‍या मध्‍यवर्ती ग्रंथालयातील अद्यावत सुविधांची पाहाणी करुन उपस्थित विद्यार्थ्‍यांशी संवाद साधला. विद्यार्थ्‍यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करतांना मा. श्री एस. पी. सिंग म्‍हणाले की, स्‍पर्धा परिक्षांमध्‍ये यश प्राप्‍त करण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांनी प्रामाणिक प्रयत्‍न व कठोर परिश्रम करावेत. कृषि पदविधरांनी शेतीवर प्रेम करण्‍याचा सल्लाही त्‍यांनी दिला. तसेच त्‍यांनी स्‍वत:चे अनुभव विद्यार्थ्‍यांना सांगितले. कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रात भेटी प्रसंगी व्‍यवस्‍थापक डॉ. आनंद गोरे यांनी विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याबाबत मा‍हिती दिली. 

Wednesday, September 25, 2013

जमीनाची प्रत सुधारण्‍यासाठी सेंद्रीय खतांचा वापर आवश्‍यक ........डॉ.विलास पाटील

शेतकरी मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना कृषि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ विलास पाटील
प्रास्‍ताविक करतांना डॉ. बि. एम. ठोंबरे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत, असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालय व सोयाबीन संशोधन केंद्र यांच्‍या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदुतांनी मौजे दामपुरी येथे रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दिनांक 25.09.2013 रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमास अध्‍यक्ष म्‍हणुन गांवचे सरपंच सौ. स्‍वाती बालासाहेब सुर्यवंशी तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन कृषि महाविद्यालयचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ. विलास पाटील, सोयाबीन संशोधन केंद्राचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. के. एस. बेग, ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे समन्‍वयक तथा विस्‍तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बि. एम. ठोंबरे, प्रभारी डॉ. आर. पी. कदम, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. आर. नागरगोजे,  प्रा. डि. टी. पवार, गावचे पोलीस पाटील श्री अण्‍णासाहेब गमे व उपसरपंच श्री माणिकराव गमे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. बि. एम. ठोंबरे यांनी केली. कृषि महाविद्यालयचे प्रभारी प्राचार्य डॉ. विलास पाटील म्‍हणाले कि, जमीनचे आरोग्‍य सुधारण्‍यासाठी सेंद्रीय खतांचा वापर आवश्‍यक असुन रासायनिक खतांची संतुलीत वापर करावा. डॉ. अशोक जाधव यांनी तण व्‍यवस्‍थापन माहिती दिली तर डॉ. डि. जी. मोरे यांनी खरीप व रबी हंगामातील येणा-या किडीबद्दल किटकनाशक फवारतांना घ्‍यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले तसेच डॉ संतोष पवार यांनी ए‍कात्मिक रोग व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन केले. लोहगावातील माजी जिल्‍हा परिषद सदस्‍य श्री सखारामजी लोहगांवकर व श्री माणिकराव गमे यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
शेतक-यांचे प्रश्‍नोउत्‍तराच्‍या माध्‍यमातून शेती विषयक शंकाचे समाधान शास्‍त्रज्ञांनी केले. यावेळी शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. मेळावा यशस्‍वी करण्‍यासाठी उमेश चादर, विनायक राठोड, साईनाथ तांबोळी, शेख आशिफ, श्रीकांत गोरे, बालाजी डाके, महेश देशमुख, विकास कदम, राहुल कच्‍छवा, नागेश एंगडे, अमोल मोरे, देवानंद गायकवाड, मनिष मस्‍के, वैभस सितापुरे, शेख शफीक, शेख मोईज, खातिब खालेद व विनायक राठोड कृषिदुतांनी परिश्रम घेतले.


