Thursday, April 21, 2022

राज्याचे कृषीमंत्री मा ना श्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत गोळेगांव कृषी महाविद्यालय इमारतीचे उद्घाटन

कृषी शिक्षणातील मुलींचे प्रमाण ५५ टक्केपर्यंत वाढले आहे, या महाविद्यालयामुळे ग्रामीण भागात कृषी शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, चांगले विद्यार्थी घडतील. यापुढील काळात महाविद्यालयात मुला-मुलींचे वस्तीगृह, कर्मचारी निवासाच्या सोयी, सुविधासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे प्रतिपादन कृषिमंत्री मा ना श्री दादाजी  भुसे यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत गोळेगाव (ता.औंढा नागनाथ) येथील कृषी महाविद्यालय इमारत उद्घाटन आणि महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन दिनांक २१ एप्रिल रोजी करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. महिलांच्या सन्मानासाठी सदरिल कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन महिला शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवणविद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आमदार डॉ. राहुल पाटीलकृषी सचिव श्री एकनाथ डवले,  शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. भगवान आसेवार, लातूर विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे (हिंगोली), उपविभागीय कृषी अधिकारी बळीराम कच्छवे (परभणी), माजी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, प्राचार्य डॉ.उदय खोडके, महिला शेतकरी लक्ष्मी भिसे, रेणुका जाधव, यशोदा सोळंके, विजय देशमुख, द्रोपदी काळे आदिची प्रमुख उपस्थिती होती.

कृषीमंत्री मा ना श्री दादाजी भुसे पुढे म्हणाले, माननीय मुख्‍यमंत्री यांच्‍या संकल्‍पनेतुन विकेल ते पिकेल अभियान राबविण्‍यात येत आहे. सन २०२२ हे वर्ष शेतकरी महिला सन्‍मान वर्ष म्‍हणुन साजरे करण्‍यात येत आहे. शेतकरी महिला सक्षमीकरणासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. शेतकऱ्यांचा शेतीमाल आणि महिला बचत गटाची उत्पादने विक्रीसाठी शासकीय जागा उपलब्ध करुन दिल्या जातील. पूर्वी कृषी विभागाच्या ३० टक्के योजना महिलांसाठी राखीव होत्या. येत्या काळात ५० टक्के योजना महिला शेतकऱ्यांसाठी राखीव राहणार आहेत. शेतीतील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढला पाहिजे, सात बारा उता-यावर महिलांचे नाव लागले पाहिजे, यासाठी शासन प्रयत्‍नशील आहे. वन्यप्राण्यांमुळे पीकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते. वन्य प्राण्यांचा त्रास असलेल्या भागात पीक संरक्षणासाठी मॉडेल तयार केले जाईल. कृषीपंपाना दिवसाच्या वेळी सलग आठ तास वीजपुरवठा करण्याचे निर्देश ऊर्जा विभागाला देण्यात आले आहेत. महिला बचत गटांना स्मार्ट योजनेअंतर्गंत जास्तीजास्त कर्जपुरवठा केला जाईल. या वर्षी हंगामात शेतकऱ्यांना बियाणे व खताचा तुटवडा होऊ दिला जाणार नाही, असेही ते म्‍हणाले.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, ग्रामीण भागात कृषि शिक्षणाची सुविधा पोचविण्‍यासाठी विद्यापीठ कटिबध्‍द आहे.

भाषणात आमदार मा डॉ राहुल पाटील यांनी कृषि विद्यापीठ संशोधनाच्‍या आधारे कृषि तंत्रज्ञान विकासाशिवाय शेती उत्‍पादनात वाढ होणे शक्‍य नसल्‍याचे म्‍हणाले तर शेतकरी महिला सक्षमीकरणासाठी शासन विविध उपक्रम राबवित असल्‍याचे कृषी सचिव श्री एकनाथ डवले यांनी सांगितले.   

