दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या सर्व शासकीय महाविद्यालयातील शैक्षणिक
वर्ष 2014-15 च्या चौथ्या, सहाव्या व आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी प्रवेश
शुल्क माफीची मागणी विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. त्या अनुषांगाने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी
यांच्याकडुन जिल्हयातील 50 टक्के पेक्षा कमी महसुल आणेवारी जाहिर केलेल्या
गावांची यादी प्राप्त झाल्यानंतर नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची गांवे 50
टक्के पेक्षा कमी आणेवारी असलेल्या यादीत समाविष्ठ असल्यास संबंधीत विद्यार्थ्यांचे
50 टक्के वसतीगृह शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात असुन ज्या विद्यार्थ्यांनी
वसतीगृह शुल्क पुर्ण भरले आहे, त्या विद्यार्थ्यांना 50 टक्के वसतीगृह शुल्क
परत करण्यात येईल, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ डि एल जाधव यांनी कळविले आहे.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA