हॉर्टसॅप प्रकल्पाच्या दोन दिवसीय प्रशिक्षणाचे उदघाटन
 |
हॉर्टसॅप प्रकल्पाच्या दाेन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु, व्यासपीठावर डॉ बी बी भोसले, डॉ अशोक ढवण, डॉ दत्तप्रसाद वासकर, श्री विजयकुमार राऊत, डॉ डी एल जाधव आदी |
 |
हॉर्टसॅप प्रकल्पाच्या दाेन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी घडीपत्रीकेचे विमोचन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु, डॉ बी बी भोसले, डॉ अशोक ढवण, डॉ दत्तप्रसाद वासकर, श्री विजयकुमार राऊत, डॉ डी एल जाधव आदी |
फळपीकांतील
कीड व रोगामुळे होणारे शेतक-यांचे नुकसान भरून न येणारे असते, त्यामुळे
फळपीकासाठी हॉर्टसॅप प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. या प्रकल्पांर्गत संकलीत
करण्यात येणा-या आकडेवारीचा उपयोग करून कृषि हवामान अंदाजाप्रमाणे दिर्घकालीन फळपीकांतील
कीड व रोगांच्या प्रादुर्भावाचा पुर्वानुमान बांधता आला पाहिजे, असे मत कुलगुरू
मा. डॉ बी व्यंकटेश्वरलु यांनी व्यक्त केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभाग व महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने फलोत्पादन पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) प्रकल्पांतर्गत दि २२ व २३ सप्टेबर रोजी कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी व कीड सर्वेक्षक, कीड नियंत्रक, संगणक प्रचालक यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डी एल जाधव व उपसंचालक (फलोत्पादन) श्री विजयकुमार राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ बी व्यंकटेश्वरलु पुढे म्हणाले की, या प्रकल्पात कृषि हवामानशास्त्राची भुमिका महत्वाची असुन कोणत्या हवामान परिस्थिती, कोणत्या कीड-रोगांचा प्रार्दभाव होण्याची शक्यता आहे याचा अंदाज बांधता आल्यास फलोत्पादक शेतक-यांना याचा मोठा फायदा होईल. कृषि विभागाच्या सहकार्याने क्रॉपसॅप प्रकल्पाप्रमाणेच फलोत्पादक शेतक-यांपर्यंत कृषि सल्ला त्वरीत पोहोचविण्यात यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले आपल्या भाषणात म्हणाले की, आंबा, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी व चिकु या सहा फळपीकांचा प्रकल्पात समावेश असुन मराठवाडयाकरिता मोंसबी हे महत्वाचे फळपीक आहे. याप्रकल्पांतर्गत फळपीकावरील कीड-रोगाबाबतचे निरीक्षण योग्यरित्या झाल्यास योग्य व अचुक सल्ला शेतक-यांना देणे शक्य होईल. यामुळे शेतक-यांना प्रतिबंधात्मक उपाय करता येऊन फळपीकांचे मोठे नुकसान टाळता येईल.
संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर आपल्या भाषणात म्हणाले की, हॉर्टसॅप प्रकल्पात फळपीकांच्या लागवडीपासुन रोग-कीडींच्या बदोबस्ताबाबत मार्गदर्शन व्हावे तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्हणाले की, राज्यातील क्रॉपसॅप प्रकल्प जगाला प्रेरणा देणारा ठरला असुन त्याच धर्तीवर हा हॉर्टसॅप प्रकल्पामुळे फलोत्पादक शेतक-यांचा कीड-रोग व्यवस्थापनावरील होणारा मोठा खर्च आटोक्या आणण्यासाठी उपयोग होईल. लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार शासनाने हॉर्टसॅप प्रकल्पास सुरूवात केल्याची माहिती कुलसचिव डॉ डी एल जाधव यांनी दिली. यावेळी श्री विजयकुमार राऊत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर यांनी हॉर्टसॅप प्रकल्पाची माहिती दिली. याप्रसंगी मोसंबीवरील किंडीची ओळख व व्यवस्थापन याविषयावरील घडीपत्रीकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ डी जी मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा बी व्ही भेदे यांनी केले. याप्रसंगी विद्यापीठातील व कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ बी बी भोसले, डॉ एम बी पाटील, डॉ एच के कौसडीकर, डॉ ए जी सुर्यवंशी, डॉ जी पी जगताप, डॉ उदय खोडके, डॉ ए जी बडगुजर, प्रा एस टी शिंदे व निलेश पटेल आदी शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
 |
मार्गदर्शन करतांना विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले |
 |
मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ अशाेक ढवण |
 |
मार्गदर्शन करतांना संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर |
 |
मार्गदर्शन करतांना कुलसचिव डॉ डी एल जाधव |