कार्यक्रमात काळा पाणीतांडा येथील महिला शेतकरी अनिता पवार, वसमत येथील उद्योजिका वनिता दंडे यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. प्रास्‍ताविक डॉ भगवान आसेवार यांनी केले तर आभार प्रा पुंडलिक वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी महिला, विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, तसेच कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


Wednesday, April 20, 2022

वनामकृविचा २४ वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी

दीक्षांत समारंभात ४२३२ स्‍नातकांना विविध पदवीने अनुग्रहीत करण्‍यात येणार  ....... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांची पत्रकार परिषदेत माहिती


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा चोविसावा दीक्षांत समारंभ दिनांक २२ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यलयाच्‍या जवळील नुतन सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात आयोजित करण्‍यात आला असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महाराष्‍ट्र राज्‍याचे माननीय राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. भगत सिंह कोश्‍यारी हे दूरदृश्‍य प्रणालीव्‍दारे भुषविणार आहेत. महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. श्री. दादाजी भुसे हे प्रमुख अतिथी म्‍हणुन उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन उदयपुर राजस्‍थान येथील महाराणा प्रताप कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. नरेंद्र सिंह राठौर हे उपस्थित राहुन दीक्षांत भाषण करणार आहे, अशी माहिती कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी दिनांक २० एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, प्राचार्य डाॅ सय्यद ईस्माइल, जिल्‍हा माहिती अधिकारी श्री अरूण सुर्यवंशी, उपकुलसचिव डॉ गजानन भालेराव, विभाग प्रमुख डॉ डिगांबर पेरके, डॉ राजेश कदम, डॉ संजीव बंटेवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ स्‍थापनेचे हे सुवर्ण महोत्‍सवी वर्ष आहे, या दीक्षांत समारंभा प्रसंगी नवीन बांधकाम केलेले सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहाचे उदघाटन दुरदृश्‍य प्रणालीव्‍दारे माननीय राज्‍यपाल महोदयाच्‍या हस्‍ते होणार आहे. तसेच औंढे नागनाथ तालुक्‍यातील गोळेगांव येथील कृषि महाविद्यालयाच्‍या नवीन इमारत, बायोमिक्‍स निर्मिती केंद्राची नुतन इमारत तसेच सावित्रीबाई फुले मुलींच्‍या वसतीगृहाचे उदघाटन माननीय कृषिमंत्री श्री दादाजी भुसे यांच्‍या शुभ हस्‍ते होणार आहे. दीक्षांत समारंभास विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सन्‍माननीय सदस्‍य यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सदरिल दीक्षांत समारंभ कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे स्‍वागतपर भाषण करणार असुन दीक्षांत समारंभात २०२०-२१ वर्षातील विविध विद्याशाखेतील एकुण ४२३२ स्‍नातकांना विविध पदवीने अनुग्रहीत करण्‍यात येणार आहे. विविध विद्याशाखेतील ३८४२ स्‍नातकांना पदवी, ३५९ स्‍नातकांना पदव्‍युत्‍तर तर ४९ स्‍नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहीत करण्‍यात येणार आहे. समारंभात विविध अभ्‍यासक्रमातील विद्यापीठाने व दात्‍यांनी ठेवलेली सुवर्णपदके, रौप्‍यपदके व रोखपारितोषिके पात्र स्‍नातकांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रदान करून गौरविण्‍यात येणार आहे. दीक्षांत समारंभाचे विद्यापीठाच्‍या युटुब चॅनेल youtube.com/user/vnmkv यावर थेट प्रक्षेपण करण्‍यात येणार आहेपत्रकार परिषदेचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी केले. पत्रकार परिषदेस शहरातील प्रसारमाध्‍यमांचे प्रतिनिधी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, आज पर्यंत कृषि शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन हजारो पदवीधारक विद्यापीठाने निर्माण झाले आहेतहे उच्‍च शिक्षित कुशल मनुष्‍यबळ विविध क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. विद्यापीठाने विविध पिकांचे १४४ वाण निर्मिती केली असुन तुर, सोयाबीन, ज्‍वारी आदीं पिकांचे अनेक चांगले वाण शेतकरी बांधवात मोठया प्रमाणात प्रचलित झाले आहेतयावर्षी दहा हजार क्विंटल बीजोत्‍पादनाचे लक्ष साध्‍य करू. गेल्‍या तीन वर्षाच्‍या कार्यकाळात केवळ मुख्‍यालयी विद्यापीठ निर्मित दर्जेदार बियाणे विक्री न करता मराठवाडयातील प्रत्‍येक जिल्‍हयातील शेतकरी बांधवाना विकेंद्रीत विक्री व्‍यवस्‍था करून बियाणे उपलब्‍ध करण्‍यात आले. कोरोना विषाणु रोगाच्‍या परिस्थितीतही विद्यापीठाचे विस्‍तार कार्य कोठेही न थांबताऑनलाईन पध्‍दतीने चालुच होतेया काळात मोठया प्रमाणात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन मोहिम राबविण्‍यात आली. गेल्‍या तीन ते चार वर्षात स्‍वच्‍छ विद्यापीठ, सुंदर विद्यापीठ, सुरक्षित विद्यापीठ उपक्रम यशस्‍वीपणे राबविण्‍यात आला. आर्थिक अडचणीतही विद्यापीठ निर्मित निविष्‍ठामधुन प्राप्‍त महसुलातुन विद्यापीठाचे कार्य चालु आहे, असे माहिती त्‍यांनी दिली.

