Tuesday, January 28, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील उती संवर्धन प्रकल्पास माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांची भेट


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील उती संवर्धन प्रकल्प येथे निर्माण करण्यात येणाऱ्या उती संवर्धित केळी रोपांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी प्रयोगशाळेला भेट दिली. या प्रसंगी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, प्रभारी अधिकारी डॉ. आनंद दौंडे, वरिष्ठ संशोधन अधिकारी श्री. आर. एन. वाडीकर आणि श्री. . के. सुतार हे उपस्थित होते.

भेटीदरम्यान माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी उती संवर्धित केळी रोपांच्या विविध अवस्थांची सखोल पाहणी केली. त्यांनी प्रयोगशाळेत चालणाऱ्या संशोधन प्रक्रियांची बारकाईने माहिती घेतली आणि रोपांच्या उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी काही आवश्यक सुधारणा सुचविल्या.

माननीय कुलगुरूंच्या मार्गदर्शनामुळे प्रकल्पाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास प्रभारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

 






महिला सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरु! – कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृवि उमेद-महिला बचत गट उत्पादन जिल्हास्तरीय मिनी सरस विक्री प्रदर्शन खाद्य महोत्सवाचे उद्घाटन



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, जिल्हा परिषद, ग्रामविकास विभाग पंचायत राज विभाग उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या शेतकरी भवन परिसरात महिला स्वयं सहायता समूह उत्पादित उत्पादनांचे जिल्हास्तरीय मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे खाद्य महोत्सवाचे” उद्घाटन कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते २८ जानेवारी रोजी करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतिशा माथूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक श्री सम्राट उपस्थित होते. हा महोत्सव फेब्रुवारीपर्यंत नागरिकांसाठी सकाळी १० ते रात्री १० दरम्यान खुला राहणार आहे.

उद्घाटन समारंभात कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महिलांच्या आर्थिक नियोजन कौशल्याचे कौतुक करताना सांगितले की, महिलाच सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरु आहेत. कुटुंबातील आर्थिक व्यवहार महिलांच्या खंबीर नियोजनामुळे सहजतेने सांभाळले जातात. दोन वर्षांपूर्वी परभणी जिल्ह्यातील शासकीय नेतृत्व महिलांच्या हाती होते, ज्यामध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आयुक्त विद्यापीठाच्या नियंत्रक यांचा समावेश होता. विद्यापीठाने महिलादिनी त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. आजच्या या प्रदर्शनातून महिला भविष्यात मोठ्या उद्योजक म्हणून पुढे येतील याची खात्री आहे. महिला बचत गटांनी सादर केलेल्या उत्पादनांचे निरीक्षण करताना माननीय कुलगुरूंनी त्यांना उद्योजक घडविण्यासाठी विद्यापीठाच्या सहकार्याची ग्वाही दिलीयावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री दिपक दहे, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ गजानन गडदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महिला बचत गट आणि छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देणारा हा महोत्सव ग्रामीण भागातील महिलांसाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरणार आहे.