वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या
अखिल भारतीय समन्वयीत एकात्मिक शेती पध्दती संशोधन प्रकल्प व कृषि विद्या विभाग
यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० ते १९ डिसेंबर दरम्यान
उपजीवीकेच्या
सुरक्षिततेसाठी एकात्मिक शेती पध्दती या विषयावर दहा दिवसाचा राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला असुन या प्रशिक्षणाचे उदघाटन दि. १०
डिसेंबर रोजी कृषि महाविद्यालयाच्या निम्नस्तर शिक्षण सभागृहात सकाळी १०.००
वाजता कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु यांच्या हस्ते होणार असुन शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर व विस्तार शिक्षण संचालक डॉ बी
बी भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या प्रशिक्षणात देशातील विविध कृषि विद्यापीठे व कृषि संबंधीत संस्थामधील
शास्त्रज्ञ व प्राध्यापक सहभागी होणार आहेत. देशातील सरासरी जमीनधारणा क्षेत्र
केवळ ०.१५ हेक्टर इतकी अत्यल्प असुन शेतीवर अवलंबुन असलेल्या कुटुंबाची अन्नधान्य व इतर उपजीवीकेसाठी आवश्यक बाबींची पुर्तता होत नसल्याने
एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब करून शेती व शेतीसंलग्न व्यवसायांची योग्य सांगड
घालणे आवश्यक आहे. यामुळे शेतीतील उपलब्ध संसाधनाचा योग्य
वापर होऊन शेतकरी कुटुंबास वर्षभर रोजगार उपलब्ध होईल व शाश्वत उत्पादन घेणे
शक्य होईल. या बाबीसंबंधी विविध विषयावर सदरील प्रशिक्षणात विविध शास्त्रज्ञ
मार्गदर्शन करणार आहेत. सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन प्रमुख शास्त्रज्ञ तथा प्रशिक्षण समन्वयक डॉ डब्ल्यु एन नारखेडे,
प्राचार्य तथा विभाग
प्रमुख डॉ डी एन गोखले व प्रशिक्षण सहसमन्वयक प्रा डॉ बी व्ही आसेवार यांनी केले आहे.