Sunday, June 8, 2014

अफगाणी विद्यार्थ्‍यांना पदवी प्रदान


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत कृषि महाविद्यालयातुन पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रम पुर्ण केलेल्‍या तीन अफगाणी विद्यार्थ्‍यांना दि. ८ जुन रोजी विद्यापीठाचे कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते तात्‍पुरते पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्‍यात आले. यावेळी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले, विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, आंतरराष्‍ट्रीय वसतीगृह अधिक्षक प्रा. रणजीत चव्‍हाण व जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रविण कापसे उपस्थित होते. रफीउल्‍हा फजल हक, हक्‍कीम मुल्‍ला अजिजी व अब्‍दुल्‍ला अजिज हकीमीय हे तीन अ‍फगाणी विद्यार्थ्‍यी असुन रफीउल्‍हा फजल हक यांनी डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन व दुग्‍धव्‍यवसाय विभागातुन तर हक्‍कीम मुल्‍ला अजिजी व अब्‍दुल्‍ला अजिज हकीमीय यांनी अनुक्रमे डॉ. बी. व्‍ही. आसेवार व डॉ. डी. एन. गोखले यांच्‍या मार्गदर्शनाखाली कृषिविद्या विभागातुन संशोधन करून पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रम पुर्ण केला. कृषि विद्यापीठातुन प्राप्‍त केलेल्‍या ज्ञानाचा शिक्षणाच्‍या व संशोधनाच्‍या माध्‍यमातुन अफगाणीस्‍थानातील कृषि विकासात योगदान देण्‍याचा सल्‍ला कुलगूरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांनी याप्रसंगी विद्यार्थ्‍यांना दिला. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शैक्षणीक कालावधीत उच्‍च दर्जोचे शैक्षणिक व संशोधनाची संधी प्राप्‍त झाल्‍याची भावना अफगाणी विद्यार्थ्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.