सदरिल दीक्षान्‍त समारंभात पुढील प्रमाणे विद्यार्थ्‍यांना विविध पदवीने अनुग्रहीत करण्‍यात येणार आहे

अक्र

अभ्‍यासक्रम

एकुण स्‍नातक

 

आचार्य पदवी

 

पी. एचडी. (कृषि)

४४

पी. एचडी. (अन्‍नतंत्रज्ञान)

०२

पी. एचडी. (कृषि अभियांत्रिकी)

०३

 

एकुण आचार्य पदवीचे स्‍नातक

४९

 

पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रम

 

एम. एस्सी. (कृषि)

२५२

एम. एस्‍सी (गृहविज्ञान)

१२

एम. एस्सी. (कृषि अभियांत्रिकी)

१६

एम. टेक. (अन्‍नतंत्रज्ञान)

१५

एम. एस्सी. (उद्यानविद्या)

४१

एम. बी.ए. (कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन)

२३

 

एकुण पदव्‍युत्‍तर स्नातक

३५९

 

पदवी अभ्‍यासक्रम

 

बी. एससी. (ऑनर्स) कृषि

२५८२

बी. एससी. (ऑनर्स) उद्यानविद्या

२१

बी. एससी. (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान

२२

बी. टेक. (कृषि अभियांत्रिकी)

२३३

बी. टेक. (अन्‍नतंत्रज्ञान)

५७७

बी. टेक. (कृषि जैवतंत्रज्ञान)

३२६

बी. एससी. (ऑनर्स) एबीएम

६३

 

एकुण पदवी स्‍नातक

३८२४

 

