Wednesday, July 9, 2014

जांब येथे कृषिकन्‍याच्‍या बीजप्रक्रिया प्रात्‍यक्षिकास शेतक-यांचा मोठा प्रतिसाद


 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी  अंतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयच्‍या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत तण नियंत्रण योजनेच्‍या कृषिकन्‍यांनी दि. ८ जूलै रोजी मौजे जांब येथे बिज प्रक्रिया प्रात्‍यक्षिक उपक्रम राबविला. याप्रसंगी कृषिकन्‍यांनी सोयाबीन पिकासाठी रायझोबियम, पिएसबी आणि ट्रायकोडर्मा यांची बिज प्रक्रिया कशी करावी याबद्दलचे प्रात्‍यक्षिक शेतक-यांना करुन दाखविले. यास गावातील शेतकरांनी मोठा प्रतिसाद दिला. या उपक्रमास महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले, तणनियंत्रण योजनेचे विभाग प्रमुख डॉ. ए. एस. जाधव, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एल. बडगुजर यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रम यशस्‍वतीतेसाठी कृषिकन्‍या प्रियंका रेंगे, सुरेखा गरुड, चैताली चव्‍हाण, शारदा वाघ, कोमल शिंदे, अश्विनी ऐकाळ, अश्विनी गोटमवाड, अश्विनी खिलारे, सविता ढगे, अनुजा मुलगीर, स‍त्‍वशिला लोणकर, शिल्‍पा चवणे, सोनाली रोडे, रोहिणी शिंदे, कोमल खिल्‍लारे, ज्‍योती जळकोट, प्रिती थोरात यांनी परिश्रम घेतले. 

Tuesday, July 8, 2014

मौजे एरंडेश्‍वर येथे बीजप्रक्रिया प्रात्‍यक्षिकाचे आयोजन


     वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत एकात्मिक शेती पध्‍दती संशोधन केंद्रातंर्गत कार्यरत असलेल्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या कृषिकन्‍यांनी मौजे एरंडेश्‍वर ता. पुर्णा जि. परभणी येथे दिनांक ७ जुलै रोजी सोयाबीन जैविक खत रायझोबियमची बीजप्रक्रिये प्रात्‍यक्षिकाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी आत्‍मा योजनांतर्गत कृषिगटाचे अध्‍यक्ष श्री पांडुरंग काळे, उपसरपंच कल्‍याणराव काळे व ज्ञानोबा काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कृषिकन्‍यांनी जैविक खताचे महत्‍व व उपयोग याबद्दल सविस्‍तर माहिती सांगण्‍यात आली. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषिकन्‍या सुषमा नानजकर, जयश्री कदम, मुक्‍ता तांबे, वैशाली खिलारे, प्रिया शेळके, पुजा पौळ, वनिता सस्‍ते, अश्विनी सिरसठ, प्रियंका कदम, प्रियंका भारती, केतकी नवगीरे, सुजाता काळदाते, सोनि वाघ, योगिता सोळंके, रोहिणी कदम, दिपाली कांदे, दिपाली लंगोटै, मनिषा, सोनी खताळ, राधिका तिपटे व सुवर्णा पाणझडे परीश्रम घेतला. त्‍यांना डॉ डब्‍लु. एन. नारखेडे व डॉ. जयश्री एकाळे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास शेतकरी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Wednesday, July 2, 2014

‘कृषि सांज वाहिनी’ चे उदघाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा उपक्रम
कृषि सांज वाहिनी” च्‍या उदघाटन प्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, परभणी जिल्‍हा परिषदच्‍या अध्‍यक्षा श्रीमती मीनाताई बुधवंत, प्राचार्य डॉ. बी बी भोसले, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्रगतशिल शेतकरी श्री. सुर्यकांतराव देशमुख, श्री. सोपानराव अवचार, श्री केशवराव बुधवंत, कृषि विकास अधिकारी श्री बळीराम कच्‍छवे, डॉ हेमा सरंबेकर , डॉ आनंद गोरे व उपस्थिती अधिकारी व शेतकरी.
कृषि सांज वाहिनी” च्‍या उदघाटन प्रसंगी  सांज वाहिनी वर आलेल्‍या शेतक-यांच्‍या प्रश्‍नांना उत्‍तर देतांना शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे सोबत विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण,  परभणी जिल्‍हा परिषदच्‍या अध्‍यक्षा श्रीमती मीनाताई बुधवंत, प्राचार्य डॉ. बी बी भोसले, श्री केशवराव बुधवंत आदी.
*******************************************************
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रामार्फत दर मंगळवारी सकाळी  ९ ते  ११  या वेळेत कृषि माहिती वाहिनी ही सेवा शेतक-यांसाठी नियमित चालविली जाते. यासेवेतंर्गत ०२४५२-२२९००० या दुरध्‍वनी क्रमांकावर मोठया संख्‍येने शेतकरी शेतीबाबतच्‍या विविध शंकाचे निरासन करण्‍यासाठी विद्यापीठाच्‍या तज्ञांशी संपर्क साधत असतात. आता या वाहिनीचा लाभ शेतक-यांना दर मंगळवारी संध्‍याकाळी ६ ते  या वेळेतही होणार आहे. यासाठी दि.  जूलै २०१४  रोजी हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्‍या जन्‍मदिनी व कृषि दिनाचे औचित्‍य साधुन कृषि सांज वाहिनीचे उदघाटन करण्‍यात आले. या उदघाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण हे होते तर शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे, परभणी जिल्‍हा परिषदच्‍या अध्‍यक्षा श्रीमती मीनाताई बुधवंत, प्राचार्य डॉ. बी बी भोसले, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्रगतशिल शेतकरी श्री. सुर्यकांतराव देशमुख, श्री. सोपानराव अवचार, श्री केशवराव बुधवंत, कृषि विकास अधिकारी श्री बळीराम कच्‍छवे, डॉ हेमा सरंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ विश्‍वास शिंदे आपल्‍या भाषणात म्‍हणाले कि, कृषि सांज वाहीनी सुरू करणार कदाचित देशातील पहिले विद्यापीठ असुन, यामुळे शेतकरी व कृषि विद्यापीठ यांच्‍यातील नाते दृढ होण्‍यास मदत होणार आहे.
विद्यापीठ शेतक-यांच्‍या अडीअडचणी सोडविण्‍यासाठी सदैव तत्‍पर असते, या वाहिनीमुळे अजुन एक चांगले माध्‍यम शेतक-यांच्‍या शेतीच्‍या समस्‍या सोडविण्‍यासाठी विद्यापीठाने खुले केले आहे, अशी भावना पर‍भणी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा श्रीमती मीनाताई बुधवंत यांनी आपल्‍या भाषणात व्‍यक्‍त केली. तर परभणी कृषि महाविद्यापीठाचे प्राचार्य डॉ बी बी भोसले मनोगतात म्‍हणाले कि, कृषि विद्यापीठ अनेक माध्‍यमातुन शेतक-यांपर्यंत पोहचण्‍याचा प्रयत्‍न करीत असुन या कृषि सांज वाहिनी हे अजुन एका माध्‍यमाचा समावेश झाला आहे.
अध्‍यक्षीय समारोपात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण म्‍हणाले कि, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ नवनवीन विस्‍तार कार्यक्रमाच्‍या मार्फत शेतक-यांच्‍या बांधपर्यंत तंत्रज्ञान पोहचविण्‍याचे कार्य करीत असते, त्‍याचाच एक भाग म्‍हणजे ही कृषि सांज वाहिनी. या वाहिनीमुळे शेतकरी बांधव आपली शेतीची कामे आटोपुन गावात एकत्र बसुन सायंकाळाच्‍या वेळी वाहिनीवर विद्यापीठ तज्ञांशी प्रश्‍न विचारू शकतील, तरी अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या वाहिनीचा लाभ घ्‍यावा असे आवाहन त्‍यांनी केले आहे.
     प्रगतशील शेतकरी श्री. सुर्यकांतराव देशमुख, श्री. सोपानराव अवचार, श्री केशवराव बुधवंत, कृषि विकास अधिकारी श्री बळीराम कच्‍छवे, प्रा. दिलीप मोरे, डॉ हेमा सरंबेकर आदींनी ही आपले मनोगत व्‍यक्‍त करून वाहिनीस शुभेच्‍छा दिल्‍या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उदय वाईकर यांनी तर प्रास्‍ताविक डॉ आनंद गोरे यांनी केले.    
सदरिल वाहिनीची संकल्‍पना कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांची असुन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ आनंद गोरे यांनी याचा नियोजन आराखडा तयार केला आहे. या सांज वाहिनीचे काम कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. आनंद गोरे व त्‍यांचे सहकारी श्री. डी.डी. पटाईत व श्री. एस. बी. जाधव हे पाहणार असुन विद्यापीठातील विविध विषयतज्ञ त्‍यांना सहकार्य करणार आहेत.
या उदघाटन कार्यक्रमाच्‍या वेळी डॉ बी एम ठोंबरे, डॉ ए पी सुर्यवंशी, डॉ राकेश अहिरे, डॉ पी एन सत्‍वधर, प्रा. दिलीप मोरे, डॉ. ए. टी. शिंदे, डॉ एल बी चौलवार, डॉ. आनंद बडगुजर, डॉ जी पी जगताप, प्रा एस डी पायाल, डॉ शिवाजी शिंदे, डॉ ए एम भोसले, प्रा यु एन कराड तसेच विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

