Thursday, June 19, 2014

वनामकृविच्या २७ शिफारशींना संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीच्या बैठकीत मान्यता

महाराष्‍ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यापर्यंत पोहोचविण्‍यासाठी महत्‍वाचा टप्‍पा  मानल्‍या जाणा-या संयुक्‍त कृषि संशोधन व विकास समितीची ४२ वी बैठक दापोली (जि. रत्‍ना‍गिरी) येथील  डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे १२ ते १४ मे या कालावधीत संपन्‍न झाली. तीन दिवस झालेल्‍या शास्‍त्रज्ञांच्‍या या संशोधन समिती बैठकीत राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठांच्‍या विविध शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली. वसंतराव नाईक  मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या एकुण २७ शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली असुन यात २ वाण, ३ शेती यंत्रे व औजारे व २२ इतर तंत्रज्ञान शिफारशींचा समावेश आहे.
करडईचा पीबीएनएस-८६ (पुर्णा) वाणास मान्‍यता
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केल्‍या करडईचा पीबीएनएस-८६ (पुर्णा) वाणाची बागायती व कोरडवाहू लागवडीसाठी मराठवाडा विभागासाठी प्रसारित करण्‍याची शिफारस करण्‍यात आली. हा वाण पीबीएनएस-१२ व शारदा या तुल्‍यबळ वाणांपेक्षा बागायतीसाठी व कोरडवाहू लागवडीसाठी दाण्‍यांच्‍या उत्‍पादनात अधिक सरस आढळून आला असुन या वाणामध्‍ये ३०.१३ टक्‍के तेलाचे प्रमाण असून हा वाण मररोग व पानावरील ठिपके (अल्‍टरनेरिया) रोगास तसेच मावा किडीस सहनशील आहे.
सिताफळाचा धारूर-6 वाणास मान्‍यता
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केल्‍याला सिताफळाचा धारुर-6 वाणाची महाराष्‍ट्रात लागवडीसाठी प्रसारित करण्‍याची शिफारस करण्‍यात आली. या वाणाची फळे आकारांनी मोठी असून गराचे प्रमाण चांगले (गराचे वजन १८०.३४ ग्रॅम) आहे. हा वाण फळाचे अधिक उत्‍पादन देणारे असुन एकूण विद्राव्‍य घटकांचे प्रमाण चांगले  (२४.४९ डिग्री ब्रिक्‍स) असुन एकुण साखरेचे प्रमाण २०.१२ टक्‍के असल्‍याचे आढळून आले आहे.

तसेच विद्यापीठाने विकसित केलेले तीन कृषि यंत्रे व औजारांमध्‍ये बैलचलित धसकटे गोळा करण्‍याचे अवजार, बैलगाडी व वखर जु, सौरचलित फवारणी यंत्राच्‍या शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली. याव्‍यतिरिक्‍त कृषि अभियांत्रिकीच्‍या सात शिफारशी, कृषिविद्याच्‍या चार, पीक संरक्षणाची एक, अन्‍न तंत्रज्ञानाच्‍या तीन, मृद विज्ञानाच्‍या दोन, गृहविज्ञानच्‍या तीन तर कृषि अर्थशास्‍त्राच्‍या दोन अशा एकुण २२ तंत्रज्ञान शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली.

सौजन्‍य - संशोधन संचालनालय, वनामकृवि, परभणी

मान्‍य झालेल्‍या इतर शिफारशी पाहाण्‍याकरिता Read More वर क्लिक करा


मान्‍य झालेल्‍या इतर शिफारशी पुढील प्रमाणे

कृषि यंत्रे व अवजारे
1. बैलचलित धसकडे गोळा करण्‍याचे अवजार - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित बैलचलित धसकटे गोळा करणा-या अवजाराची मशागतीनंतर पिकांची धसकटे गोळा करण्‍यासाठी शिफारस मान्‍य करण्‍यात आली. या बैलचलित धसकटे गोळा करणा-या अवजाराची रुंदी १६५ से. मी. असुन एका दिवसात ८ तासात २ ते २.५० हेक्‍टर इतकी कार्यक्षमता आहे. यामुळे मजूर कमी लागुन वेळेची व पैशाची बचत होते.
2. बैलगाडी व वखर जू - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित बैलगाडी व वखर जू यांची शिफारस बैलगाडी व वखर यांच्‍या कामासाठी मान्‍य करण्‍यात आली. यामुळे बैलाच्‍या मानेवर होणारा त्रास कमी होऊन बैलाची कार्यक्षमता वाढून ओढशक्‍ती कमी लागते व कामाचा वेग वाढतो. वखर जू लांबी १५८ से. मी. व बैलगाडी जू लांबी १७८ से. मी. इतकी आहे. जू बैलाच्‍या मानेवर घट्ट बसून ओढण्‍यास कष्‍ट कमी लागतात.