Tuesday, September 24, 2013

शेतक-यांनी माती परिक्षण करूनच खतांचा संतुलीत वापर करावा.....डॉ. व्हि. डी. पाटील



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालय व अखिल भारतीय कोरडवाहु संशोधन केंद्र यांच्‍या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिकंन्‍यानी मौजे बाभुळगांव येथे रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दिनांक 23.09.2013 रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमास अध्‍यक्ष म्‍हणुन गांवचे सरपंच सौ. कुंताताई विठ्ठलराव पारधे तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ. व्हि. डी. पाटील व मुख्‍य शास्‍त्रज्ञ श्री सु. भा. चौलवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्‍तावना डॉ.आर.पी.कदम यांनी केली.
अधिक उत्‍पादनासाठी माती परिक्षण अत्‍यंत आवश्‍यक असुन एक वेळेस माती परिक्षण केल्‍यास तीन वर्ष त्‍याच्‍या आधारे खताचे नियोजन करता येते. सर्व शेतक-यांनी माती परिक्षण करूनच खतांचा संतुलीत वापर करण्‍याचा सल्‍ला कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ. व्हि. डी. पाटील यांनी आपल्‍या भाषणात दिला. डॉ. मेघा सुर्यवंशी यांनी करडई पिक लागवड तंत्रज्ञान व त्‍याची उपयुक्‍तता याबद्दल मार्गदर्शन केले; प्रा. सौ. एस. यु. पवार यांनी तण व्‍यवस्‍थापनांतर्गत विविध तणनाशके व त्‍याचा वापर ह्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. डि. आर. कदम यांनी एकात्मिक किड व्‍यवस्‍थापन तर डॉ. ए. पी. सुर्यवंशी यांनी ए‍कात्मिक रोग व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन केले. मुख्‍यशास्‍त्रज्ञ डॉ. चौलवार ह्यांनी कोरडवाहु पिकाबद्दल शेतक-यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी प्रश्‍नोत्‍तराच्‍या माध्‍यमातून शेतक-यांच्‍या शंकाचे समाधान करण्‍यात आले यावेळी गांवातील 100 ते 150 शेतकरी उपस्थित होते. मेळावा यशस्‍वी करण्‍यासाठी कृषिकन्‍या स्‍वाती आमले, शितल देशमुख, अनिता देशमुख, वैशाली देशमुख, सत्‍यभामा घाटुळ, अश्विनी गाडेकर, अल्‍का ढवळे, श्रुती जोगु, ज्‍योत्‍स्‍ना कुमारी, प्रियंका चव्‍हाण, प्रियंका कदम, सुरेखा कडेकर, शुभांगी कळंबे, वैशाली काळे, प्रियंका खटींग, ज्‍योती खुपसे, मधुरा कुलकर्णी, अश्विनी कुबडे, सरोजना पटेवाड, प्रितीमाला या सर्व कृषिकन्‍यांनी परिश्रम घेतले. 

राष्‍ट्रीय सेवा योजना दिन साजरा

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात 24 सप्‍टेंबर रोजी राष्‍ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्‍यात आला. राष्‍ट्रीय सेवा योजना स्‍थापना 1969 साली म. गांधीजीं यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त तत्‍कालीन केंद्रिय शिक्षण मा‍‍ डॉ. व्‍ही. के. आर. व्‍ही राव यांच्‍या सुचनेनुसार भारतातील प्रत्‍येक महाविद्यालयात करण्‍यात आली. त्‍या‍निमित्‍त सहयोगी अधिष्‍ठता व प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी रासेयो स्वयंसेवकांना स्‍वयं शिस्‍तीची शपथ दिली. तसेच म. गांधीजींच्‍या अहिंसा व सत्‍य या तत्वावर आधारीत व समाजोपयोगी भुमिका सर्व स्‍वयंसेवकांनी अंगीकृत करावी असा सल्‍ला त्‍यांनी आपल्‍या भाषणात दिला. भ्‍भ्‍भ्‍भुमिकार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा. रविंद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी रासेयोचे स्वयंसेवक सागर झावरे, सुनिल शिंदे, उमेश राजपुत, राजेंद्र पवार, कुमारी वैशाली खकाळ आदी परिश्रम घेतले.

एकात्मिक शेती पध्‍दती प्रारूपाची पाहणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या एकात्मिक शेती पध्‍दती संशोधन प्रकल्‍पास शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी भेट देउन विविध प्रयोगांची व एकत्मिक शेती पध्‍दती प्रारूपाची पाहणी केली. यावेळी मुख्‍य कृषिविद्यावेत्‍ता डॉ बा नि नारखेडे यांनी मान्‍यवरांना माहीती दिली. याप्रसंगी तण नियंत्रण योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ अशोक जाधव, श्री गि य सोनवणे, श्री समर्थ कारेगांवकर, श्री शेख एजाज, श्री शेख नुर, श्रीमती मिनाक्षी बेंडे, श्री इमरान आदी उपस्थित होते.