एकुण आचार्य, पदव्‍युत्‍तर पदवी आणि पदवीचे स्‍नातक

४२३२






Tuesday, April 19, 2022

मोसंबीवरील मर रोगाकरीता विद्यापीठ शास्त्रज्ञांनी सुचविल्या उपाययोजना

मौजे गोळेगाव येथे विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या निदान चमू भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या चमूने पूर्णा तालुक्यातील गोळेगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री दिलीपराव दुधाटे यांच्या मोसंबी बागेस भेट दिली. श्री दुधाटे यांच्या आठ एकर मोसंबी बागेतील एक एक मोसंबी चे झाड रोगग्रस्त होऊन हळूहळू मरत आहे, त्याकरिता त्यांनी विद्यापीठाशी संपर्क केला असता, विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे विस्तार कृषिविद्यावेत्ता डॉ.जी.डी.गडदे, पिक रोगशास्त्रज्ञ डॉ. व्ही.एम.घोळवे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. डी. डी. पटाईत, वरीष्ठ संशोधन सहाय्यक श्री एम.बी.मांडगे इत्यादी शास्त्रज्ञांच्या चमूने त्यांच्या शेतावर भेट देऊन मोसंबी बागेची पाहणी केली. मोसंबी बागेची पाहणी केली असता बागेस मोठ्या प्रमाणात डिंक्‍या, फायटोप्थेरा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्‍याचे आढळून आले. झाडाच्या खोडा मधून मोठ्या प्रमाणात डिंकाचा स्त्राव होऊन, प्रादुर्भावग्रस्त झाड कमकुवत होऊन हळूहळू वाळून मरत आहेत तसेच मोसंबी मध्ये लाल कोळी या किडीचा प्रादुर्भाव पानांवर मोठ्या प्रमाणात दिसून आला, त्यामुळे पानावर पांढरे चट्टे पडून झाडाच्या वाढीवर त्याचा परिणाम दिसून येतो आहे. त्याकरिता मर आणि कोळी कीडीकरीता वेळीच उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्‍याचे शास्‍त्रज्ञांनी सांगितले. मर रोगावरील उपायोजना करण्यासाठी प्रादुर्भाव होऊन मेलेली झाडे काढून नष्ट करावीत व त्यासोबत पाण्याचा योग्य पध्दतीने व योग्य प्रमाणात वापर करावा तसेच झाडाला वेळोवेळी बोर्डो पेस्ट लावाण्‍याचा सल्‍ला दिला. त्याचप्रमाणे खोडावरील स्त्रवणाऱ्या डिंक खरडून काढून त्या ठिकाणी पोटॅशियम परमॅग्नेट १० ग्रॅम  प्रति १ लिटर पाण्यात मिसळून ते द्रावण जखमेच्या ठिकाणी लावून धुवून घ्यावे व नंतर फोसेटील ८० टक्के किंवा मेटालेक्सिल ४ टक्के अधिक मॅन्कोझेब ६४ टक्के या बुरशीनाशकाची पेस्ट तयार करून  त्या ठिकाणी लावावी. लाल कोळी करिता पाण्यात मिसळणारे गंधक ३० ग्रॅम किंवा इथिऑन २० मिली किंवा प्रोपरगाइट १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आवश्यकता वाटल्यास १५ दिवसांच्या अंतराने २-३ फवारण्या कराव्यात. तसेच फायटोप्थेरा मर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फोसेटील ८० टक्के २.५ ग्रॅम किंवा मेटालेक्सिल ४ टक्के + मॅन्कोझेब ६४ टक्के २.५ ग्रॅम या बुरशीनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण झाड ओले होईपर्यंत फवारावे तसेच हे द्रावण झाडाच्या भोवती मुळांवर सुध्दा टाकावे. जैविक मध्ये विद्यापीठातील ट्रायकोडर्मा या बुरशीचा फवारणीद्वारे व आळवणीद्वारे वापर करावा. सर्व एकत्रित पद्धतीने उपाययोजना केल्यास या रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊन होणारे नुकसान टाळता येईल असे यावेळी शास्त्रज्ञाने सांगितले. यावेळी प्रगतशील शेतकरी श्री प्रताप काळे, कृषी सहाय्यक श्रीमती एस.ए.भालेराव आणि गावचे सरपंच श्री. सिताराम दुधाटे हे उपस्थित होते.

Monday, April 18, 2022

कृषि विकासात परभणी कृषि विद्यापीठाचे भरीव असे योगदान ....... माजी कुलगुरू डॉ योगेन्‍द्र नेरकर