3. सौरचलित फवारणी यंत्र - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसीत सौरउर्जा चलित फवारणी यंत्राची पिकावर फवारणी करण्‍यासाठी शिफारस मान्‍य करण्‍यात आली. हे यंत्र ध्‍वनिविरहित, कंपनविरहीत व प्रदुषणविरहित चालणारे फवारणी सयंत्र असुन सौर पॅनेल व बॅटरीद्वारेसुध्‍दा चालविता येते. बॅटरीची वापर हा ढगाळ वातावरण असताना सयंत्र चालविण्‍यासाठी करता येतो. या यंत्राद्वारे फवारणी केल्‍यास फवारणी करावयासाठी येणारा खर्च कमी होतो. तसेच दुरुस्‍ती खर्चसुध्‍दा कमी होतो. या यंत्रामध्‍ये २४ व्‍होल्‍ट १८० वॅट क्षमतेचे दोन सौर पॅनेल ६ अॅम्‍पीअर विद्युत निर्माण करुन त्‍याद्वारे डीसी पंप (२४ व्‍होल्‍ट २.१ अॅम्‍पीअर) चा चालविला जातो. डीसी पंप साठवण टाकीतून फवारणी द्रावण घेवून अधिक दाबाद्वारे नोझलमधून पिकावर फवारणी करण्‍यात येते.

तंत्रज्ञान शिफारसी:

कृषि अभियांत्रिकी

4. मशागतीचा खर्च कमी करणे, वखरण्‍याची कार्यक्षमता वाढविणे, तसेच बैलांचा थकवा कमी करण्‍यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने प्रमाणबध्‍द केलेल्‍या ०.७५ सेंमी रुंद पासेची बैलचलित लाकडी व लोखंडी वखरासाठी शिफारस करण्‍यात आली.

5. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसीत चक्राकार पध्‍दतीच्‍या परीवलन यंत्रणेची एक अश्‍वशक्‍तीची कडबाकुट्टी, पीठ गिरणी व मळणी यंत्र चालविण्‍यासाठी शिफारस करण्‍यात आली.

6.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित बैलचलित तीन फासाच्‍या ६ फणी कोळप्‍याची शेती पिकांमध्‍ये पेरणीनंतर ३० ते ४५ दिवसांपर्यंत आंतरमशागतीसाठी शिफारस करण्‍यात आली.

7. ट्रॅक्‍टरने पेरणी केलेल्‍या पिकांच्‍या आंतरमशागतीसाठी ट्रॅक्‍टरचलित कोळपे वापरण्‍याची शिफारस करण्‍यात आली.

8.परभणी व औरंगाबाद भागातील भूपृष्‍ठीय निचरा प्रणालीचे आरेखन करण्‍यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्‍या निचरा गुणांकाचा वापर करण्‍याची शिफारस करण्‍यात आली.

9. खरीप हंगामातील सोयाबीन किंवा रब्‍बी हंगामातील करडई पिकाच्‍या अधिक उत्‍पादन व आर्थिक फायद्यासाठी शेततळ्यातील पाणी डिझेल पंपाद्वारे तुषार सिंचन पध्‍दतीने संरक्षित देण्‍यासाठी वापर करण्‍याची शिफारस करण्‍यात आली. 

10. ठिबक सिंचन संचाच्‍या आम्‍ल प्रक्रियेतील आम्‍ल सोडण्‍याचा दर काढण्‍याच्‍या सुत्रातील गुणांकासाठी वनामकृवि विकसित समीकरणे व आलेखाकृत सारणीची शिफारस करण्‍यात आली. ते पुढील प्रमाणे 
           (. x प्र
येथे   = आम्‍ल सोडण्‍याचा दर (लि/तास), 
            = आम्‍ल सोडण्‍याचा गुणक, 
     प्र = संचाचा प्रवाह (लि/से
 य.(हायड्रोक्‍लीक आम्‍ल ६० टक्‍के) = ०.०४८  (०.०४५५5 सामु+०.०००४७ एकूण विरघळलेले क्षार - ०.२३४
 य.(सल्‍फ्युरीक आम्‍ल ९८ टक्‍के)=०.०१६८ (०.०२९२ सामु + ०.०००४५ एकूण विरघळलेले क्षार ०.१४५५)
  य. (नायट्रीक आम्‍ल ६० टक्‍के) = ०.०३७२ x (०.०६३०९ सामु + ०.०००१८ एकूण विरघळलेले क्षार + ०.५१०)

कृषि विद्या 
11. बीटी कपाशीमध्‍ये तणांचा प्रादुर्भाव कमी करुन फायदेशीर उत्‍पन्‍न मिळण्‍यासाठी पायरीथायोबॅक सोडियम या उगवणीपश्‍चात निवडक तणनाशकाची ६२.५ ग्रॅम क्रियाशील घटक प्रती हेक्‍टर या प्रमाणात २०-३० दिवसांनी फवारणी आणि पेरणीनंतर ४५ दिवसांनी एक कोळपणी करण्‍याची शिफारस करण्‍यात मान्‍य करण्‍यात आली.

12. मराठवाडा विभागात काळ्या मगदुराच्‍या जमिनीवर घेण्‍यात येणा-या कोरडवाहू ओलीताखालील पेरसाळीच्‍या अधिक उत्‍पादनासाठी ४० किलो ग्रॅम नत्र, ५० किलो ग्रॅम स्‍फुरद, ५० किलो ग्रॅम पालाश, १० किलो ग्रॅम झिंक सल्‍फेट व १० किलो ग्रॅम फेरस सल्‍फेट प्रती हेक्‍टरी जमिनीतून पेरतेवेळी व उर्वरीत ४० किलो ग्रॅम नत्र प्रती हेक्‍टरी पेरणीनंतर ३० दिवसांनी देण्‍याची शिफारस  करण्‍यात आली. किंवा पेरणीनंतर शिफारसीत खत मात्रे बरोबर (प्रती हेक्‍टरी ८०:४०:४० किग्रॅ नत्र, स्‍फुरद व पालाश) झिंक सल्‍फेट व फेरस सल्‍फेट प्रत्‍येकी ०.५ टक्‍के द्रावण २० आणि ४५ दिवसानंतर फवारणीद्वारे शिफारस करण्‍यात आली. ३० से.मी. अंतरावरील साळ आणि सोयाबीन (:) आंतरपिक पध्‍दतीबरोबर पेंडामिथॅ‍लीन ०.७५ किग्रॅ क्रियाशील घटक प्रती हेक्टरी (पेरणीनंतर परंतु पीक उगवण्‍यापूर्वी) व पेरणीनंतर २५ दिवसांनी एक खुरपणीची शिफारस करण्‍यात आली.

13. मराठवाडा विभागातील बागायती क्षेत्रासाठी १ हेक्‍टर प्रारुपामधुन शाश्‍वत उत्‍पन्‍न, वर्षभर सातत्‍याने रोजगार निर्मितीसाठी एकात्मिक शेती पध्‍दतीमध्‍ये खालील घटकांचा समावेश करण्‍याची शिफारस करण्‍यात आली.
अ क्र
पीक पध्‍दती
क्षेत्र हे
1
सोयाबीन रबी ज्‍वारी  
०.१
2
सोयाबीन कांदा 
०.१
3
सोयाबीन गहू   
०.१
4
मुग वांगी
०.१६
5
चारा पिके


) लसुण घास   
०.०७५

) हायब्रिड नेपिअर
०.०७५
6
फळबाग   


कागदी लिंबू यात आंतरपिक 
खरीपसोयाबीन, रबीपत्‍तागोबी
०.२०
7
मसाला पिके


अद्रक
०.१
8
बांधावरील झाडे अंजन, शेवगा, करवंद 
०.०४
9
पशुसंवर्धन
०.०५

एक गाय (होलदेव) व एक म्‍हैस (मु-हा)


कुक्‍कुटपालन (100 300 पक्षी)

10
गांडुळ खत निर्मिती


14. भुईमुगावरील टिक्‍का व तांबेरा रोगाच्‍या किफायतशीर व्‍यवस्‍थापनासाठी टयुबॅकोनॅझोल २५ ई.सी. या बुरशीनाशक १.५ मिली १० मिली पाण्‍यात मिसळून ते द्रावन प्रती किलो बियाण्‍यावर शिंपडून बीजप्रक्रिया करावी आणि याच बुरशीनाशकाच्‍या दोन फवारण्‍या १० मिली/१० लि. पाणी कराव्‍यात. पहिली फवारणी रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्‍यास घ्‍यावी व दुसरी फवारणी १५ दिवसाच्‍या अंतराने करावी.

पीक संरक्षण

15. करडई पीकाच्‍या बियाण्‍यातून व जमिनीतून उद्भभवणा-या रोगांच्‍या किफायतशीर आणि परिणामकारक व्‍यवस्‍थापनासाठी पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्‍यास १० मिली या प्रमाणात ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.

