औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत
असलेल्या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रामार्फत औरंगाबाद जिल्हयातील देवगाव
ता. पैठण येथील शेतक-यांच्या शेतावर घेण्यात आलेल्या विद्यापीठाच्या देशी
कपाशीच्या वाणाच्या पिक प्रात्याक्षिकास विद्यापीठाचे कुलगुरू मा. बी. व्यंकटेश्वरलु
यांनी दि २६ सप्टेबर रोजी भेट दिली, यावेळी संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर,
विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, औरंगाबाद येथील विभागीय कृषि सहसंचालक डॉ
सुर्यकांत पवार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री पी डी लोणारे, कापुस विशेषज्ञ
डॉ के एस बेग, डॉ एस बी पवार विद्यापीठातील शास्त्रज्ञ, अधिकारी व शेतकरी मोठया संख्येने
उपस्थित होते.
देवगांव येथील दिपक जोशी यांच्या शेतावरील कृषि
विद्यापीठ विकसित पी ए २५५ (परभणी
तुराब) व पी ए ५२८ या वाणांची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी
कुलगुरू मा. बी व्यंकटेश्वरलु यांनी देशी वाण प्रात्यक्षिकाबाबत समाधान व्यक्त
केले व मार्गदरर्शन करतांना म्हणाले की, देशी कपाशीचे सरळ वाण रसशोषण करणा-या
किडींना सहनशिल असल्याने त्यावर होणारा पिक संरक्षण खर्च कमी होतो तसेच मध्यम-हलक्या
जमिनीत कोरडवाहु लागवडीत कपाशीच्या देशी वाणांचे उत्पादन बी टी कपाशीपेक्षा कमी
उत्पादन खर्चात समतुल्य येत असल्यामुळे या बियाणाची उपलब्धता वाढविणे आवश्यक आहे.
प्रात्याक्षिकातील उत्पन्न खर्चाची नोंद ठेऊन त्यांची बी टी कपाशी तुलना
करण्यात यावी, अशी सुचना त्यांनी केली. सदरील प्रात्याक्षिकाचे नियोजन कृषि
विज्ञान केंद्र औरंगाबाद येथील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. देवगांव
शिवारातील प्रात्यक्षिक भेटीचा कार्यक्रम श्री दिपक जोशी व त्यांच्या जयजवान
जयकिसान गटाच्या शेतक-यांनी व औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्राच्या सहकार्य आयोजित
करण्यात आला होता.