वनामकृविचा माजी विद्यार्थ्‍यांचा कार्य गौरव सोहळा संपन्‍न 

परभणी कृषी विद्यापीठाने विविध पिकांचे विकसित केलेले वाण व कृषि तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन देशातील व राज्‍यातील शेतकरी विकासाकरिता भरीव असे योगदान दिले आहेविद्यापीठाचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले योगदान देत असुन भविष्‍यातही सर्वांनी एक‍त्र येऊन शेतकरी बांधवाच्‍या समृध्‍दी करिता कार्य करू याअसे प्रतिपादन महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ योगेन्‍द्र नेरकर यांनी केलेवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या सुवर्ण महोत्‍सवी वर्षाचे औचित्‍य साधुन दिनांक १८ एप्रिल रोजी आयोजित विद्यापीठाच्‍या माजी विद्यार्थ्‍यांचा कार्य गौरव सोहळाप्रसंगी ते बोलत होतेकार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख अतिथी म्‍हणुन महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ योगेन्‍द्र नेरकर हे उपस्थित होतेव्‍यासपीठावर महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ एम जी लांडेमाजी शिक्षण संचालक डॉ एम व्‍ही ढोबळेमाजी विभागीय पोलिस आयुक्‍त श्री एम जी सानपमाजी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ जी एस जाधवशिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखलेसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकरविस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकरकुलसचिव डॉ धिरजकुमार कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले कीसर्वांच्‍या सामुदायिक प्रयत्‍नातुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ उभे राहिले असुन कृषि शिक्षणसंशोधन व विस्‍तार शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन कृषि विकासात मोठे योगदान दिले आहेविद्यापीठाच्‍या विविध वाणाच्‍या बियाणांची शेतकरी बांधवामध्‍ये मोठी मागणी असतेमुलभुत व पैदासकार बियाणे निर्मितीवर विद्यापीठाने भर दिला असुन बीजोत्‍पादनाचे विशिष्‍ट प्रारूप तयार केले आहेयामुळे समाधानकारक बीजोत्‍पादन होईलडिजिटल शेती करिता लागणारे तंत्रज्ञान व मनुष्‍यबळ निर्मितीवर विद्यापीठाने नाहेप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन पुढाकार घेतला आहेशेती व शेतकरी बांधवापुढे अनेक आव्‍हाने आहेतसर्वांनी मिळुन या आव्‍हानावर मात करून पुढची वाटचाल करावयाची आहेआर्थिक अडचणीतही विद्यापीठ निर्मित निविष्‍ठामधुन प्राप्‍त महसुलातुन विद्यापीठाचे कार्य चालु आहे.

डॉ एम जी लांडे म्‍हणाले की, मराठवाडयातील प्रत्‍येक खेडयात एक तरी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहेत्‍यांच्‍या रूपात प्रत्‍येक खेडयात कृषि विद्यापीठ पोहचले आहे. यावेळी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉ जी एस जाधवश्री एस एस राऊतडॉ एम व्‍ही ढोबळेश्री एम जी सानपश्री दत्‍ता शिंदेडॉ बापु आडकिणेडॉ भगवानराव कापसेडॉ सी व्‍ही मायीडॉ एम जी उमाटेश्री भागनागरेडॉ व्‍ही डी साळुंकेडॉ अशोक सेलगांवकर आदींनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले

कार्यक्रमात मराठवाडयातील आठही जिल्‍हयातील विद्यापीठाचे माजी विद्यार्थ्‍यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते शाल व मान्‍यचिन्‍ह देऊन गौरविण्‍यात आलेकार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रसिध्‍द कवि श्री इंद्रजित भालेराव लिखित विद्यापीठ गीताचे विमोचन करण्‍यात आलेगीतास प्रा अशोक जोंधळे यांनी संगीत दिले असुन सौ आशाताई जोंधळे यांनी स्‍वरबध्‍द केले आहे.  सदरिल गीत रचना आणि स्‍वरबध्‍द करण्‍यासाठी विद्यापीठस्‍तरावर माजी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती गठित करण्‍यात आली होती. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी विद्यापीठाच्‍या वाटचालीवर प्रकाश टाकलासुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे यांनी मानलेकार्यक्रमात मराठवाडयातील आठही जिल्‍हयातील माजी विद्यार्थी सहभागी झाले होतेकार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापकअधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


विद्यापीठ गीताचे विमोचन 



माजी कुलगुरू मा डॉ योगेन्‍द्र नेरकर

Friday, April 15, 2022

वनामकृविच्‍या माजी विद्यार्थ्‍यांचा कार्य गौरव सोहळयाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या सुवर्ण महोत्‍सवी वर्षाचे औचित्‍य साधुन विद्यापीठाच्‍या माजी विद्यार्थ्‍यांचा कार्य गौरव सोहळाचे आयोजन दिनांक १८ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृह करण्‍यात आले आहे. सोहळाचे स्‍वागताध्‍यक्ष विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा माननीय आमदार मा श्री. सुरेशराव वरपुडकर हे असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्‍हणुन अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ विलास भाले हे उपस्थित राहणार आहे. महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ योगेन्‍द्र नेरकर, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ वेदप्रकाश पाटील, माजी कुलगुरू डॉ किशनराव गोरे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.