अन्‍न तंत्रज्ञान

16. अंजीर टॉफी तयार करण्‍यासाठी २२.५ टक्‍के अंजीर भूकटी व नोनी टॉफी तयार करण्‍यासाठी १५ टक्‍के नोनी रसाचा वापर करण्‍याची शिफारस करण्‍यात आली.

17.   परभणी मोती या ज्‍वारी वाणांचा लाह्या बनविण्‍यासाठी शिफारस मान्‍य करण्‍यात आली.

18. प्रक्रिया तंत्रज्ञान निकषानुरुप (गहु अंकुरणे१२ तास, गहु तृण वाढ७ दिवस, उंची १८.२० सेंमी., तापमान २८. + २ सेल्‍सीअस) उत्‍पादित ताजा गहू तृण रस हा चिकित्‍सा आरोग्‍यवर्धक पेय म्‍हणुन शिफारस करण्‍यात आला. 

मृद विज्ञान

19. खोल काळया जमिनीमध्‍ये बीटी कपाशीच्‍या अधिक उत्‍पादनाकरीता व आर्थिक फायद्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे शिफारसीत खत मात्रेच्‍या ८० टक्‍के (८०:४०:४० किलो नत्र, स्‍फुरद पालाश/हे) खतमात्रा खालील दर्शविलेल्‍या तक्‍त्‍याप्रमाणे विभागून देण्‍याची शिफारस करण्‍यात आली. 
 हप्‍ता
दिवस किंवा कालावधी
       नत्र किलो प्रति हे.
स्‍फुरद किलो
प्रति हेक्‍टर
पालाश
किलो प्रति हे.
नत्र विद्राव्‍य
खताद्वारे
नत्र युरीया
खताद्वारे
एकूण
 पहिला
 पेरणी  
८.०
४.०
१२.०
८.०
८.०
 दुसरा
पेरणीनंतर२० दिवसांनी
८.०
८.०
१६.०
८.०
८.०
 तिसरा
पेरणीनंतर४० दिवसांनी
८.०
८.०
१६.०
८.०
८.०
 चौथा
पेरणीनंतर ६० दिवसांन
८.०
४.०
१२.०
८.०
८.०
 पाचवा
पेरणीनंतर८० दिवसांनी
८.०
४.०
१२.०
८.०
८.०
 सहावा
पेरणीनंतर१०० दिवसांनी
८.०
४.०
१२.०
००
००

 एकुण  
४८
३२
८०
४०
४०

20. मराठवाडा विभागात डाळिंबाच्‍या अधिकतम उत्‍पादनासाठी २५ ते ३० से.मी. खोल चिकण ते चिकण पोयटा युक्‍त पोताची माती व त्‍या खाली ठिसूळ मुरमाचा थर असलेल्‍या जमिनीची निवड करण्‍याची शिफारस करण्‍यात आली.

गृह विज्ञान

21. सोयाबीन काढते वेळी कमी श्रमात हातांना होणा-या जखमांपासून संरक्षण मिळण्‍यासाठी व कार्यक्षमता वाढविण्‍यासाठी कमी खर्चाच्‍या व टिकाऊ हातमोज्‍यांचा वापर करावा अशी शिफारस करण्‍यात आली.

22. सुती कापडावर बाटीक छपाईमध्‍ये सरळ रंगाचे द्रावण तयार करण्‍यासाठी सुर्यचुलीचा वापर तसेच छपाईसाठी ऊसाच्‍या मेणाचा उपयोग करण्‍याचे कमी किंमतीचे (किफायती) तंत्रज्ञान बाटीक हस्‍तकलेसाठी वापरण्‍याची शिफारस करण्‍यात आली.

23. सोयीस्‍कर, आरामदायी व वापरण्‍यास सोपा पंजाबी ड्रेस (सलवार कमीज) शारीरीक विकलांग महिलांसाठी वापरात आणावे अशी शिफारस करण्‍यात आली.

कृषि अर्थशास्‍त्र 

24. हरभरा पीक उत्‍पादनामध्‍ये शिफारस केलेल्‍या तंत्रज्ञानाचे अवलंबन ५७.७९ टक्‍के आढळले. विस्‍तार यंत्रणानी शेतक-यांसाठी विद्यापीठाच्‍या हरभरा पिकाच्‍या सुधारीत तंत्रज्ञानाचा प्रसार करण्‍याची शिफारस करण्‍यात आली.
25. सोयाबीन उत्‍पादन प्रक्रियेत, पिकाचे क्षेत्र, शेणखत, स्‍फुरद व तणनाशके या नि‍वष्‍ठांची उत्‍पादन लवचिकता आणि सिमांत उत्‍पादकता धन आहे. म्‍हणून या घटकांचा वापर वाढविण्‍याची शिफारस करण्‍यात आली.