बाभळगाव येथे सोयाबीन बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक

   वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषी कार्यानुभवाच्‍या अखिल भारतीय समन्‍वयित कोरडवाहु संशोधन शेती प्रकल्‍पांतर्गत असलेल्‍या कृषिकन्‍यांनी बाभळगाव येथे दिनांक २८ जुन रोजी सोयाबीन बीज प्रक्रियेचे प्रात्‍यक्षिक करून दाखविले तसेच गांवातील शेतक-यांना बीजप्रक्रियेचे महत्‍व व पिकांसाठी जैविक खंताचा वापर कसा करावा याबाबत माहिती दिली.    हा कार्यक्रम वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ एल बी चौलवार व कार्यक्रम अधिकारी प्रा सुनिता पवार यांच्‍या मार्गदर्शनानुसार घेण्‍यात आला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषिकन्‍या सारीका गु्ट्टे, संजीवनी बारंगुळे, शारदा घोलप, राजश्री धोंडे, मनिषा दहे, पुनम जाधव, रूपाली इंगळे, शिवकन्‍या भरोसे, मीरा घुले, मोनाली देशमुख, सुजाता देशमुख, चेतना केसाटे, मनिषा गव्‍हाणे, स्‍वाती चव्‍हाण, गौरी दिक्षित, माधुरी भोसले, योगिता देसी, सोनी बुलरकर, प्रकृति मेश्राम, प्रीतु, लीनु, शमना, श्‍वेता, शिशीरा, श्रेया, सृष्‍टी, उत्‍तरा, आकांक्षा आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास गावातील शेतक-यांनी उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद दिला. 

Tuesday, July 1, 2014

हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांची १०१ वी जयंती साजरी



महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक यांच्‍या १०१ व्‍या जयंतीनिमित्‍य वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कृषिदिन साजरा करण्‍यात आला. यानिमित्‍य शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ. विश्‍वास शिंदे यांच्‍या हस्‍ते कै. वसंतराव नाईक यांच्‍या पुतळयाचे पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवणसंशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकरकृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या डॉ. हेमा सरंबेकरउद्यानविद्या महाविद्यालयाचे डॉ. एस बी रोहीदासविभाग प्रमुख डॉ. विलास पाटील, डॉ. भ. वि. आसेवार, डॉ. बी. एम. ठोंबरेडॉ. राकेश अहिरे तसेच विद्यापीठातील अधिकारीप्राध्‍यापकवृंद व कर्मचारी मोठया संख्‍येने उ‍पस्थित होते.

हरीतक्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांना विनम्र अभिवादन

Monday, June 30, 2014

स्‍व. वसंतराव नाईक - हरितक्रांतीचा दूत ................. डॉ. अशोक ढवण

हरित क्रांतीचे प्रणेते स्‍व वसंतराव नाईक यांचा जन्‍मदिन  1 जुलै रोजी संपुर्ण राज्‍यात 'कृषि दिन' म्‍हणुन साजरा केला जातो, त्‍या निमित्‍याने वनामकृविचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ.अशोक ढवण यांनी लिहीलेला लेख

डॉ. अशोक ढवण