Tuesday, November 11, 2014

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कला क्षेत्रात मानाचा तुरा

इंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सवात लोकनृत्‍य व कोलाजमध्‍ये सुवर्णपदक
नृत्‍य सादर करतांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा संघ 
पुरस्‍कार स्‍वीकारतांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा संघ 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे दिनांक ५ ते ९ नोव्‍हेंबर दरम्‍यान बाराव्‍या इंद्रधनुष्‍य युवक महोत्‍सव संपन्‍न झाला. या युवक महोत्‍सवात राज्‍यातील २० विद्यापीठाच्‍या संघासह वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या चमुने सहभाग घेतला होता. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या संघाने लोकनृत्‍या या कला प्रकारात सुवर्ण पदक व फिरता चषक पटकाविला तर कोलाज या कला प्रकारात सुवर्णपदक प्राप्‍त करून विद्यापीठाच्‍या कला क्षेत्रात मानाचा तुरा रोवला. विद्यापीठ स्‍थापन झाल्‍यापासुन लोकनृत्‍य कला प्रकाराचा फिरता चषक सर्वप्रथमच विद्यापीठास प्राप्‍त झाला आहे. विद्यापीठच्‍या संघाने कर्नाटकी लोकनृत्‍य पुजा कुनिया हे सादर केले. या नृत्‍याने सर्व प्रेक्षकांचे मन भारावुन गेले.
    लोकनृत्‍य संघात प्रविण मांजरे, शुभम सुर्यवंशी, प्रविण जाधव, संकेत शिंदे, मुदीराज, ढालकरी ऐश्‍वर्या, क्षिरसागर, बिंड, अधिरा रवींद्रन, मयूर देशमुख, रेणुका पवार यांच्‍या समावेश होता तर कोलाजमध्‍ये सुवर्ण पदक विजेती शिवशक्‍ती गोडसेलवार हीचा समावेश होता. संघ व्‍यवस्‍थापक म्‍हणुन सांस्‍कृतीक प्रभारी अधिकारी डॉ आशा देशमुख व किशन सुर्यवंशी यांनी काम पाहीले तर संघाला मधुकुमार व खद्राराज यांनी मार्गदर्शन केले. संघाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ एम के खेडकर यांच्‍या हस्‍ते पुरस्‍कार देण्‍यात आले.
    या यशाबाबत विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी विद्यार्थ्‍यांचे अभिनंदन केले तसेच शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ डि एल जाधव, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, सहयोगी अधिष्‍ठाता प्रा विशाला पट्टणम, प्रा गुळभिले, प्रा राठोड, प्रा चव्‍हाण, डॉ व्‍ही डी पायाळ यांनीही अभिनंदन केले.